Itworkss

Google Maps: अशा प्रकारे गुगल मॅपवर पाहा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स

April 11, 2022 | by Varunraj kalse

गुगल 2019 मध्ये Google Maps मध्ये सार्वजनिक परिवहन (travelling) वाहुकीशीनिगडीत फीचर्स आले होते. या फीचर्समुळे युजर्सना शहरातल्या किंवा  लांब पल्ल्ल्याच्या प्रवासादरम्यान रिअल टाइम ट्रेनची स्थिती पाहणे, 10 शहरातील  वाहतूक कोंडीमध्ये प्रवासाची अपेक्वेषीत वेळ जाणून घेण्यासाठी आणि रिक्षा-सार्वजनिक वाहतुकीबाबतची माहिती मिळवण्यासाठी मदत होणार होती. 

लाइव्ह ट्रेन स्टेट्स स्थिती पाहण्यासाठी या फीचर्सचा चांगला उपयोग होतो. या अॅपमुळे ट्रेन स्थानकापर्यंत पोहचण्याची वेळ, ट्रेनची वेळ, ट्रेन किती उशिराने धावत आहे, कुठल्या स्थानावर येईल याबाबत अन्य माहितीदेखील या अॅपमुळे मिळतेय. अशी माहिती देणारे काही थर्ड पार्टी अॅप सुद्धा आहेत. Google Maps वर असलेल्या या फीचर्सचा फायदा कमी स्टोरेज असलेल्या मोबाइल वापरकर्त्यांना अधिक होईल. या फीचर्सला Where is My Train अॅपसह भागिदारीत सुरू करण्यात आले होते. 

गुगल मॅपवर हे फीचर्स कसे वापरावे, ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स कसे पाहावे यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. अॅपमधील हे फीचर्स पाहण्यासाठी तुमच्याकडे गुगलचे अॅक्टिव्ह अकाउंट हवे. 

खालील प्रकारे करा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स:

– फोनमध्ये गुगल मॅप सुरू करा
– सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे, ते स्थानक नमूद करा
– आता डेस्टिनेशन पर्यायाखाली असलेल्या  टू व्हिलर आणि वॉक या आयकॉन दरम्यान असलेल्या ट्रेन आयकॉनवर टॅप करा
– ट्रेनच्या आयकॉनमध्ये मार्गावरील पर्यायावर टॅप करा
–  ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स पाहण्यासाठी ट्रेनच्या नावावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला ट्रेनचा लाइव्ह स्टेट्स पाहता येऊ शकते. 

RELATED POSTS

View all

view all