My title My title
Brain StormingMental Health

If someone is constantly blaming or criticizing you

जर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल…!



आपण माणसं सामाजिक प्राणी आहोत आणि जितके आपण समाजात विश्वासपात्र होतो तितके आपले कौतुक होते, जितके जास्त तुम्ही कौतुकास पात्र असात तितकी तुमची समाजात योग्यता वाढते.


एखाद्याच्या मागे त्याचे कौतुक करणारे किती लोक आहेत यावरुन आपण त्याची योग्यता मान्य करतो. आणि याचाच एक नकारात्मक भाग म्हणजे टीका करणे.


नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच समाजात सुध्दा दोन प्रकारचे लोक असतात एक कौतुक करणारे आणि दूसरे टिका करणारे.


तुमच्या वैयक्तिक विकासाचा एक भाग म्हणून अशा टीका करणार्‍या माणसांना कशाप्रकारे सामोरे जायला हवे हे शिकणे फार महत्त्वाचे आहे.


पुढे जाण्याआधी लक्षात द्या टीका दोन प्रकारच्या असतात असतात उत्पादक टीका आणि दोषारोपांचा खेळ. पहील्या प्रकारातील टीका तुमच्या हितचिंतकांकडून येतात तर दूसर्‍या प्रकारच्या टीका तुमचे अहीत चिंतणार्‍यांकडून येतात.


सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यातील फरक हा त्या टीकेमागील हेतूवर अवलंबून आहे. एखाद्याने केलेल्या टीकेमागील कारण जर तुम्ही शोधू शकलात तर हा भेद करणं तुमच्यासाठी अधिक सोपे जाईल.


टीका करण्याचे कारण काय आहे? तुमच्यावर टीका का होते आहे याचं कारण शोधा? जर टीका करणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी बोलत असेल तर त्या व्यक्तीने तुमची एक प्रकारे मदतच केली आहे.


या विपरीत असेल तर त्या टीकेचा आपल्याला त्रास होतो जरी ती आपल्या सत्यावर आधारीत असली तरिही.


सत्याच्या आधावरील टीका खरतर आपल्या भल्यासाठीच असते पण आपण माणसं खुप भावनिक आहोत आपण कधीही काय बोलले गेले आहे यापेक्षा ते कसे बोलले गेले आहे याला जास्त महत्त्व देतो.


परंतु आपली चर्चा ही सततच्या टीकाकरणावर आहे, खरं सांगायचं तर सतत टीका ऐकणे हे खुप त्रासदायक असते.


कोणतीही व्यक्ती टीका एकदा सहन किंवा दोनदा सहन करु शकते अगदी फार फार तर तीन वेळा सुध्दा सहन करेल पण त्यापेक्षा जास्त हे सहनशक्ती पलीकडील आहे.


यामुळे सहन करणारी व्यक्ती आपण विचार सुध्दा करु शकत नाही अशा वाईट परिणामांना सामोरी जाऊ शकते.


१. आपण हे वैयक्तिकरित्या घ्यावे का ?

मी हे समजू शकतो की त्यांच्या शब्दांचा रोख तुमच्यकडे असतो आणि अशात त्यांच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करणे जड जाते परंतु ते केल्याशिवाय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ शकणार नाही की टीका करणारी व्यक्ती नक्की कोण आहे.


मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या जर एखाद्यावर टीका करणे त्या व्यक्तिच्या स्वभावतच असेल, तिला ते आवडत असेल किंवा तिला प्रवृत्त केलं असेल, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ही त्या व्यक्तिची समस्या आहे.

ती आपली समस्या नाही.


जर तिच व्यक्ति एका दिवसात अजून १० जणांवर टिका करत असेल तर असे समजायचे का की ती व्यक्ती सोडून बाकी सगळे वाईट आहेत याचा अर्थ त्या व्यक्तिमध्ये खुप नकारात्मकता भरली आहे आणि ती व्यक्ति ही नकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे.


तर मग या मागे नेमकं कोण आहे? ती सगळी १० माणसं या साठी जबाबदार आहेत का?


कदाचित नाही आणि नाही त्या १० किंवा अधिक माणसांमधले एक म्हणून तुम्ही या साठी जबाबदार आहात.


हे आपल्याबद्दल नाही आहे, हे त्या व्यक्तिबद्दल आहे जी दुसर्‍यांवर टीका केल्याशिवाय राहू शकत नाही.


खरतर अशी व्यक्ति तुमच्या सहानुभूती साठी पात्र आहे लक्षात घ्या मी सकारात्मक टीकाकरणावर बोलत नाही आहे मी कशाप्रकारच्या टीकांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजलच असेल.



२. काही माणसांना कसं बोलावं आणि काय बोलावं हेच माहीत नसतं.

प्रत्येक व्यक्ती संवाद कौशल्यामध्ये पारंगत असेलच असे नाही काही जणांना संवाद कौशल्याच्या मुलभूत गोष्टींचे सुध्दा ज्ञान नसते. पचायला कठीण वाटत असलं तरी हे खरं आहे.


खुपवेळा लोक एखाद्याने केलेल्या शब्दांच्या वापरावरुन चुकीचा अर्थ लावतात. शब्द संभाषणातील महत्त्वाचा भाग नक्कीच आहेत पण ते फक्त शब्द म्हणने संभाषण नव्हे.


काही संभाषणाचे प्रकार असे सुध्दा आहेत जिथे शब्दांचा वापरच केला जात नाही. जर कुणी चांगले शब्द वापरुन तुमचा अपमान केला तर तुम्हाला आवडेल का?


किंवा हसत हसत तुम्हाला कुणी शाप दिला तर तुम्हाला कसे वाटेल? अशी खुप माणसं आहेत ज्यांना बोलताना त्यांच्या भावनांचा वापर कसा करावा हे समजत नाहीआणि अशा परिस्थितीत आपल्याला त्यांच्या बोलण्याचे अर्थ लावणे अवघड जाते.


अशा वेळेला ते कसे बोलत आहेत या पेक्षा ते काय बोलत आहेत याकडे लक्ष द्या.


आपला उद्देश्य एकच असला पाहीजे ते नक्की काय बोलत आहेत, कदाचित ते आपल्या चांगल्यासाठी असू शकते.


लक्षात ठेवा जर आपल्याला एक चांगला संप्रेषक (चांगले संभाषण करणारा) बनायचे असेल तर आपल्याला काय बोलायचे, कधी बोलातचे आणि सगळ्यात महत्त्वाचे कसे बोलायचे हे समजलेच पाहीजे.



३. पुन्हा बोला आणि संदर्भ जोडा.

विचार करा, जर तुम्हाला कोणी येऊन बोललं की तुम्ही या पेक्षा अधिक चांगलं करु शकला असता, तर अर्थातच तुम्हाला पहीला त्या माणसाचा राग येईल.


जे कदाचित स्वभाविक आहे. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की असू शकतं की ती व्यक्ती सुध्दा अशाच अनुभवातून गेली असेल आणि कारण तिने हा अभिप्राय सकारात्मक दृष्टीने घेतला त्यामुळेच ती स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवू शकली.


स्वतःला पहील्यपेक्षा अधिक चांगलं घडवू शकली. जर असं असेल तर त्या व्यतीबद्दल राग बाळगण्याचं तुमच्याकडे काही कारण आहे का? माझा अर्थ तुम्ही तुमचं चांगलं इच्छिणार्‍या व्यक्तीचा राग का कराल.


आपल्याला फक्त एवढच लक्षात घ्यायचं आहे समोरच्याच्या बोलण्यातून फक्त चांगल्या गोष्टी किंवा सकारात्मकता कशी घ्यावी.


यापुढे लक्षात ठेवा जर तुमचा बॉस तुमच्यावर ओरडला म्हणजे तो तुम्हाला अधिक चांगलं होण्यासाठी मदत करत आहे.


जर तुम्हाला वारंवार कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर समजा की हे होतय कारण याला तोंड देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्यांचा सामना करत आहात.


आपल्या त्या बोलण्यामागचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे कारण आपण जसा विचार करतो ते तसचं असेल अस नाही.


तुमच्यावर होणर्‍या टीकांचा संदर्भ जोडून जर तुम्हाला त्यात सकारात्मकता शोधता आली तर तुम्हाला या टीकांचा सामना करणे सोपे जाईल.


४. सावधगिरी बाळगा.

तुम्ही एखाद्याच्या बोलण्याबद्दल कस विचार करता हे पाहणं आपण या पूर्वीच्या मुद्द्यामध्ये पाहीले, हे तुम्हीच तेव्हाच करु शकता जेव्हा तुम्ही सावध असाल. भावनांच्या आहारी जाणे खुप वेळा तोट्याने ठरते.


आपला मेंदू आपल्याला जे खरं आहे ते दाखविण्यापेक्षा त्याने जे समजून घेतले आहे तेच दाखवतो. कोणालाही भ्रमामध्ये रहायला आवडत नाही. बरोबर ना?


आपल्या आधिच्या अनुभवातुन आणि आपल्याकडे असलेल्या जेमतेम माहीतीमधूनच आपला मेंदू एखाद्या गोष्टीचे कथन करतो.


खर तर आपला मेंदू आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरवतो असे नाही. याबद्दल विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकू, बघू, स्पर्श करु आणि त्याचा गंध घेत नाही आणि घेऊ शकत नाही.


आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे आपण त्यकडेच लक्ष देणे गरजेचे आहे. हे एकप्रकारची भेट नाही का? हे लक्षात घेता, आपण थोडा वेळ हा विचार करण्यावर घालवला पाहीजे की आपल्या हातून काही निसटले तर नाही ना.


हीच गोष्ट तुम्हाला मदत करेल, जर तुमच्यावर कोणी टीका करत असेल आणि त्याचा तुम्हाला राग येत असेल तर विचार करा की नक्की तुम्हाला कशाबद्दल राग आला असेल?


सावधानता बाळगा, स्वतःच्या मनात जरा झाकून पहा, स्वतःच्या भावनांना समजा. तुमच्यावरती जी टीका होत आहे त्याकडे तिसर्‍या माणसाच्या दृष्टीकोनातून विचार करा.



५. घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहीजे असे नाही.

आपण पाहील्या मुद्द्यामध्ये बोलल्याप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला भेट आहे.


तुमचा मेंदू एक असे चुंबक आहे जे फक्त तुम्ही लक्षकेंद्रीत केलेल्या गोष्टींना आत्मसात करतो. या आत्मसात केलेल्या गोष्टी विचार तयार करतात आणि त्यातून भावना उमटतात.


जर तुम्हाला फक्त चांगल्या आणि सकारात्मक भावनांचा अनुभव करायचा असेल, तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहीजे.


आपला मेंदू ज्या गोष्टी आत्मसात करत आहे त्या काय आहेत आणि काय नाहीत त्याकडे आपले लक्ष असले पाहीजे.


जर तुम्ही जे आत्मसात करताय त्यावर नियंत्रण ठेवू शकलात तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण नाही.


जरी तुम्हाला कोणी त्यांच्या वाईट टीकांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडत असेल तरीही तुम्ही त्याच टीकांना तुमच्या मनाप्रमाणे पुन्हा बांधू शकता आणि त्यातून जे तुम्हाला मदत करेल तेवढेच घेऊ शकता.



६. अतिशय दयाळू स्वभाव ठेवा.

आपण आत्तापर्यंत बघितलेल्या मुद्द्यांचे जर तुम्ही पालन केले तर मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला राग न येण्यासाठी नक्की पटवू शकाल.


जर तुम्ही टीकांचा विनम्र आणि सकारात्मकतेने उत्तर देऊ शकलात तर समोरच्याचे तुम्हाला येणारे प्रतिउत्तर सुध्दा नक्की बदलू शकाल.


तुमच्या टीका करणारी व्यक्ती त्याप्रमाणेच तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करते पण तुमचा प्रतिसाद त्या उलट असेल तर पुढे काय आणि कसे प्रतिउत्तर करावे यात संभ्रम निर्माण होईल.


आणि कदाचित तुमच्या सकारात्मक आणि विनम्र प्रतिसादामुळे तीचे तुमच्याबद्दलचे मत सुध्दा बदलू शकते.


७. कोणाला अभिप्राय (Feedback) देण्याची संधी द्यावी हे माहीत असले पाहीजे.

इथे चुकीच अर्थ घेवू नका. खुपवेळा लोकांचा येणारा अभिप्राय आपल्या हातात नसतो. पण हे ही तितकेच खरे आहे की कधी कधी आपण स्वतः एखादी गोष्ट केल्यानंतर त्यावर त्यांचा अभिप्राय मागतो.


अशा परिस्थितीत आपल्याला हे माहीत असले पाहीजे आपण कोणाकडून अभिप्राय मागत आहोत.

जी व्यक्ती प्रत्येक वेळा तुमच्यावरती टीका करत असेल अशा व्यक्ती कडून अभिप्राय मागणे मूर्खपणा ठरु शकतो कारण यामध्ये त्या व्यक्तीला टीका करण्याची संधी आपणच देत असतो.


जर शक्य असेल तर अभिप्राय मागणे टाळा. पण लोकांचा अभिप्राय घेणे आवश्यकच असेल तर आपल्याला माहीत असले पाहीजे की आपण कोणाकडून अभिप्राय घेत आहोत.


तुम्ही ज्यांच्याजवळ अभिप्राय मागत आहात ते तुमच्या चुका सुधारणारे असले पाहीजेत, टीका करणारे नाहीत.


८. इतरांच्या प्रती कृतज्ञ रहा.

इतरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धाडस लागते. आपल्या सर्वांना परिपूर्ण आयुष्य जगायला आवडत. आपल्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी अस सर्वांना वाटतं आणि आपण तसे प्रयत्न सुध्दा करतो.


परिपूर्ण आयुष्य म्हणजे नक्की तुमच्यासाठी काय असे विचारले तर तुम्ही काय सांगाल? उत्तर व्यक्तीगत वाढ (Personal Development) हेच असेल किंवा स्वतःमध्ये स्वतःच्याच चांगल्यासाठी केलेल्या सुधारण असे आपण म्हणू शकतो.


सुधारण करणे जरी खरे असले तरी आपण हे तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण कुठे कमी पडतोय आणि आणि आपल्यातल्या कोणत्या गोष्टींवर आपल्याला काम करायचे आहे ते आपल्याला माहीत असले पाहीजे.


आपल्या शालेय जिवनात आपण केलेला आभ्यास बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला शिक्षकांची गरज असायची. हे अत्तासुध्दा बदललेलं नाही आपल्या मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुध्दा आपल्याला कोणाचीतरी गरज आहे.


ती गरज हे टीका करणारे पूर्ण करु शकतात. मान्य आहे कधी कधी या टीका खूप लागणार्‍या असतात आणि म्हणूनच त्या आपल्याला आवडत सुध्दा नाहीत.


पण इथे महत्त्वाचे हे आहे की तुमच्यावर टीका करण्यामागे त्यांचा उद्देश्य काहीही असो , तुम्ही त्याचा तुमच्या सुधारणेसाठी वापर करुन घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेच पाहीजेत.


अशा व्यक्तींचे मनापासून आभार मानण्यासाठी खरचं धाडस लागतं पण मला खात्री आहे तुम्हाला स्वतःला धाडसी म्हणवून घ्यायला नक्की आवडेल.



९. आपल्याला सर्वांना खुश करायची गरज नाही.

चांगली माणस चांगलीच असतात दूसरे म्हणतात म्हणून नाही तर ती खरच असतात. पण लोकांनी ते म्हटलं तर चांगल वाटतच पण त्यांच काहीही म्हणणं काहीच ठरवत नसतं.


कारण माणसं स्वर्थी असतात्, ते आपण चांगले आहोत की नाही हे आपण त्यांच्या फायद्यासाठी काय केलं आहे यावरुन ठरवतात. पण आपण दूसर्‍याच्या फायद्यासाठी केलेली गोष्ट नेहमी चांगली असेलच असं नाही.


त्यामूळे कधीकधी अशा काही विनंत्या आपण चांगल्यासाठी नकारु शकतोच.


प्रत्येकाचा आयुष्यात अशी काही माणसं असतातच जी तुम्ही काहीही केल तरी तुम्हाला चांगलं समजणार नाहीत आणि हे तुम्हाला सुध्दा चांगलंच माहीत आहे.


जर तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवायच ठरवल तर एखादा माणूस त्याचा चुकीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे मदतीसाठी कोणाला हो आणि नाही म्हणायचं हे तुम्हाला माहीत असले पाहीजे.




आवडलं तर Like आणि Share करा

©लेखक अनामिक

सोर्स: WhatsApp मेसेज

फोटो क्रेडिट: google images

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
Back to top button