Paper Bag Startup
Paper Bag Startup…
पेपर बॅगचा व्यवसाय…
©मराठी बिझनेस
काही महिन्यांपासून केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक राज्यांत प्लॅस्टिक बंदी घोषित केली आहे. प्लॅस्टिक बंदी आपल्या हातातील सामान नेण्याची पिशवी हद्दपार होत आहे.
त्याला पर्याय म्हणून कागदी किंवा कापडी पिशव्या बाजारात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक नवी आणि स्मॉल स्केल बिझनेस आयडिया तुमच्यासोबत शेअर करतो… ती म्हणजे पेपर म्हणजेच कागदी किंवा कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरु करणे.
या व्यवसाय प्रकारांत गुंतवणूक कमी आणि प्रॉफिट मार्जिन जास्त असल्याने मराठी उद्योजकासाठी ही विन-विन बिझनेस संकल्पना आहे. सध्या भारतातील २९ राज्यांपैकी २५ राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी आहे.
यावरून आपण या बिझनेसचा आवाका किती मोठा आहे हे कळू शकते. आता पाहू या व्यवसायातील काही बारकावे.
पेपर बॅगचा वापर…
कपडे, स्टेशनरी, धान्य, फळं, भाज्या आणि औषधांसारख्या वस्तू बाजारातून घरी आणण्यासाठी आपण सारेच पेपर बॅगचा उपयोग करतो.
आता विचार करा भारतातील किंवा राज्यातील लोकसंख्येचा. किंवा साधं उदाहरण घ्या तुमच्या शहराची लोकसंख्या किती आहे, हे तपासा. तेवढ्या कागदी पिशव्यांची गरज नागरिकांना दर वेळी लागते.
बरं पिशवी एकदा घेतली की आपण ती जतन करून ठेवतो असं नाही, दरवेळी आपल्याला नवीन पिशवी लागते. यावरून हा रनिंग बिझनेस असल्याच आपल्याला ध्यानी येईल.
Paper Bag Startup
पेपर बॅगचा बिझनेस सुरु करण्यासाठी काय आवश्यक आहे…
पेपर बॅगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पेपर बॅग मेकिंग मशीनची आवश्यता आहे. यासाठी मार्केटमध्ये दोन प्रकारच्या मशीन्स उपलब्ध आहेत. Automatic Without Printing तर Automatic With Two Color printing.
Automatic Without Printing ची किंमत पाच लाख रुपये आहे तर दुस-या म्हणजेच Automatic With Two Color printing ची किंमत ६.०५ लाख रुपये आहे. दोघांमधून एका मिनिटाला १२० पेपर बॅग बनून बाहेर येतात.
मशिनव्यतिरिक्त पेपर बॅग बनविण्यासाठी तुम्हाला पेपर रोल, प्रिंटिंग इंक, गम आणि पिशवीचे बंध.
आता पाहू यात पेपर बॅग उत्पादनाची प्रक्रिया…
सर्वप्रथम तुम्हाला हव्या असलेल्या साईझमध्ये पेपरची कटिंग करून मशीनच्या मुखाजवळ ठेवा.
मशीन ऑटोमेटिकली पेपर आत घेऊन बॅग्स तयार होतात.
त्यानंतर प्रिंटरच्या सहाय्याने बॅग्सवरील लोगो किंवा नावं छापली जातात.
पुढे पंचिंगच्या सहाय्याने पिशवीच्या वरील भागावर स्ट्रिंग्ससाठी होल्स बनवले जातात.
त्यानंतर मशीन्सच्या सहाय्याने स्ट्रिंग्स ऍटॅच केले जातात. झाली तुमची पेपर बॅग तयार.
पेपर बॅग्स बिझनेसमधील प्रॉफिट मार्जिन
एक बॅग बनविण्यासाठी प्रोडक्शन कॉस्ट + मटेरियल कॉस्ट + लेबर कॉस्ट पकडून ३ रुपये ४० पैसे लागतात.
हीच बॅग मार्केटमध्ये ३ रुपये ५० पैसे प्रति बॅग अशी विकली जाते.
म्हणजे ०.१० पैसे प्रॉफिट
म्हणजेच महिन्याला ७२,००० हजार रुपये प्रॉफिट मार्जिन या बिझनेसमधून मिळू शकते.
मोठ-मोठे ब्रॅण्ड्स वापरतात पेपर बॅग्स…
वूडलॅन्ड, स्टारबक्स, मॅक्डी, के.एफ.सी. तसेच मोठे फॅशन ब्रॅंड्स पेपर बॅग्स पूर्वीपासूनच वापरतात.
आणि आता प्लॅस्टिक बंदी केल्याने तर गल्लीतही पेपर बॅग्सची मागणी वाढली आहे.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
50 Startup Business Ideas that can be started from Rs.1000 to Rs.50,000(Opens in a new browser tab)
Unique Startup Ideas for India with 20x Faster Growth(Opens in a new browser tab)
Top 7 out of the box Startup Ideas that will Grow in India(Opens in a new browser tab)
Awesome Startup – Rubabdar The Wedding House and Designer Studio(Opens in a new browser tab)
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article. Paper Bag Startup
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Paper Bag Startup