My title My title
Mental Health

Anger control – रागावर नियंत्रण…!

Anger Control – रागावर नियंत्रण…!


©सौ. वैष्णवी व कळसे


प्रत्येकालाच माहिती आहे काय असतो राग आणि प्रत्येकालाच येतो देखील, पण तो राग योग्य व्यक्तीवर, योग्य वेळ बघून, योग्य कारणाकरिता आणि सर्वात महत्वाचं योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं……

ही गोष्ट प्रत्येकाला जमणारी नक्कीच नाहीये…


एखाद्याला सवयच असते चिडायची, कधी समोर कोण आहे याचा विचार करत नाही, कधी काय वेळ आहे ते बघत नाही, कुठे आहोत ते सुद्धा बघत नाहीत.


बरं कुठल्या गोष्टीसाठी आपण किती चिडतोय ते देखील बघत नाही.


खरंच एवढं चिडण्यासारखं कारण आहे का, की बाकी पण कुठल्या गोष्टी साठल्या होत्या आणि आजची चूक फक्त एक निमित्त आहे?


राग ही एक स्वाभाविक गोष्ट नक्कीच आहे आणि अगदी तात्पुरती भावना आहे….


माझ्या मते आपली गोष्ट मनवून घेण्यासाठी जर ही भावना वापरल्या जात असेल तर यापेक्षा दुसरी चुकीची गोष्ट नाही….


आपण चिडतोय आणि समोरचा ऐकून घेतोय याचा अर्थ असा मुळीच होत नाही की आपल्या चुकीच्या गोष्टी मान्य होतील…


खरंतर चूक जेवढी चिडणाऱ्याची असते त्याच्या पेक्षा जास्त ऐकून घेणाऱ्याची असते, ही सवय पक्की होण्यामागे ऐकून घेणाऱ्याचा सर्वात मोठा हात असतो…


वाद टाळण्यासाठी शांत राहण्याची भूमिका घेत आल्यामुळे समोरच्याला चुकीची खात्री पटते…. मनाची सौम्यता म्हणजे भित्रेपणा असा काहीसा समज होत असावा कदाचित…


आणि ह्यात त्याचच नुकसान होतं, समज पण तशी बनत जाते… त्यामुळे कुठलीही परिस्थिती रागानेच सांभाळण्याचा प्रयत्न केल्या जातो…


आपली गोष्ट कोणाला पटत नसेल तर योग्य पद्धतीने समजावून सांगता आली पाहिजे…..


शांततेत बोलून देखील सांगता आलं पाहिजे… सतत रागराग केल्याने डोकं आणि मन अस्वस्थ राहतं…

आपल्या बोलण्याच्या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि तुटली सुद्धा जातात….


अशा स्वभावाने माणूस एकटा पडतो… अशा स्वभाव असलेल्या लोकांची टाळाटाळ केल्या जाते….

मनाने कितीही खरं असून काहीही उपयोग नाही जर कोणाशी कसं बोलावं हे कळत नसेल तर…..


कधीकधी बोलताना आपण चिडून असतो पण ऐकणारा चिडून नसतो, त्यामुळे त्याला दुखावण्यात येत, तरीही तो सतत हाच विचार करेल की असेल कुठला प्रॉब्लेम म्हणून बोलून गेला असेल असं काही….


आपल्याला कोणी बोललेला एक शब्द ऐकल्या जात नसेल आणि बोलायची वेळ आपली असल्यावर जीभ थांबत नसेल तर, समजून जावं आयुष्यात एकटं पडून जगावं लागेल आपल्याला…..


आपणच आपल्यापासून लोकांना दूर करतो. वेळ गेली नसते चुका परत होणार नाही याची काळजी घेऊ शकतो, शांतपणे, समंजसपणे, आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगू शकतो…


उलट काही अडचण असेल तर सल्ला सुद्धा घेऊ शकतो….


आपल्या माणसाला आपल्याकडून कुठला माफीनामा नकोय, फक्त आपलं भलं हवंय…


जेव्हा तो त्याचा स्वाभिमान, त्याच मन, त्याची स्वतःची अडचण, त्याची स्वतःची कामं बाजूला ठेऊन आपलं ऐकत असेल तर तिथे आपण सौम्य भाषाच वापरली पाहिजे, अशा व्यक्तीला शब्दांनी दुखावणं अतिशय चुकीचे….


आपली माणसं गमवायची नसेल तर बोलण्याच्या पद्धतीत बदल आणला पाहिजे….



काही चूक झाल्यास माफी असावी

लेख आवडल्यास Like आणि Share करा.

©सौ. वैष्णवी व कळसे

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button