Itworkss

नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले..काय आहे कारण??

April 22, 2022 | by Varunraj kalse

नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले..काय आहे कारण??

Netflix : चित्रपट, वेब सीरिज (Web Series), डॉक्यूमेंट्री (Documentary) इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी OTT प्लॅटफोर्मचा वापर करतात. पण  Netflix या कंपनीचं गेल्या तीन महिन्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार Netflixचे लाखो Subscribers घटले आहेत. जवळपास 100 दिवसांमध्ये Netflix चे दोन लाखपेक्षा जास्त Subscribers कमी झाले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांमध्ये Netflix Users ची संख्या 221.6 मिलियन झाली आहे. 

Subscribers कमी होण्याचं काय आहे कारण?

Netflix कंपनीनं दावा केला आहे की, Subscribers कमी होण्याचं कारण Russia आणि Ukraine यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आहे. रिपोर्टनुसार, Netflix ने रशियामध्ये त्यांची सेवा बंद केली आहे. तसेच कोरोनामुळे अनेक लोक Work from Home (WFH) करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा Growth Rate  वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या Netflixच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील Netflixचे नुकसान झाले, असं ही कंपनीनं सांगितलं. 

Netflixने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये 1.6 बिलियन डॉलर एवढी कमाई केली. तर गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यात कंपनीनं एकूण कमाई 1.7  बिलियन डॉलर कमाई केली होती. नेटफ्लिक्सचे दोन लाख Subscribersकमी झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.  

कंपनीने सांगितले की, सुमारे 222 मिलियन कुटुंब हे नेटफ्लिक्सचा वापर करत आहेत. पण नेटफ्लिक्स खात्यांची संख्या 100  मिलियन आहे. स्वस्त इंटरनेट डेटा असल्यानं स्मार्ट टीव्हीवर देखील लोक नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवेचे ते पैसे देत नाहीत.

RELATED POSTS

View all

view all