My title My title
Education

Websites to Create PowerPoint Templates

Websites to Create PowerPoint Templates



©टीम नेटभेट



कॉर्पोरेट जगतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे एखादा मुद्दा, एखादा विषय उत्तमरित्या एक्सप्लेन करण्यावर भर दिला जातो.

याचं कारण, या माध्यमातून, आपल्याला ग्राफीक्सच्या सहाय्याने मॅप्स, चार्ट्स वगैरे वापरून नेमकेपणाने आपला विषय मांडता येतो व तो दुसऱ्यांना नीट कळतो.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चार अशा फ्री वेबसाईट्स ज्यावरून तुम्हीही तुमचे पीपीटी उत्तम बनवू शकता.



1.SlidesCarnival (https://www.slidescarnival.com/)

मोफत असलेल्या या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या पीपीटीसाठी लागणारे सगळे घटक मुबलक पर्यायांसह उपलब्ध आहेत.

तुम्ही तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे टेम्पलेट स्वरूपात डाऊनलोड करू शकता किंवा गुगल स्लाईड थीम म्हणून ऑनलाईनही वापरू शकता.

पीडीएफ, जेपीजी, पीएनजी अशा अनेक स्वरूपातही तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन एक्सपोर्ट करता येतं. तुमच्या फोन वा टॅबवरूनही तुम्हाला ते करता येतं आणि शेअर करण्याचाही पर्याय मिळतो.

फॉर्मल, इन्स्पिरेशनल, सिंपल, स्टार्टअप, मार्केटींग, मिनीमॅलिस्ट वगैरे असंख्य प्रकारचे टेम्पलेट्स यावर उपलब्ध आहेत.



2.Behance(https://www.behance.net/search/projects?search=Powerpoint )

अडॉबतर्फे सुरू असलेल्या या साईटवर तुम्ही स्वतःची कल्पकता वापरून तुमचं प्रेझेंटेशन बनवू शकता.

अगदी फोटोंपासून ते एनिमेशनपर्यंत सगळं काही या साईटवर तुम्हाला स्वतःला कल्पकतेने वापरायला मिळतं.

या साईटचा एकमेव ड्रॉबॅक म्हणजे यावर नेमकं काय फ्री आहे आणि काय सशुल्क आहे त्याबाबत नीट विभागणी केलेली नाही, त्यामुळे आपल्याला त्याबाबत नीट माहिती करून मग ते फीचर वापरावं लागतं.



3.GraphicPanda ( https://graphicpanda.net/ )

या साईटवर फ्री पॉवर पॉईंट टेंपलेट्स, कीनोट टेम्पलेट्स आणि गुगल स्लाईड्स थीम्स आहेत. पीपीटी प्रेझेंटेशन टेंपलेट्स फ्री उपलब्ध आहेत.

प्रोफेशनल, क्रिएटीव्ह आणि एडीट करण्यास अत्यंत सोपे असे विविध विषयांवरचे टेम्पलेट्स यावर सापडतात. अनेक टेम्प्लेट्स मोफत आहेत तसंच सशुल्कही आहेत.

काही टेम्प्लेट्स सोशलमीडियावर शेअर केल्यानंतरच डाऊनलोड करता येतात.



4.HiSlide (https://hislide.io/)

या वेबसाईटवरही मोफत पॉवर पॉईंट टेम्पलेट्स उपलब्ध आहेत आणि ते इतके सुंदर आहेत की तुमच्या ग्राहकांना तुमची प्रेझेंटेशन्स भुरळ पाडल्यावाचून रहाणार नाहीत.

त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला सबस्क्रीप्शन घ्यावं लागतं किंवा सोशल बडीजबरोबर तुम्हाला त्यांच्या साईटची लिंक शेअर केल्यानंतरच तुम्ही ही साईट वापरू शकता.

पीपीटीबरोबरच कीनोट टेम्पलेट्सही त्यावर उपलब्ध आहेत.



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com



आमच्या  प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button