My title My title
Brain StormingSomething Different

What is Black Friday Sale

Black Friday Sale म्हणजे काय…?



©Varunraj Kalse,



गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांनी Black Friday Sale  हे वाक्य कुठे न कुठे नक्कीच वाचल किंवा ऐकल असेल.

काय आहे हे नक्की आणि Black Friday चा Sale सोबत काय संबध, Black Friday च का White किंवा Red Friday का नाही हे प्रश्न पण अनेकांना पडले असतीलच.

तर मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे तुमच्या साठी या बद्दल पुर्ण माहिती.

या बद्दल मुख्यत: तीन गोष्टी सांगितल्या जातात.

पहिली गोष्ट आहे १८६९ मधली जेव्हा Black Friday शब्द पहिल्यांदा वापरला गेला.

अमेरिकेतल्या दोन मित्रांनी ठरवल की अमेरिकेत असलेले सगळे सोने आपण खरेदी करून घेऊ आणि जेव्हा तुटवडा होईल तेव्हा जास्त भावाने विक्री करु….

आणि त्या प्रमाणे त्यांनी तस केल सुद्धा. त्यामुळे stock मार्केट च्या किमती वाढायला लागल्या.

जेव्हा जेव्हा अशी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने stock मार्केट उच्चांक गाठते आणि तेव्हा नंतर crash होते.

अशीच परीस्थिती भारतात तेव्हा झाली होती जेव्हा हर्षद मेहताने घोटाळा केला होता (त्या बद्दल नंतर कधी तरी लिहीन).

तर मित्रानो अशीच परीस्थिती झाली अमेरिकेतल्या stock मार्केटची तेव्हा हि stock मार्केट कोसळले ते वर्ष होते १८६९ आणि दिवस होता शुक्रवार म्हणुन त्या दिवसाला Black Friday म्हणतात.


itworkss ad with hyperlinkवेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. https://itworkss.in/e-learning/

 


दुसरी गोष्ट अशी की, जुन्या काळामध्ये व्यवसायातला नफा तोटा किती झाला हा रेकॉर्ड ठेवण्यासाठी वही खाता वापरायची पध्दतहोती.

त्या काळी झालेल्या नुकसानाला लालशाई मध्ये लिहिल्या जाई, आणि फायद्याला लिहिले जाई काळ्याशाईने.

अमेरिकेत दर नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरवारी Thanks Giving Day सेलेब्रेट करतात.

मग त्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुकानदारांचा खुप फायदा होतो कारण लोक खुप शॉपिंग करतात.

तर thanks गिव्हिंगच्या नंतर चा फायदा काळ्या शाईमध्ये. म्हणुन सुद्धा याला black friday म्हणतात.



तिसरी गोष्ट आहे १९५० ची जेव्हा Thanks Giving Day च्या नंतर अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया मध्ये Army आणि Navy टीम मध्ये फुटबॉल सामना होणार होता.

मग long वीकएंड म्हटल्यावर साहजिकच mach ला खुप गर्दी होणार असल्याने फिलाडेल्फिया शहरातील पोलीसखात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या.

कारण हा फुटबॉल सामना पाहण्यासाठी पुर्ण देशातून लोक येणार म्हणजे गर्दी, ट्राफिक आणि होणारे गुन्हे टाळण्यासाठी पोलीसखात्यातील सर्व कर्मचाऱ्यांची गरज पडणार होती.

आणि त्यांना त्यांच्या परिवाराला वेळ देणे जमणार नव्हते म्हणुन त्यांनी या शुक्रवार ला Black Friday अस नाव दिल.

अश्या प्रकारे Thanks Giving Day च्या दुसऱ्यादिवशी येणाऱ्या शुक्रवारला दरवर्षी लोक Black Friday म्हणू लागले.

त्या नंतर अमेरिकेतील दुकानदार आणि व्यावसायिकांनी ठरवल की Thanks Giving Day च्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ते खुप discount देतील.

कारण या दिवशी लोक खुप जास्त खरेदी करतात. आणि लोकांना खरेदी करण्यासाठी अजून प्रोत्साहन म्हणुन दुकानदार आणि व्यावसायिक डिस्काउंट देऊ लागले.

आणि त्या नंतर हे दरवर्षी घडू लागल. आणि त्यांचे वही खाते Thanks Giving Day नंतर काळ्याशाई ने भरू लागले.

Black Friday अमेरिका, ब्रिटन, युरोपिय देशांमध्ये इतका चालतो की अरबो रुपयांची खरेदी केल्या जाते.

तसच हा वर्षभरातल्या केलेल्या खरेदीचा खुप मोठा हिस्सा असतो.

आजकाल भारतात हि अनेक Multinational कंपन्या त्यांची उत्पादने विकत आहेत.

त्यामुळे भारतीय लोकांना हि हा Black Friday Sale वाचायला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे.



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button