Science & Difference Between Stotra and Mantra
October 20, 2021 | by Varunraj kalse
Science & Difference Between Stotra and Mantra
स्तोत्र व मंत्र यामध्ये काय अंतर असते आणि त्या मागील विज्ञान आणि त्याचे फायदे…
©Anna®2021
स्तोत्र व मंत्र देवतांना प्रसन्न करण्याचे शक्तिशाली माध्यम आहे.
आज आपण माहिती घेणार आहोत मंत्र व स्तोत्र यामध्ये काय अंतर असते. कोणत्याही देवतेचे पूजन/ पूजा करण्या- अगोदर , त्यासंबंधित मंत्रांना गुरूंच्या साहाय्याने सिद्ध करणे हे योग्य, आणि फलदायी ठरते.
स्तोत्र –
यामुळे कोणत्याही देवी अथवा देवतेचे गुणगान – महिमा वर्णन केला जाऊ शकतो.
स्तोत्र म्हणल्याने अलौकिक ऊर्जा संचारते, त्या दिव्य शब्दांच्या उच्चाराने आपण त्या देवतेला प्राप्त करू शकतो.
स्तोत्र पठण हेच जास्त महत्वाचे आहे हे गीतात्मक असते त्यामुळे.
मंत्र –
मंत्र हे केवळ शब्दांचा समूह असे बऱ्याच जणांना वाटत असते, असे समजणे म्हणजे त्या मंत्रांचा स्वतःसाठी प्रभाव कमी करणे होय.
काही मंत्र तर शक्तिशाली लयबद्ध शब्द तरंग आहेत जे खूप चमत्कारिक रूपात कार्य करत असतात. हे तरंग भटकत्या मनाला केंद्रस्थानी ठेवतात.
शब्दांचे योजनाबद्ध मांडणी ही साधारण मुळीच नसते. यांना ऋषि मुनिंद्वारे वर्षानुवर्षे साधना केल्यावर लिहिले गेले आहेत.
मंत्र जपाने आजूबाजूचे वातावरण शांत व भक्तिमय होत असते. जे सकारात्मक ऊर्जा एकत्रिक करून मन शांत करत असते.
मन शांत झाल्यावर अर्ध्याहून अधिक समस्या स्वतःहून शांत होतात.
मंत्र हे देवी देवतांच्या आमंत्रणाचे खास मंत्र असतात.
वैदिकमंत्रांना एका गुप्त लयबद्ध छंदामध्ये बांधले जाते ज्या काही वैदिक ऋचा आहेत त्यांनाही मंत्र असे म्हणतात हे नित्य जप केल्याने चैतन्य निर्माण होते. मंत्र हे सतत जपले पाहिजेत, निरंतर जप केला पाहिजे.
सुप्त शक्तींना जागवणारी शक्ती म्हणजे मंत्र –
मंत्र एक विशेष लयात असतात जे गुरुच्या माध्यमातून प्राप्त केले जाऊ शकतात. जे आपल्या अंतर्मनात समाविष्ट होऊन आत्मीय समाधान करतात.
ते म्हणजे मंत्र, ब्रह्माण्ड उत्पत्ति झाली त्याबरोबर ओमकाराची उत्पत्ति झाली. याचे वर्णन व महिमा साक्षात भगवान शंकर यांनी केले आहे.
यामध्ये सर्व नाद समाविष्ट आहेत. मंत्र आपल्या इष्टदेवतेला स्मरण करणे व त्यांच्याप्रति समर्पित होणे होय. मंत्र व स्तोत्र यात असे अंतर आहे की, स्तोत्र गायले जाऊ शकते परंतु मंत्र हे एक पूर्व निश्चित लयात जप करावे लागतात .
काय असतात बीज मंत्र? –
देवी देवत्यांच्या मूळ मंत्राला बीज मंत्र म्हणतात. सर्व देवी देवतांचे बीज मंत्र आहेत. समस्त वैदिक मंत्रांचे सार म्हणजे बीज मंत्र होय.
हिन्दू धर्मानुसार सर्वात प्रधान बीज मंत्र “ॐ” मानले आहे.
“ॐ” हे अन्य मंत्रांसोबत वापरले जाते, कारण हे सर्व मंत्रांना प्रेरणा व शक्ती देते. बीज मंत्रांनी देव लवकर प्रसन्न होतात व भक्तांवर दया करतात.
जीवनात आर्थिक, सामाजिक अथवा शारीरिक या सर्व समस्या बीज मंत्र जप केल्याने संपुष्टात येतात.
स्तोत्र व मंत्र जप करण्याचे लाभ –
मंत्र असो किंवा स्तोत्र, यांच्या जपाने देवी देवतांची विशेष कृपा होते. शास्त्रांमध्ये ही मंत्रांचे वर्णन विस्तृत स्वरूपात केले आहे.
या सृष्टीत असे काही नाही की, ते मंत्रजपाने मिळत नाही. हे आवश्यक आहे की साधकाद्वारा केलेला जपविधी हा जगाचे कल्याण करण्याच्या भावनेने केलेला असावा.
बीज मंत्र जपाने विशेष फायदे होतात. बीजमंत्रांचा जप करत असताना त्याचा प्रभाव अधिकाधिक वाढत असतो. वैज्ञानिक स्तरावरही याच्यावर संशोधन झाले आहे.
मंत्र जपाने सुप्त शक्तीचा विकास होऊन त्यांचा संचार होतो. मेंदूचे विशेष भाग सक्रिय होतात. मंत्र जप एवढे प्रभावशाली आहेत की त्याने नशिबाच्या रेषा ही बदलतात.
जर बीज मंत्र समजून घेऊन गुरूआज्ञेनुसार निष्ठेने जप केल्यास असाध्य ते साध्य करता येते मग त्या समस्या असो किंवा आजार.
विशेष तज्ञ किंवा गुरु यांच्या सल्ल्याने बीजमंत्र जप केल्यास अधिक लाभ होतात. कोणत्याही त्रुटी असतील तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली निघून जातात तसेच राशिनुसार मंत्र जपाचे लाभ हे अधिक फायदेशीर होतात.
अनेक प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी बीजमंत्रांचा जप लाभदायक ठरतो. “मंत्र” हा शब्द दोन अक्षरांनी मिळून बनला आहे.
मन+त्र . याचा शाब्दिक अर्थ म्हणजे मनातील वाईट विचार काढून त्याजागी नव्या विचारांना रुजवणे. जेव्हा मनात ईश्वरसंबंधी विचार उदयास येतात तेव्हा रोग व नकारात्मकता दूर जाऊ लागते.
वेदांचे प्रत्येक श्लोक हे एक मंत्र आहेत. बीजमंत्रांच्या जपाने निर्माण झालेले तरंग संपुर्ण वायूमंडलात व्याप्त होऊन सुप्त शक्ती जागृत करून लाभ प्राप्त करून देते.
विविध मंत्र व त्यांचे लाभ –
ॐ गं गणपतये नमः।
या मंत्र जपाने व्यापार लाभ, संतती प्राप्ति, विवाह समस्या मध्ये लाभ होतो.
ॐ ह्रीं नमः।
या बीजमंत्र जपाने धन प्राप्ति होते.
ॐ नमः शिवाय:।
ह्या दिव्य मंत्र जपाने शारीरिक व मानसिक कष्ट निवारण होते व दीर्घायुष्य मिळते व पुत्रप्राप्ती साठी ही ह्या बीजमंत्राने फल प्राप्ती होते.
ॐ शांति प्रशांति सर्व क्रोधोपशमनि स्वाहा :।
ह्या मंत्र जपाने क्रोध शांत होतो.
ॐ ह्रीं श्रीं अर्ह नमः।
ह्या बीजमंत्र जपाने सफलता प्राप्त होते.
ॐ क्लीं ॐ
या बीजमंत्र जपाने अडकलेली कार्ये मार्गी लागतात व बिघडलेली काम सुरळीत होतात.
ॐ नमो भगवते वासुदेवाय।
या मंत्र जपाने आकस्मिक दुर्घटनेपासून मुक्ती मिळते.
ॐ ह्रीं हनुमते रुद्रात्मकायै हुं फट्।
या बीजमंत्राने सामाजिक प्रतिष्ठा वाढते व पदोन्नति प्राप्त होते.
ॐ हं पवन नंदनाय स्वाहा।
या बीजमंत्राने भूत, प्रेत यापासून मुक्तता मिळते.
ॐ भ्रां भ्रीं भौं सः राहवे नमः।
परिवारात क्लेश असतील तर ते दूर होतात व शांतता मिळते.
ॐ महादेवाय नम:।
सामाजिक प्रगती व धन प्राप्ति साठी हा मंत्र उपयोगी आहे. घर प्राप्तीसाठी ह्याचा जप करावा दारिद्र्य, भय, रोग यासाठी हा बीजमंत्र उपयुक्त आहे.
ॐ नमो भगवते रुद्राय।
हा मंत्र जपल्याने मान सन्मान प्राप्त होतो, सामाजिक प्रतिष्ठा वाढते.
हा मंत्र मोक्ष प्राप्ती साठी उपयोगी ठरतो.
टिप- वरील लेख पुरातन ग्रंथाच्या आधारे लिहला आहे. ह्याची कृपया नोंद घ्यावी.
©Anna®2021 (7249157379)
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
