Something Different
Why is there a Tradition of wake up at Brahma Muhurat
ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची परंपरा का आहे?
©Anna
रात्रीच्या शेवटच्या प्रहरानंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. सनातन हिंदु ऋषी मुनींनी याचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यांच्या अनुसार ही वेळ निद्रा त्यागासाठी सर्वोत्तम आहे.
ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी व स्वास्थ्य प्राप्ती होते. सूर्योदय पासून 4 घटका (जवळपास दीड तास) अगोदर ब्रह्म मुहूर्तावर उठायला हवं.
यावेळी झोपणे शास्त्र निषिद्ध आहे.
ब्रह्म मुहूर्त म्हणजे अनुकूल वेळ. रात्रीचा अंतिम प्रहर म्हणजे पहाटे 4 ते 5.30 च्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.
“ब्रह्ममुहुर्तावर झोपणे म्हणजे पुण्यक्षयकारण”।
(ब्रह्ममुहुर्तावेळीची निद्रा ही पुण्य नाश करणारी होय)
“अमृत वेळ” ईश्वर भक्ती साठीची ही वेळ श्रेष्ठतम आहे. या वेळी उठल्याने सौंदर्य, लक्ष्मी, बुद्धी, स्वास्थ्य प्राप्ती होते. मन शांत व शरीर पवित्र होते, फक्त आळस मोडला पाहिजे .
पौराणिक महत्व — वाल्मीकी रामायणानुसार श्रीहनुमान ब्रह्ममुहूर्त वेळी अशोक वाटीकेला पोहोचले होते. जिथे वेद मंत्र पठन करत माता सीता होत्या.
शास्त्रात उल्लेख आहे–
वर्णं किर्तीं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥
अर्थ- ब्रह्म मुहूर्त वेळी उठल्यास व्यक्तिला सुंदरता, लक्ष्मी, बुद्धी, स्वास्थ्य, आयु प्राप्त होते.
ब्रह्म मुहूर्त व प्रकृति :–
ब्रह्म मुहूर्त व प्रकृतीचे घनिष्ठ नाते आहे. या वेळी पशु- पक्षी जागे होतात. त्यांचा मधुर किलकीलाट सुरू होतो. कमळाचे फुल ही फुलते, कोंबडे अरवतात, प्रकृती ब्रह्म मुहूर्त वेळी चैतन्यमय होते, प्रकृती आपल्याला संदेश देतो ब्रह्म मुहूर्तवेळी उठण्याचा.
यामुळे मिळते सफलता व समृद्धी-
आयुर्वेदनुसार ब्रह्म मुहूर्तावर उठून व्यायाम/ चालणे म्हणजे शरीरात संजीवनी शक्तिचा संचार होणे. म्हणून यावेळी वाहणारे वारे अमृततुल्य म्हटले आहे म्हणून म्हणतात की, ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्तम मानली आहे. रात्री झोपून सकाळी उठल्यावर शरीर व मस्तिष्क/ मेंदू स्फूर्तीने व तजेलदार राहते.
ब्रह्ममुहुर्ताचे धार्मिक, पौराणिक व व्यावहारिक पैलू व लाभांची माहिती करून घेतल्यावर या शुभ वेळी उठलात तर चांगले परिणाम मिळतील.
ब्रह्म मुहूर्तावेळी उठल्याने व्यक्ती सफल, सुखी व समृद्ध होतो, का???
कारण दिवसभराच्या कामांचे नियोजन करण्यासाठी प्रसन्न वेळ मिळतो. यामुळे फक्त जीवन सफलच होत नाही तर शरीर व मन तजेलदार राहते. विद्यार्थ्यांना एकाग्रता लाभते, आजार कमी होतात.
वेदातही ब्रह्म मुहुर्तावर उठणे व त्याचे लाभ संगीतले आहेत.
प्रातारत्नं प्रातरिष्वा दधाति तं चिकित्वा प्रतिगृह्यनिधत्तो।
तेन प्रजां वर्धयमान आयू रायस्पोषेण सचेत सुवीर:॥ -ऋग्वेद-1/125/1
अर्थात- सूर्योदयापूर्वी उठणे ही गोष्ट बुद्धिमान लोक व्यर्थ घालवत नाहीत. यावेळी उठल्याने स्वास्थ्य, सुख, मनः शांती व दीर्घायुष्य लाभते.
यद्य सूर उदितोऽनागा मित्रोऽर्यमा। सुवाति सविता भग:॥ – सामवेद-35
अर्थात- व्यक्तिला सूर्योदयापूर्वी शौच व स्नान करायला हवे. त्यानंतर भगवंताची उपासना केली पाहिजे. यावेळी शुद्ध व निर्मळ हवेने स्वास्थ्य व संपत्ती वृद्धी होते.
उद्यन्त्सूर्यं इव सुप्तानां द्विषतां वर्च आददे।
अथर्ववेद- 7/16/२
अर्थात- सूर्योदयानंतर उठल्याने तेज नाहीसे होते.
व्यवहारीक महत्व –
व्यवहारीक रूपी चांगले आरोग्य मिळण्यासाठी ब्रह्ममुहूर्त उत्तम. रात्रीच्या झोपेनंतर शारिरीक व मानसिक थकवा उतरल्यावर डोके शांत व स्थिर राहते, विचारांना दिशा मिळण्यासाठी पोषक वातावरण मिळते.
जैविक वेळेवर आधारित शरीर दिनचर्या-
पहाटे 3 ते 5- या वेळेला जीवन- शक्ति विशेष रूपाने फुफ्फुसात असते. थोडे कोमट पाणी पिऊन मोकळ्या हवेत फिरणे व प्राणायाम करणे योग्य. दीर्घ श्वसन केल्याने फुप्फुसाची कार्यक्षमता विकसित होते. शुद्ध वायु (ऑक्सीजन) व ऋण आयन विपुल मात्रेत मिळते त्याने शरीर स्वस्थ व स्फूर्तिमान होते. ब्रह्म मुहुर्तावेळी उठणारे लोक बुद्धिमान व उत्साही होतात.
पहाटे 5 ते 7- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी आतड्यात असते. 7 नंतर मल- त्याग केल्यास आतड्यांचे आजार उद्भवतात .
सकाळी 7 ते 9- या वेळेला जीवन- शक्ति विशेष रूपी आम्लपित्ताशयात असते. या वेळी पाचक रस अधिक बनतो. भोजन करण्यासाठीची वेळ व भोजन करताना अधेमधे थोडं कोमट पाणी प्यावे.
सकाळी 11 ते दुपारी 1- या वेळी जीवन- शक्ति विशेष रूपी हृदयात असते.
दुपारी 12 वाजता- या मध्यानावेळी संध्या (आराम) करण्याचे संस्कृतीमध्ये विधान आहे.
म्हणून भोजन वर्जित आहे. या वेळी हलके पदार्थ घेऊ शकता, जसे मठ्ठा / ताक / दही खाऊ शकता.
दुपारी 1 ते 3- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी छोट्या आतड्यात असते. याचे कार्य म्हणजे आहारातून मिळालेली पोषक तत्त्व शोषण करणे व व्यर्थ पदार्थ मोठ्या आतड्याकडे ढकलणे, भोजनानंतर तहानेनुसार थोडे कोमट पाणी प्यावे. यावेळी भोजन केल्यास अथवा झोपल्यास पोषक आहार- रस शोषण करण्यात विरोध होतो. यामुळे शरीर रोगी, दुर्बल होते.
दुपारी 3 ते 5- या वेळी जीवन- शक्ति विशेष रूपी मूत्राशयात असते.
2- 4 तासापूर्वी पिलेले पाणी यावेळी मूत्र- त्यागाच्या वृतित असते.
सायंकाळी 5 ते 7- या वेळी जीवन- शक्ति विशेष रूपी किडणीत असते. यावेळी हलके भोजन सूर्यास्तापूर्वी 40 मिनिटे अगोदर करावे. सूर्यास्तानंतर भोजन वर्ज्य. या भोजनानंतर 3 तासांनी दूध पिऊ शकता. कारण सूर्यास्तानंतर दूध पचन होण्यासाठी आवश्यक एन्झाईन शरीरात तयार होते. रात्रीचे भोजन वर्ज्य, कारण ते सुस्ती आणते.
रात्री 7 ते 9- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी मेंदूत कार्यरत असते.
यावेळी मेंदू सक्रिय असतो. प्रातः काळ याव्यतिरिक्त ह्या वेळी वाचन केले की स्मृतीत राहते. हे विज्ञानात सिद्ध झाले आहे.
रात्री 9 ते 11- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी मूलाधार चक्र (माकड हाड) मध्ये स्थित मज्जारज्जू मध्ये असते. यावेळी डाव्या कुशीवर होऊन आराम करण्याने मज्जारज्जूला प्राप्त शक्ती ग्रहण करण्यासाठी मदत मिळते, यामुळे झोप ही चांगली लागते. यावेळचे जागरण शरीर व बुद्धीला थकवते. यावेळी जेवण केल्यास सकाळपर्यंत जठरात राहते ते पचत नाही व सडून आजार निर्माण करते ऍसिड तयार होते.
रात्री 11 ते 1- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी पित्ताशयात असते. यावेळचे जागरण म्हणजे पित्त- विकार, अनिद्रा , नेत्ररोग उत्पन्न करते व वृद्धपकाळ लवकर येतो. यावेळी नवीन पेशी तयार होत असतात.
रात्री 1 ते 3- यावेळी जीवन- शक्ति विशेष रूपी लीव्हर मध्ये असते. अन्नाचे सूक्ष्म पचन करणे हे यकृताचे कार्य आहे.
यावेळेस जागरण हे यकृत (लीव्हर) व पचन- तंत्र बिघडवते. दृष्टि मंद होते व शरीराची प्रतिक्रिया मंद होते.
टिप-
ऋषी व आयुर्वेदाचार्य यांनी सांगितले आहे की, भूक लागली नसेल तर भोजन वर्जित आहे.
वरील सूचनेनुसार भोजन करावे, जमिनीवर बसूनच भोजन करावे. याने मूलाधार चक्र सक्रिय होऊन जठराग्नी प्रदीप्त राहतो.
खुर्ची / उभं राहून भोजन केल्याने पचनशक्ती कमजोर होते.
उभं राहून जेवल्यावर अत्यंत घातक परिणाम असतात.
ʹबुफे डिनर/ लंचʹ पासून सावधान.
पृथ्वीच्या चुम्बकीय क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी डोके पूर्व वा दक्षिण दिशेला करावे. नाहीतर निद्रानाश होतो.
आजकाल सापडणारे अधिक रोगाचे कारण अस्त- व्यस्त दिनचर्या व विपरीत आहार.
दिनचर्या ही शरीराच्या जैविक स्थिती अनुरूप बनवल्याने शरीराचे विभिन्न अंग सक्रिय होऊन लाभ होतो. या प्रकारे थोड़ीशी जागरूकता आपले जीवन स्वस्थ बनवते.
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा




