Itworkss

The Mysteries of the ancient symbolism

February 16, 2022 | by Varunraj kalse

प्राचीन सांकेतिक चिन्हाचे रहस्य…!



©Anna



ह्या विश्वामध्ये अनेक रहस्यमयी गोष्टी दडलेल्या आहेत. ह्या रहस्यांमध्ये अत्यंत प्रभावी सांकेतिक चिन्हसुद्धा आहेत.

अनेक प्रकारचे सांकेतिक चिन्ह अनादी काळापासून देवतांनी ऋषीमुनींना वरदान रूपाने दिले होते.

अशी सांकेतिक चिन्हे बाहेर का सांगीतली गेली नाहीत याचे कारण असे आहे की, व्यक्ती ह्या दिव्य सांकेतिक चिन्हाचा दुरूपयोग करू शकतो.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरातन विमानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शल्यचिकित्सा ह्याचा शोध हजारो वर्षापूर्वी भारतीय ऋषीमुनींनी लावला होता.

परंतु भारतावर झालेल्या अनेक आक्रमकांनी जुने ग्रंथ त्यांच्या देशात घेवून गेले आणि त्यांच्या नावावर आताचे शोध लावून मोकळे झाले.

मुळात सनातन हिंदु संस्कृती अत्यंत प्रगत संस्कृती आहे. सनातन सनातन हिंदु ग्रंथांचा अभ्यास केल्यावर प्रत्येकालाच हे दिसून येईल की, आपले पूर्वज खूप मोठे संशोधक होते.

आज आपण जे विज्ञान शिकतो आहोत हे सुद्धा प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षापुर्वी जतन करून ठेवलेले शास्त्रच आहे.

प्राचीन ऋषीमुनी हे समृद्धशील आणि तेजस्वी सिद्धपुरूष होते हे आपण विसरून चालणार नाही.
अनेक प्राचीन मंदिरामध्ये अत्यंत जटील सांकेतिक चिन्ह कोरलेले आहेत.

जे गुप्त मंत्राने सिद्ध केले तरच जागृत होतात. पुरातन वास्तू, गुहा किंवा गुप्त दरवाजे ह्यावर पूर्वी अशी अनेक सांकेतिक चिन्ह कोरलेली आहेत की, ते चिन्ह काही गुप्त मंत्रामुळे जागृत होत होते.

गुप्त मंत्राच्या प्रभावामुळे अशी चिन्हे जागृत होवून पुरातन वास्तूचे बंद दरवाजे, गुहा उघडल्या जात होत्या.

प्राचीन ग्रंथामध्ये अशाप्रकारच्या अनेक चिन्हांचा उल्लेख सापडतो.

सनातन सनातन हिंदु ऋषीमुनींनी परलोक ग्रहावरून मिळालेल्या संकेतानुसार तसेच मार्गदर्शनातून अशी चिन्हे निर्माण केली आणि त्याचे जतन होण्यासाठी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेखसुद्धा केला.

ह्यातील बहुतांश सांकेतिक चिन्ह अशी आहेत जे तुमच्या नशीबाचे दरवाजे खोलू शकतात. ह्या सांकेतिक चिन्हामध्ये १) आकाशतत्व २) जलतत्व ३) वायुतत्व ४) पृथ्वीतत्व आणि अग्नितत्व सामावलेले आहे.

सांकेतिक चिन्हातील एका बाजूस आकाशतत्वामधील पुर्वजांची पुण्यशक्ती असते ज्याला ऊर्ध्व लोकामधील म्हणजेच आकाशातील देवांच्या शक्तीला खेचते.

ह्याला देवमंडल म्हणतात. आकाशतत्वाच्या खालील बाजूस पाताळलोक आहे जिथून पाताळात राहणार्‍या देवांच्या, नागांच्या आणि राक्षसांच्या शक्तीला खेचते ह्याला पाताळमंडल म्हणतात.

तसेच सांकेतिक चिन्हामधील तिसर्‍या बाजूस घरातील पूजेत असणार्‍या देवतांची शक्ती आहे. ह्याला पितृमंडल म्हणतात.

ह्या चिन्हातील तिसर्‍या बाजूमुळे पितृमंडलातील समस्त दिव्य शक्तीला खेचले जाते.

ह्यातील चौथ्या बाजूमुळे तुम्ही केलेल्या पुण्याची शक्ती (कर्माची पुण्य शक्ती) म्हणजेच भुलोकातील समस्त दिव्य शक्तीला खेचते ह्याला पृथ्वीमंडल म्हणतात.

१) देवमंडल २) पितृमंडल ३) पृथ्वीमंडल ४) पाताळमंडल म्हणजेच चतुर्विद मंडलातील दिव्य शक्ती खेचून केंद्रमंडल म्हणजेच तुम्ही जिथे आहात तिथे खेचून आणते म्हणजेच अग्नितत्वाशी जोडली जाते.

पंचमहाभुते- आकाश, पृथ्वी, जल, वायु आणि अग्नि ह्या सर्व शक्तींचा ह्या सांकेतिक चिन्हामध्ये समागम होतो.

ह्या सर्व शक्ती अनेक साधना करून प्रसन्न कराव्या लागतात.

एवढ्या सर्व शक्तीची साधना करण्यात तुम्हाला कितीतरी वर्ष साधना कराव्या लागतील.

परंतु आपल्या सिद्ध पुर्वज ऋषीमुनींनी ह्यातूनही मार्ग काढण्यासाठी काही सांकेतिक चिन्हांचा आपल्या कल्याणासाठी वापर केलेला आहे.

हे सांकेतिक दैवी चिन्ह ज्याला वाचता येते आणि सांकेतिक चिन्ह जागृत करण्याचा मंत्र माहीत असलेली व्यक्ती एका दिव्य शक्तीशी जोडली जाऊ शकते.

अशी दिव्य शक्ती ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे ब्रम्हांडातील सर्व शक्ती आपोआपच खेचल्या जातात.

सनातन सनातन हिंदु विज्ञानशास्त्र हे हजारो वर्षापूर्वीपासून आहे. आपल्या सिद्ध ऋषीमुनींनी तप साधना करून अनेक अलौकीक शोध लावले होते.

पुरातन ग्रंथाचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट लक्षात येते की, सनातन हिंदु शास्त्रामध्ये आतापेक्षा कितीतरी प्रगत विज्ञान दडलेले आहे.

प्रामुख्याने प्राचीन चिन्हांचा अभ्यास करायचा असेल तर संस्कृत, पांडू लिपीचा मुख्यत्वे अभ्यास होणे गरजेचा आहे.

परंतु दुदैवाने भारतातील ९९% लोकांना ही भाषा अवगत नाही.

ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये लहानपणापासून संस्कृत आणि पांडू लिपी पाठ्यपुस्तकातून काढून टाकली गेली.

पुरातन शास्त्रविज्ञान असे सांगते की, पृथ्वीवरच सर्व ऐहीक, भौतिक, ऐच्छीक सुखे आहेत.

पृथ्वीवरच सोने, हिरे, मोती, माणिक, पैसा, यश, किर्ती, पद, नातेसंबंध आहेत.

त्यामुळे पृथ्वीतत्वाशी निगडीत असलेले अनेक दिव्य चिन्हांची निर्मिती प्राचीन ऋषीमुनींनी कोरून ठेवलेली आहे.

सांकेतिक चिन्हांचे वैशिष्ट म्हणजे ते मंत्राने जागृत करण्याआधीपासूनच स्वत:चा प्रभाव दाखवतात.

उदाहरण द्यायचे झाले तर असे सांगता येईल की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि तिथे गेल्यावर अशा एखाद्या दुर्मिळ सांकेतिक चिन्हाकडे काही मिनिटे एकाग्रतेने बघता.

त्यावेळी तुमच्या डोळ्यातील ऊर्जा आणि पृथ्वी तत्वातील ऊर्जा दोन्ही ऊर्जा एकत्रित होवून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात.

त्यामुळे तुमचे शरीर सिद्ध व्हायला सुरूवात होते, शरीर शक्तीमय होते.

ज्यावेळी शरीर शक्तीमय होते त्यावेळी तुमच्या मनोवांच्छीत सर्व ईच्छा पुर्ण होवू लागतात.

जे जे तुम्ही मनात ठरवाल त्या सर्वांची ईच्छापुर्ती हे सांकेतिक चिन्ह देवू शकते.

ज्या व्यक्तीला प्राचीन चिन्हाचा अर्थ कळतो आणि ते कसे सिद्ध करायचे ज्ञान असते.

अशी व्यक्ती ह्या चिन्हाच्या सहाय्याने सुखी, समृद्धशील, आनंदी आयुष्य जगू शकते.

परलोक शक्तींशी संवाद करण्याचे अत्यंत प्रभावी साधन म्हणजेच प्राचीन सांकेतिक चिन्ह! सांकेतिक चिन्हाच्या मदतीमुळे मनुष्य सर्वप्रकारचे सुख प्राप्त करू शकतो.

तुम्हाला समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त झाले तरच तुम्ही एखाद्याला अन्नदान करू शकाल, उपाशी पशु- पक्षांना अन्न खायला घालू शकाल.

सुखी, संपन्न आयुष्य लाभल्यावर तुमच्याकडूनही लोकांना मदत करून पुण्य कमवण्याची ताकद निर्माण होईल.

अनेक प्रकारे तुम्ही दान- धर्म करू शकाल.

ह्याच मुख्य गोष्टींचा विचार करून प्राचीन सनातन सनातन हिंदु ऋषीमुनींनी अशी अनेक सांकेतिक चिन्हे मंदिरे, गुहा, प्राचीन वास्तु, पुरातन ग्रंथ अशाठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत.
प्रत्येक गोष्ट मेहनत करून मिळते असे नाही.

मेहनती बरोबर बुद्धीसुद्धा लागते, दैवी कृपा लागते आणि सिद्धी सुद्धा लागते तरच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होवू शकतो.

ह्या सर्व गोष्टी एकत्र मिळाल्या तरच व्यक्ती सुखी संपन्न आयुष्य जगू शकतो.
प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनी अरण्यात तप साधना करणारे कोणी वैरागी भगवी वस्त्रे घालणारे साधूच नव्हते तर ते अत्यंत बुद्धीमान संशोधक सुद्धा होते.

आजच्या विज्ञानाला सुद्धा अचंबित करणारे विज्ञान शास्त्र प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच शोधून काढले होते.

ह्याची खात्री करायची असेल तर.

प्राचीन विमानशास्त्र, शल्यचिकित्सा ग्रंथ, प्राचीन रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, वैदीक ग्रंथ ह्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

तरच तुम्हाला कळू शकेल की, आपले पूर्वज सनातन हिंदु ऋषीमुनी आणि सनातन सनातन हिंदु संस्कृती आदिकाळापासूनच समृद्धशील होती.



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all