10 Rules to Raise Your Standard of Living
August 14, 2021 | by Varunraj kalse

How to Raise Your Standard of Living
गुरु गोपालदास यांच्या YouTube वरील प्रबोधनाचा मुक्त संक्षिप्त अनुवाद ..
1. Follow the change –
नेहमी बदलाला सामोरे जा – आपण जर बदलत्या काळानुरूप आपल्या ज्ञानात भर टाकण्याचे कष्ट उचलत नाही गेलो तर या जगाच्या शर्यतीतून आपण बाहेर फेकले जाऊ.
हा नियम उद्योगधंदा आणि अध्यात्म या दोन्ही क्षेत्रांना लागू होतो.जीवनाची मुलतत्वे,आदर्श,ज्ञान,शहाणपण या गोष्टींना पर्याय असू शकत नाही.
फक्त बदलत्या काळानुसार लोकांच्या काळजाला भिडणाऱ्या स्वरुपात ते उलगडावं लागतं एवढंच…
2. Live in the now –
वर्तमान जगा – आपल्या आयुष्यात आपल्या वाट्यास येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना मिठीत घ्यायचा रियाज चालू ठेवा.
आपण जेव्हा सुखासीन कालावधीतून जात असतो तेव्हा पुण्याईत भर टाकण्याची कामे करीत राहिलो तर नंतर खडतर काळांत सैरभर हात फिरवावे लागणार नाहीत…
एक सुंदर विचार आहे… जेव्हा तुम्ही शांतता असताना घाम गाळत राहिलात तर ऐन युद्धात तुम्हाला जादा रक्त सांडावे लागत नाही…
3. Increase the standard of your life –
जगताना आपले राहणीमान उंचवा – आपण आयुष्यात सुखाच्या नि सौख्याच्या व्याख्या करण्यात नेहमीच गफलत करीत राहतो.
आपलं सुख कुठल्या ना कुठल्या नात्याशी वा उपभोग घ्यायच्या वस्तूंशी तोलत असतो.
आपण VOLKSWAGEN OR BENTLEY कार नी प्रवास केला तरी दोघांसाठी रस्ता तोच असतो.
SAMSANUNG OR IPHONE X फोनवर बोललो तरी समोरची बोलणारी व्यक्ती तीच असते.
ECONOMY OR BUSINESS CLASS ने प्रवास केला तरी दोघांचे पोहोचण्याचे ठिकाण तेच असते.
FASTTRACK OR OMEGA OR ROLEX घड्याळ घातले तरी दोघांसाठी काळवेळ तीच असते.
आपण आपलं जगण्याचं राहणीमान उंचावण्याचा नादात जगणं विसरून गेलोय.
आपलं जगण्याचं राहणीमान उंचावत जाईल,उजळत राहील आणि रोजचे रोज नव्याने नव्या पायरीवर जाईल याबाबत जरूर जरूर प्रयत्न करीत जा.
पण विनंती एकच हे करीत असताना जगताना आपल्या आतल्या आवाजाशी फारकत घेणारी कुठलीही तडजोड, समझौता करू नका.
आपल्याला आपलं राहणीमान आनंदी करीत नसतं तर आपलं सार्थ जगणं आनंदी करीत असतं. UTILITY VALUE आणि HAPPINESS VALUE यातली पारख करायला शिका.
आपल्याजवळची श्रीमंती आजमावयाची असेल तर आपल्यापाशी पैश्यानं विकत न घेता येण्यासारख्या किती वस्तू आहेत याची मोजदाद करायला लागा…
आणि तुम्ही जेव्हा आश्रूचा एक थेंब गाळता तेव्हा किती हात ते पुसायला पुढं आले यावर तुमची श्रीमंती कळून येते.
आपला आयुष्य आपल्याजवळील भोगवस्तूंच्या यादीवर सार्थकी लागत नसतं तर आपण जोडलेल्या नात्याच्या देखणेपणावर ते सार्थकी लागत असतं…
आपला नात्यातील गहिवर, गलबलणं, हुरहूर, ओलावा,घट्ट मिठी या साऱ्यां गोष्टीत आयुष्यभराचा आनंद गवसत असतो.
पण दुर्दैव कि आपण नेमकं रहाणीमान उंचावण्याच्या शर्यतीत उतरून या गोष्टींना बेदखल करीत चालत असतो.
4. Find balance –
सुवर्णमध्य शोधत रहा – आपण आपलं बाह्य दर्शन देणारं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी जेवढी यातायात करतो.
तेवढीच यातायात आपण ईश्वरी अंश असणारा आपल्यातील आत्माराम दुखावला जाणार नाही यासाठीसुद्धा करायला हवी.
कारण आपलं व्यक्तिमत्व म्हणजे जगाला दिसणारी आपली सावली आहे नि आपलं चारित्र म्हणजे आपण स्वत: जे आहोत ते..
5. Have hope –
नेहमी आशावादी रहा – सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीचा कानाला खडा लावून घ्यायचा कि आपल्या आयुष्यात आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडणार आहेत.
तेव्हा सतत माझ्या मक्तेदारीनुसार सारं घडावं यासाठीचा जीवघेणा आग्रह बाजूला सारायचा.
कारण जर आपण हे केलं नाही तर ज्या ज्या वेळी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत जातील तेव्हा आपण नाउमेद होऊन निराशाग्रस्त होत जातो.
इथल्या प्रत्येक जीवाचा आपापला एक दिवस नक्की येणार असतो नि तो दिवसही मावळणारा ही असतो याचं भान राखायचं.
आपल्या जवळची तत्वनिष्ठा,मूल्य नि नैतिकता याच्या बळावर अशा प्रसंगातून बाहेर पडताना आपल्या अंगी संयम आणि चिकाटी बळावत जात असतात.
6. Choose greatness –
नेहमी मोठेपणा निवडत जा – आपल्या आयुष्यातील काही काही गोष्टी नियतीची देण असते. त्याचा निमुटपणे कृपाप्रसाद म्हणून स्वीकार करायचा…
त्यात बदल करणं आपल्या आवाक्यात कदापीही शक्य नसतं…
परंतु त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीने सामोरे जातो ही आपली प्रतिक्रिया आपली भविष्यासाठीची नियती होत जाते असते आणि प्रतिक्रिया देताना निवड करण्याची आपणाला मुभा दिलेली आहे.
तेव्हा नेहमी दर्जेदार विचार नि आचार यांची बियाणी वरचेवर टोकत जा…
एक वर्ष पाऊस दगा देईल… एक वर्ष कीड दगा देईल…
पण त्यानंतर एक दिवस तेथे मधुर फळांनी लगडलेलं झाड उभं दिसेलच.तेव्हा खचून न जाता निरंतर कर्मयोग करीत रहा…
7. Prioritize mindfulness –
जागरूक मानसिकतेला प्राधान्य देत रहा – आपण सचेतन आणि अचेतन मनाचा सुरेख समागम साधला कि आपण अंतर्बाह्य जागरूक राहतो.
आपली सचोटी, जीवनमूल्ये नि नितीमत्ता सदैव कुठल्याही अग्निपरीक्षेला तयार राहून पारखून निघतात.
8. Be the best version of yourself –
नेहमी आपली उच्चप्रतीची पेशगी होत राहील यासाठी दक्ष रहा – नेहमी स्वत:ला अद्यावत ठेवत चला.
आणि आयुष्यात आपल्याला इतर कुणाच्या पुढे जायचं नसून.
आपली स्पर्धा नेहमी आजच्या आपल्याशी ठेवून रोज उठल्यावर आरश्यात कालच्यापेक्षा आज आपण कांकणभर वरच्या श्रेणीत असल्याचं दिसायला हवं.
9. Transform currency to happiness –
आपल्यापाशीच्या धनराशीच्या बदल्यात आनंद मिळवा – पैश्याची कैक रूपे आहेत…
शाळेत – देणगी. देवळात – दान . लग्नात – हुंडा. घटस्फोटात – पोटगी.
दुसऱ्याला देणं असणं – ऋण .सरकारी देणी – कर. कोर्टात – दंड. निवृत्तीनंतर – निवृत्तीवेतन. मालक कर्मचारी – पगार.
मालक सेवक – रोजगार, पालक मुलं – भत्ता, बँकेकडून – कर्ज. सेवेनंतर खुशीत देणे – टीप. अपहरणकर्त्यास देणे – खंडणी.
गैरमार्गाने मिळकत – लाच. आणि इतरांच्या कल्याणासाठी नि सेवेसाठी वापर – आनंद.
पैसा बाळगून असण्यात काहीही चुकीचं नाही. पण ते वाईट ठरतं जेव्हा तो पैसा तुम्हाला बाळगून जायला लागतो.
तेव्हा पैसा मिळवा…
आपल्या गरजा भागविण्यासाठी तो खर्च करा आणि पडून रहाणारा पैसा गरजूंच्या कल्याणासाठी नि सेवेसाठी वापरा म्हणजे त्या पैश्याचं आनंदात रुपांतर होईल.
10. Find your drive –
ईश्वर आणि गुरूंच्या कृपाप्रसादाचा लाभ घेत या जन्माचं सोनं करण्याची आपापली आगळीवेगळी वाट शोधा.
वरीलप्रमाणे सर्व गोष्टी करत रहा तुमचा Standard of Living वाढत राहील…
मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
www.it-workss.com
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
