Itworkss

The IKEA EFFECT

July 25, 2021 | by Varunraj kalse

The IKEA EFFECT

IKEA EFFECT



© टीम नेटभेट



मित्रांनो, काय तुम्हाला IKEA या ब्रॅण्डबद्दल माहिती आहे ?



‘आयकिया’ हा जगातील सर्वात मोठा फर्निचर रिटेलरचा ब्रॅण्ड आहे.

या ब्रँडची खासियत अशी आहे की यांच्याकडून खरेदी केलेल्या फर्निचरची जोडणी ग्राहकांना स्वतःला करावी लागते.


अर्थात, या ब्रँडकडे प्रीअसेम्बल्ड, म्हणजे नीट जोडणी केलेली, लगेच वापरता येतील अशी उत्पादने नसतात.

या कंपनीकडे अशी उत्पादने विक्रीसाठी असतात ज्यांच्या जोडणीचं काम ग्राहकांसाठी राखून ठेवण्यात आलेलं असतं.


ही या ब्रँडची खरोखरीच एक अत्यंत स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल.

याचं कारण या स्ट्रॅटेजीमुळे कंपनीचा कामगारांवर होणारा खर्च, पॅकींगवर होणारा खर्च आणि मालवहातूकीचा खर्च आपोआपच कमी होतो.


त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा हेतूही साध्य होतो तो म्हणजे, कंपनीच्या उत्पादनांशी ग्राहक अधिक मायेने जोडला जातो.


कारण, एकदा का एखादं उत्पादन या कंपनीकडून खरेदी केलं की ग्राहक ते घरी नेतात आणि मग निवांतपणे स्वतःच्या हातांनी त्या उत्पादनाची जोडणी करतात.


त्यामुळेच जेव्हा जोडणी पूर्ण होऊन ते उत्पादन ते बघतात तेव्हा त्यांना त्या उत्पादनाविषयी काकणभर अधिकच प्रेम वाटतं.

तसंच त्या उत्पादनाचं ते जरा जास्तच कौतुक करतात.


असं होण्याचं कारण म्हणजे, जेव्हा त्या उत्पादनाची ग्राहक स्वतः जोडणी करतो तेव्हा तो त्यात भावनिकरित्या अधिक गुंततो.. आणि त्यामुळेच त्याला या ब्रँडविषयी अधिक प्रेम वाटते.


गंमत म्हणजे, आता प्रत्येकच ब्रँडने हा ‘आयकीआ इफेक्ट’ आपल्याही ब्रँडच्या बाबतीत लागू होतो का हे तपासताना ही संज्ञाच वापरायला सुरू केली आहे ! ‘ ये हुई ना बात ..!!’


लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा


© टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

Source :Whatsapp

RELATED POSTS

View all

view all