HealthSomething Different
अशी एक महिला आहे की ज्यांनी जग वाचवले आहे
अशी एक महिला आहे की ज्यांनी जग वाचवले आहे…
सुपर हिरो अस्तित्वात नाहीत, पण अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी जग वाचवले आहे..
एक महिला आहे जिने अक्षरशः करोडो लोकांचे जीव वाचविले पण दुर्दैवाने तिच्या मृत्यूपश्चात.
वैद्यकीय क्षेत्रातील एक चमत्कार असणारी ही महिला तिच्या मृत्युनंतर आज ६९ वर्षांनंतर पण लाखो जीव वाचविण्यास मदत करते आहे.
१९५१ सालातील घटना आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स इस्पितळामध्ये हेनरीटा लॅक्स नावाची महिला तपासणीसाठी आली.
तिच्या शरीरावर एक गाठ आली होती. उपचाराचा भाग म्हणून तिच्या शरीरातील काही पेशी (सेल्स) काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या.
डॉक्टरांनी निदान केले की हेनरीटाला एक प्रकारच्या दुर्धर कर्करोगाने ग्रासले होते. त्या काळी वैद्यकशास्त्र जास्त प्रगत नव्हते.
तिच्या रोगावर खात्रीशीर इलाज उपलब्ध नव्हता. पुढे ७ महिन्यांनी तिचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी हेनरीटाच्या ज्या पेशी तपासणीसाठी घेतल्या होत्या त्यांचा अभ्यास करताना डॉक्टरांना एक चमत्कार दिसून आला.
सामान्यतः त्याच्या आधी प्रयोगशाळेत तपासणीसाठी येणाऱ्या मानवी पेशी ह्या काही काळानंतर मृत होत असत. पण तिच्या पेशी प्रत्येक २४ तासानंतर चक्क दुप्पट होत होत्या.
त्या पेशींना सहजासहजी नष्ट करता येत नव्हते. हेनरीटाच्या पेशींचे नमुने पूर्ण देशभरातील प्रयोगशाळांमध्ये संशोधनासाठी पाठविण्यात आले.
हेला (नाव आणि आडनावातील आद्याक्षरावरून) असे नामकरण करण्यात आलेल्या ह्या पेशी पुढे खूप जीव वाचविण्यास कारणीभूत ठरल्या.
पोलिओ रोगावरील लस बनविण्यासाठी ह्या पेशींनी खूप महत्वाची भूमिका बजावली आणि पूर्ण मानवजातीला पोलिओसारख्या दुर्धर रोगापासून वाचविण्यास मदत केली.
जहाल विष, महाभयानक व्हायरस (रोगकारक विषाणू), विविध उपचारांदरम्यान वापरली जाणारी औषधे आणि हार्मोन्स ह्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तपासण्यासाठी “हेला” पेशी महत्वाची भूमिका बजावतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष जिवंत मानवावर प्रयोग न करता शास्त्रज्ञ ह्या सगळ्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासू शकतात.
किरणोत्सर्ग संबंधित अभ्यासामध्ये पण ह्या पेशींचा उपयोग केला जातो.
इतकेच नव्हे तर अगदी काही वर्षांपूर्वी थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसचा बंदोबस्त करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांसाठी हेला पेशींचा उपयोग करण्यात आला.
अशा प्रकारे हेनरीटा लॅक्सने तिच्या मृत्यूपश्चात अप्रत्यक्षपणे जग वाचविले असे आपण म्हणू शकतो. फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते की मानवतेसाठी तिने दिलेले योगदान बघण्यासाठी ती हयात नाही आहे.
टीप: कोणीतरी हा लेख आम्हाला व्हाटसअप्पद्वारे पाठवला होता. लेखक कोण आहेत माहित नाही. माहित असल्यास कृपया कळवावे म्हणजे इतर लेखकांप्रमाणे लेखा खाली लेखकाचे नाव टाकता येईल.
आमच्या प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा