Itworkss

WhatsAppचं Reaction फिचर Launch; मार्क झुकरबर्गकडून बातमी प्रकाशित

May 5, 2022 | by Varunraj kalse

WhatsAppचं Reaction फिचर Launch;

मार्क झुकरबर्गकडून बातमी प्रकाशित

Digital Ritesh

Whatsapp’s New Feature : सध्या अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) platform चा वापर करतात. सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या पोस्ट देखील शेअर करतो. Whatsapp या Appचा वापर लोक Chatting करण्यासाठी करतात. या App मधील डिपी सेट करणे, मेसेज पाठवणे, स्टेटस अपलोड करणे अशा फिचर्सचा (Whatsapp Features) वापर अनेक लोक सध्या करत आहेत. पण Meta कंपनीचा सीइओ मार्क झुकरबर्गनं (Mark Zuckerberg) नुकतीच Whatsapp च्या नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमुळे आता इमोजीद्वारे Reactions देता येणार आहेत. 

Whatsappचे युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून Reaction फिचरची उत्सुकतेनं वाट पाहात होते. Whatsappच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमोजीचा वापर केवळ चॅटिंगमध्ये केला जायचा पण आता नव्या फिचरमुळे तुम्ही मेसेजला Reaction देऊ शकणार आहात. मार्क झुकरबर्गनं शेअर करून आता हे फिचर लाँच झाल्याबाबत माहिती दिली आहे. मार्कनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये सहा इमोजी दिसत आहेत. यामध्ये थम्स-अप, हार्ट, लाफिंग, सरप्राइज, सॅड आणि नमस्कार असे इमोजी आहेत.

मार्क झुकरबर्गची पोस्ट

dd0c44db380d6cfb6cd4a33d62181e8e original

सध्या मेसेजला Reaction देण्यासाठी Whatsapp युझर्स या सहा इमोजींचा वापर करू शकणार आहेत. हे नवं फिचर वापरण्यासाठी तुम्हाला Whatsappचे  लेटेस्ट व्हर्जन playstore मधून  अपडेट करावे लागणार आहे. तुमचे Whatsapp अकाऊंट अपडेट झालं की तुम्ही या सहा इमोजींचा वापर Reaction देण्यासाठी करू शकता.  

RELATED POSTS

View all

view all