मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा “JIO” लाँच केला होता तेव्हाची गोष्ट.
©सलिल सुधाकर चौधरी
न भूतो न भविष्यती अशा किंमतीमध्ये रिलायन्सने JIO च्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. फक्त डेटा साठी पैसे आकारण्यात येत होते.
कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी बिलकुल पैसे चार्ज केले जात नव्हते.
त्यामुळे भारतीयांनी JIO फोनवर उड्या घेतल्या. कॉल्स फुकट असल्याने प्रत्येकजण भरपूर कॉल्स करायला लागला.
आता झालं असं की भारतामध्ये टेलिकॉम क्षेत्रात एक नियम आहे. ज्या नेटवर्क वरुन दुसर्या नेटवर्क वर कॉल केला जात असेल त्या नेटवर्कला “Inter connect Charges” (IUC) देणे भाग असते.
या नियमानुसार JIO वरुन ज्या नेटवर्कला फोन जात होते त्या सर्व नेटवर्क्सना रिलायन्सकडून “Inter connect Charges” द्यावे लागत होते.
यामुळे JIO ला “Inter connect Charges”चा प्रचंड भुर्दंड पडत होता. आधीच ग्राहकांकडून रिलयन्स पैसे घेत नव्हते, आणि त्याचबरोबर हा अधिकचा खर्च रिलायन्सला द्यावा लागत होता.
दर तीन महिन्यांत साधारण २५० करोड इतकी रक्कम “Inter connect Charges” म्हणून दिली जात होती.
मित्रांनो, JIOने या अडचणीवर मात करण्यासाठी एक अफलातून कल्पना राबविली.
साधारणपणे कॉल लागल्यानंतर समोरची व्यक्ती कॉल उचलेपर्यंत ४५ सेकंदाचा वेळ दिला जातो. जर ४५ सेकंदात कॉल उचलला नाही तर फोन आपोआप बंद होउन “Missed Call” जातो.
रिलायन्सने जेव्हा JIO मधून इतर नेटवर्क्स मध्ये कॉल जायचा तेव्हा ही वेळ ४५ सेकंदांपासून २० सेकंदांपर्यंत कमी केली.
त्यामुळे झाले काय की कॉल लवकर कट व्हायचा आणी दुसर्या नेटवर्क वरील फोनला Missed Call जायचा. आता Missed Call आल्याने समोरील व्यक्ती कॉल करायला लागली.
साहजिकच “Inter connect Charges” आता इतर नेटवर्क्स कडून JIO ला मिळायला सुरुवात झाली.
JIO ने आपल्यावर आलेली परिस्थीती इतर नेटवर्क्सवर उलटवली आणि Airtel, Idea, Vodafone कडून Inter connect Charges कमवायला सुरुवात केली.
इतर कंपन्यांना हे लक्षात यायला साधारण दोन वर्षं लागली. तोपर्यंत JIO ने नियमांतील चोरवाटा शोधून करोडो रुपये कमविले होते.
मित्रांनो, मुकेशभाई अंबांनींची कंपनी कसा विचार करते त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
मुकेश भाई किती “बेरकी” विचार करतात ते आता तुम्हाला कळले असेलच.
परिस्थीती कशीही असो त्यातून मार्ग काढता येतोच ही शिकवणही आपल्याला यातून मिळते.
उद्योजकांनो , या स्टोरी मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
Like this:
Like Loading...
Related