
Mystery of Time Loop
©प्रथम वाडकर
सदर घटना फिलीपीन्स मधे फॉरेस्ट डिपार्टमेंट मधे काम करणाऱ्या फॉरेस्ट ऑफिसर सोबत घडली होती.
हा फॉरेस्ट ऑफिसर आपल्या पाळीव कुत्र्या सोबत नेहमी प्रमाणे पेट्रोलिंग करण्यासाठी जंगलात गेला होता.
बरयापैकी चालल्या मुळे खूप थकला होता.
सहज त्याची नजर तेथे असलेल्या एका अर्धवट जिन्या कड़े गेली हा जीना याआधी त्या जागेवर किवा जंगलात त्याने कुठेही पाहीला नव्हता.
पण चालून थकल्या मुळे दोन क्षण त्या जिन्यावर बसाव आणि परत माघारी फिराव अस ठरवून तो त्या जिन्या कड़े जायला निघाला.
पण त्याच्या बरोबर असलेला त्याचा पाळीव कुत्रा मात्र काही केल्या त्याला त्या जिन्याकड़े जाऊ देइना.
तो कुत्रा त्या जिन्या कड़े पाहून भूंकत आणि त्या ऑफिसर ला मागे फिरण्यासाठी पायात घूटमळत तर दाताने त्याची पैंट खेचत होता.
पण थकलेला तो ऑफिसर 5 मिनिट जरा विश्रांति घेऊ आणि जाऊ या विचाराने कुत्र्याला न जुमनता त्या जिन्यावर जाऊन बसला फक्त 5 मिनिट…
कुत्रा तो बसल्यावर तेथून धावत दूर निघुन गेला.
हा फॉरेस्ट ऑफिसर 5 मिनिट बसून पुन्हा ऑफिस कड़े जायला निघाला.
जेव्हा तो परत आपल्या कामाच्या ठिकाणी आला तेव्हा इतर कर्मचारी त्याला पहातच राहीले.
स्टाफ ने त्याच्या घरी फोन करून फॅमिलीला बोलावून घेतले.
जेव्हा घराच्यांनी त्याला पाहीले तेव्हा घरचे अनंदाने थक्क होत पहात राहिले, स्टाफ,फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलिस डिपार्टमेंट सगळे त्याच्या येण्याने थक्क झाले होते व आनंदित ही झाले होते.
त्या सर्वाना असे आश्चर्यचकित झालेले पाहून या फॉरेस्ट ऑफिसर ला काही कळेना की हे सर्व असे आश्चर्यचकित होऊन का पहात आहेत…?
त्याने न राहावून त्या सर्वाना कारण विचारले तेव्हा त्या सर्वांनी त्याला एकच प्रश्न विचारला.
की गेली 5 वर्ष तू होतास कुठे?
त्या सर्वांनी आता त्याच्या वर प्रश्नचिन्ह उपस्तित केली होती त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट व लोकल पोलिस मिळून पाँच वर्ष कसून शोधत होते.
पण कोणाला ही तपासात यश आले नव्हते शेवटी पोलिसांनी अनसॉल्व केस म्हणून फाइल क्लोज केली होती.
पण तो फॉरेस्ट ऑफिसर हे ऐकून त्याला भोवळ यायची बाकी होती.
मि पाँच वर्ष गायब होतो कस शक्य आहे? मि आताच पेट्रोलिंग करून आलोय,जरा थकलो होतो म्हणून त्या अर्धवट जिन्यावर बसलो होतो बस…
आणि परत इकडे यायला निघालो म्हणत तो त्याच्या बरोबर असलेल्या कुत्र्याला शोधू लागला.
तेव्हा उपस्थित लोकांनी त्याला तो कुत्रा मरून दोन वर्ष झालीत.
अस सांगितल्यावर तर त्याला घड़लेला प्रकार हळू हळू लक्षात येऊ लागला की तो कुत्रा त्याला जिन्याजवळ का जाऊ देत नव्हता…
तो फॉरेस्ट ऑफिसर Time Loop मधे अडकला होता बऱ्याच जाणकार लोकांच व इंवेस्टिगेटर्सच ही हेच मत होत की तो Time Loop मधे अडकला होता…
कारण त्या फॉरेस्ट ऑफिसर च्या म्हणण्या प्रमाणे तो जस्ट 5 मिनिट त्या जिन्यावर बसला होता.
मात्र इथे भौतिक जगात 5 वर्षाचा कालावधी उलटून गेला होता, त्यानंतर ही त्याच्या केस वर बरीच इन्वेस्टिगेशन करण्यात आली होती.
तो ज्या ठिकाणी त्या जिन्यावर बसला होता तो जीना ही आता त्या जागी नव्हता त्यामुळे नेमके क़ाय घड़ल असाव?
की त्याचा 5 मिनिटाचा काळ 5 वर्षात कन्वर्ट झाला होता हे एक रहस्य बनून राहील…
मात्र तो फॉरेस्ट ऑफिसर Time Loop मधे अडकला होता यावर सर्व इंवेस्टिगेटर्स च एकमत होत…
सदर घटना मि टाईम ट्रेवलशी निगडित असलेल्या घटनांवर आधारित एका पुस्तकात वाचली होती.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©प्रथम वाडकर
RELATED POSTS
View all
