मोफत असलेल्या या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या पीपीटीसाठी लागणारे सगळे घटक मुबलक पर्यायांसह उपलब्ध आहेत.
तुम्ही तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे टेम्पलेट स्वरूपात डाऊनलोड करू शकता किंवा गुगल स्लाईड थीम म्हणून ऑनलाईनही वापरू शकता.
पीडीएफ, जेपीजी, पीएनजी अशा अनेक स्वरूपातही तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन एक्सपोर्ट करता येतं. तुमच्या फोन वा टॅबवरूनही तुम्हाला ते करता येतं आणि शेअर करण्याचाही पर्याय मिळतो.
फॉर्मल, इन्स्पिरेशनल, सिंपल, स्टार्टअप, मार्केटींग, मिनीमॅलिस्ट वगैरे असंख्य प्रकारचे टेम्पलेट्स यावर उपलब्ध आहेत.
अडॉबतर्फे सुरू असलेल्या या साईटवर तुम्ही स्वतःची कल्पकता वापरून तुमचं प्रेझेंटेशन बनवू शकता.
अगदी फोटोंपासून ते एनिमेशनपर्यंत सगळं काही या साईटवर तुम्हाला स्वतःला कल्पकतेने वापरायला मिळतं.
या साईटचा एकमेव ड्रॉबॅक म्हणजे यावर नेमकं काय फ्री आहे आणि काय सशुल्क आहे त्याबाबत नीट विभागणी केलेली नाही, त्यामुळे आपल्याला त्याबाबत नीट माहिती करून मग ते फीचर वापरावं लागतं.