Itworkss

ओला कंपनीचे सीईओ चक्क नाचले ‘बिजली’ गाण्यावर; नव्या फिचरचं अशा प्रकारे केलं टेस्टिंग

April 22, 2022 | by Varunraj kalse

ओला कंपनीचे सीईओ थिरकले ‘बिजली’ गाण्यावर; नव्या फिचरचं केलं टेस्टिंग

 

ओलाने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये moveOS2.0 नावाची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम दिलंय. आणि याच ऑपरेटिंग सिस्टीम मुळे आता युजर्स ना म्युझिक चा आनंद घेता येणार आहे… आहे ना हि मजेशीर बातमी???

म्हणजेच आता इथून पुढे प्रवासादरम्यान कुठलाही ओला स्कूटर वापरकर्ता बोर होणार नाहीये.. त्याचं मनोरंजन करण्याची सोय ओला ने करून ठेवलीये. या नवीन फिचर ची घोषणा करताना ओला कंपनीचे को-फाऊंडर Mr. Bhavish Aggarwal (भाविश अग्रवाल) यांनी खास गाण्यावर थिरकून आनंद साजरा केलाय..

ओला कंपनीच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग विभागाचे प्रमुख स्लोकार्थ डॅश यांच्यासोबत हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच भाविश अग्रवाल यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर देखील दिसत आहे. भाविश अग्रवाल यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘MoveOS 2 या म्युझिक फिचरचं फाईनल टेस्टिंग करत आहे.’

अनेक नेटकऱ्यांनी भाविश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘ MoveOS 2.0 सारखे अमेझिंग मुव्ह्ज’..

RELATED POSTS

View all

view all