My title My title
Post's

Smartphone Battery Life वाढविण्यासाठी करा हे सोप्पे उपाय, सहावा तर नक्कीच वाचा…!

Smartphone Battery Life वाढविण्यासाठी करा हे सोप्पे उपाय, सहावा तर नक्कीच वाचा…!@Varunraj Kalseआज  प्रतेकाच्या जीवनात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. काहीं लोकांना कामासाठी-मनोरंजनासाठी-ऑनलाइन अभ्यासासाठी किंवा इतर काही कारणास्तव मोबाइल हवा असतो.

मोबाईलमुळे सर्वाचे काम सोपे झाले आहे, पण अनेक वेळा Battery कमी असल्याने मोबाईल बंद झाल्यावर लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही फोनची बॅटरी वारंवार कमी होत असल्याने हैराण झाला असाल तर ही उपयुक्त माहिती तुमच्यासाठीच आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची फोन सतत चार्ज करण्यापासून सुटका होईल.

त्याचबरोबर तुमच्या Smartphone Battery Life वाढेल. फोनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जास्त battery drain चे कारण असतात आणि जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही या त्रासा पासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या या महत्वाच्या डिटेल्स.


1.

Power Saving Mode चा वापर करा:

बॅटरी ड्रेन होण्यापासून वाचवायची असेल तर Power Saving Mode. वारंवार बॅटरी संपत असल्यास Low Power Mode वापरणे फायद्याचे ठरेल. हा मोड इनेबल केल्यास फोन केवळ महत्त्वाचीच काम करतो. यामुळे download सारख्या Background Activity बंद होतात. यामुळे केवळ अत्यंत आवश्यक कामं करण्याचीच अनुमती मिळते.


2.

Always Low Brightness ठेवा :

आजकाल स्मार्टफोनचे Display मोठे आणि जास्त Bright असतात. तुम्हाला माहितेय का की स्मार्टफोनचे जास्त Bright Display तुमच्या Battery Life कमी करतात. म्हणूनच स्मार्टफोनची ब्राईटनेस लो ठेवणे कधीही चांगले. तुम्ही ऑटो-ब्राइटनेसला अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. यामुळे फोनचे ब्राइटनेस आपोआप एडजस्ट होईल. तसेच, यामुळे तुमच्या फोनची Battery लवकर Discharge होणार नाही आणि फोन चांगला Battery Backup  देईल. रात्रीच्या वेळी Bright Screen फोनची Battery लवकर Drain करते. अशात तुम्ही Brightness कमी केल्यास याचा फायदा होईल.


3.

GPS चा सतत वापर टाळा:

GPS Feature  मुळे User ची सोय तर नक्कीच झाली आहे. पण, हे Feature सतत सुरु असेल तर तुमच्या फोनची Battery अधिक काळ तुम्हाला साथ देणार नाही. म्हणूनच, तुमच्या फोनमध्ये GPS ची गरज नसताना ते बंद ठेवा. काही जणांच्या फोनमध्ये कायमच Google Maps सारख्या Location Service सुरू असतात. यामुळे Battery लवकर संपते. ही Service बंद केल्यास फोन या Services ला डेटा बंद करते. आणि अतिरिक्त चार्जिंग जात नाही.


4.

Smartphone Always Updated ठेवा:

Smartphone नेहमी Updates Notification येत असतात. पण, अनेक Users याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. पण, असे करणे Smartphone च्या Battery Backup साठी चांगले नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या फोनची battery लवकर संपण्यापासून वाचवायची असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमधील Apps & Operating System Update ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही फोनमध्ये Automatic Update Apps चालू करावे लागेल. असे केल्यास smartphone ची Battery अधिक काळ टिकेल.


5.

Flight Mode सुरु करा:

फोनची बॅटरी लवकर संपण्यापासून वाचवायची असेल तर तुम्ही डिव्हाइसला Flight Mode मध्ये देखील ठेवू शकता, जे तुमच्या फोनचे सर्व Wireless वैशिष्ट्ये बंद करते. पण, इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या काळात Call आणि Text मेसेज येणार नाहीत. तुम्ही अद्याप Wi-Fi शी फोन कनेक्ट करू शकता. सेटिंग्समधून तुम्ही Flight Mode ऑन करू शकता यामुळे स्मार्टफोनचा battery time थोडा अधिक वाढवू शकता.


6.

Smart Phone Over Charging पासून वाचवा:

Smart Phone Over Charging मुळे सुद्धा लवकर खराब होऊ शकतो. आपण कधी कधी झोपताना Smart Phone Charging ला लाऊन झोपतो. त्यावेळी battery over charge होत असते. आणि त्यामुळे Battery फुगणे, अति गरम होणे किंवा कधी कधी Battery चा स्फोट सुद्धा होतो.

अनेक कंपन्या दावा करतात कि त्यांचा Charger हा Smart Charger आहे. पण शेवटी Plug-in आहे आणि स्वीच ओं आहे म्हणजे करंट तर जाणारच ना Smart Phone मध्ये. आणि Smart Phone Over Charging होणारच.

या साठी अनेक Application उपलब्ध आहेत Google Play Store मध्ये जे battery Full charge झाली की, अलार्म वाजवते आणि आपण चार्जिंग स्वीच ऑफ करू शकतो.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button