Itworkss

Mystery Behind the Power of Rudraksha

October 20, 2021 | by Varunraj kalse

Mystery Behind the Power of Rudraksha

गुढ रहस्यमयी पंचमुखी, सहामुखी, सातमुखी, अष्टमुखी रूद्राक्ष



©Anna®2021



भाग्योदयातील अडथळे दूर करण्यासाठी पंचमुखी रूद्राक्ष-

भगवान शंकराचे प्रतीक असलेले हे रुद्राक्ष सर्वत्र आढळते. हे धारण केल्याने भीती नाहीशी होते. पाप नष्ट होते. धन प्राप्त होते. या रुद्राक्षांच्या १०८ मण्यांची माळ वापरावी.

पंचमुखी—

याला पंचानन शिवाचे किंवा कालाग्नी रूद्राचे स्वरूप मानले जाते. यात पंचमहाभूतांचा समावेश असून अन्य सर्व मुखांच्या रूद्राक्षाचे गुण अंतर्भूत आहेत.

हा धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. जपमाळ पंचमुखी रूद्राक्षांचीच असते.

पंचमुखी रूद्राक्ष हेही सहजपणे उपलब्ध होते. संपुर्ण जगात होणार्‍या रूद्राक्षांच्या एकूण पिकांपैकी ऐंशी टक्के पीक हे पंचमुखी रूद्राक्षाचे असते.

त्यामुळे हे दुर्मिळ नसते. त्याचमुळे याची किंमतही कमी असते.

अध्यात्मविद्येतील अत्यंत महत्त्वाच्या साधनेसाठी—कुंडलिनी शक्तीच्या जागृतीसाठीही याचा बहुमूल्य उपयोग होतो.

“कमीत कमी तीन पंचमुखी रुद्राक्षे धारण करणे आवश्यक”

इतर रुद्राक्षांप्रमाणे पंचमुखी रूद्राक्ष फक्त एकच धारण करून चालत नाही तर किमान तीन तरी धारण करावी लागतात.

मंत्रः- ‘ओम र्‍हीं नमः’ असा मंत्र म्हणून हे रुद्राक्ष धारण करावे.

गुरूच्या प्रभावाखालील राशींना अधिक उपयुक्त-

पंचमुखी रूद्राक्षाचे नाव ‘कालग्रि’ असे आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या या रूद्राक्षावर गुरूची अधिसत्ता चालते.

धनु व मीन राशीकरता हे अधिक शुभ परिणाम देणारे ठरते. त्याच्याबरोबर पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वाभाद्रापदा या गुरूच्या अंकित असलेल्या नक्षत्रांशी संबंधित व्यक्तींनाही ते अधिक फलदायी ठरते.

धनु आणि मीन राशींप्रमाणेच काही प्रमाणात मेष आणि वृश्चिक राशीलाही या पंचमुखी रूद्राक्षाचा उपयोग होतो.

पत्रिकेतील गुरूचा दोष जर प्रबळ असेल आणि त्यामुळे भाग्योदयात अडथळे किंवा विक्षिप्त वर्तणूकीवरही पंचमुखी रूद्राक्ष हा रामबाण उपाय ठरतो.

उच्च शिक्षणासाठी आणि मानसिक शांतीसाठी हे पंचमुखी रूद्राक्ष आत्मिक बळ देते.

तसेच शत्रूचा निः पात करण्याची ताकद, इंद्रिय दौर्बल्य कमी करून लैंगिक शक्ती वाढवण्याची क्षमता आणि वशीकरणाची शक्ती या पंचमुखी पवित्र रूद्राक्षामध्ये असते.

मानसिक चलनवलन योग्य प्रकारे राखणे, वक्तृत्त्वाची अमोघ शक्ती धारणकर्त्याला देणे हे गुणधर्मही या पंचमुखी रूद्राक्षात आहेत.

भूतप्रेत अथवा अन्य कुठल्याही बाधेपासून मुक्ती देण्याचे सामर्थ्य पंचमुखी रूद्राक्षामध्ये आहे. सकल मनोरथ सिध्दीस जाण्यासाठी आणि अंगिकारलेल्या कार्यात यशप्राप्तीसाठी पंचमुखी रूद्राक्षाचा उपयोग होतो.

वैद्यकिय दृष्ट्याः- खाण्यापिण्यात जर मनमानी झाली, त्यामुळे काही दोष निर्माण झाले तर या दोषांचा नाश हे रुद्राक्ष करते.

ह्रदयविकारांवर औषधी-

पंचमुखी रुद्राक्ष शारीरीक पातळीवर अनेक व्याधींपासून मुक्ती देणारे आणि रोग नियंत्रित करणारे असे आहे.

प्रामुख्याने हस्त, ह्रदय, कर्ण आणि मस्तक या सर्व ठिकाणी हे पंचब्रह्य स्वरूप रूद्राक्ष धारण करणे लाभकारण ठरते.

रक्तादाब आणि ह्रदयरोग यावर तर या रूद्राक्षाचा विशेष प्रभाव आहे.

रात्रभर एका भांड्यात यासाठी हे भांडे तांब्याचे असता कामा नये.

रूद्राक्ष हे विद्युत चुंबकीय, पराचुंबकीय शक्तींनी युक्त असल्यामुळे तांब्यासारख्या वहनक्षम धातूमुळे विपरित परिणाम होतात.

त्यामुळेच या उपचारात तांब्याचे भांडे वापरु नये. पाणी घेऊन ही तीन पंचमुखी रूद्राक्ष त्यामध्ये रात्रभर ठेवावीत.

ते पाणी सकाळी प्यावे. या बरोबरच “अंगातील चरबी नियंत्रणाखाली आणण्यासाठी पंचमुखी रूद्राक्षाचा अतिशय अपयोग होतो.”

यासाठी किमान ७ दिवस ते ४१ दिवस या उपचारपध्दतीचा वापर करावा. साधारणपणे या ४१ दिवसांत रूद्राक्षाची फलप्राप्ती नक्की होते.

शरीरातील सर्व प्रमुख चक्रांवर वर्चस्व ठेवून, त्या चक्रांचे सुयोग्य उद्दीपन करण्याची क्षमता या पंचमुखी रूद्राक्षामध्ये आहे.

ज्ञान, संपत्ती, कीर्ति यासारख्या ऐहिक यशासाठीही पंचमुखी रूद्राक्ष उपयुक्त ठरते.

मधुमेह तसेच यकृत, जठर, मूत्रपिंडे, मांड्या, कान यांच्या विकारावरही पंचमुखी रुद्राक्ष रामबाण औषध आहे. मात्र या रूद्राक्षाचा शरीराला स्पर्श होणे अत्यावश्यक आहे.

विघ्नहरण करणारे सहामुखी रूद्राक्ष-

सहामुखी रूद्राक्षही दुर्मिळ नाही. ते सहजासहजी प्राप्त होते. हे प्रामुख्याने नेपाळ, तिबेट व इंडाेनेशिया व मलेशिया या देशांमधुन येते.

सहामुखी रूद्राक्षही विपुल प्रमाणात आढळते. हे रुद्राक्ष म्हणजे साक्षात श्रीगणेश बुद्धीचे प्रतीक आहे.

काहींच्या मते सहामुखी रूद्राक्ष हे शिवपुत्र कार्तिकेयाच्या स्वामित्वाखाली आहे तर काहींच्या मते गणेशाच्या प्रभावाखाली हे सहामुखी रूद्राक्ष येते.

मात्र सर्व ग्रंथात प्रामुख्याने कार्तिकेयाचा उल्लेख येतो. कार्तिक अथवा गणेश हे दोघेही शिवपुत्र असल्यामुळे कोणाचाही प्रभाव असला तरी फरक पडत नाही.

कार्तिकेयाला युद्धाचा स्वामी मानले गेले आहे. त्यामुळे बौध्दिक वादविवाद वा शरीरिक लढाईमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी या रूद्राक्षाचा उपयोग केला जातो.

मात्र याचबरोबर विद्येचा स्वामी श्रीगणेशाकडेही याची मालकी असल्यामुळे विद्याभ्यासातही याच्या वापराने यश प्राप्त होते.

हे रुद्राक्ष धारकाला विद्या संपन्न होते. विघ्नहारक अशा देवतेचे प्रतीक असलेले हे रुद्राक्ष सर्व प्रकारची विघ्ने नष्ट करते. तसेच संकटांचा नाश करते.

बहुतेक व्यापारी हा रूद्राक्ष आपल्या गल्ल्यात ठेवतात. याचे कारण असे की, याच्या अस्तित्वामुळे गल्ला कधीच रिकामा रहात नाही.

हा रूद्राक्ष धारण केला असता अमोघ वक्तृत्व प्राप्त होते. व्यावसायाची भरभराट होते. ग्रहांच्या परिभाषेत सहामुखी रूद्राक्ष हे शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली मानले गेले आहे.

यामध्ये ज्योतिषशास्त्रातल्या संख्याशास्त्राशी हा संकेत जोडला जातो.

६ ही संख्या शुक्राच्या वर्चस्वाखाली मानली गेली असल्यामुळे सहामुखी रूद्राक्षाचे स्वामित्व हे शुक्राकडे आले आहे.

मंत्रः- सहामुखी रूद्राक्षाचा धारणमंत्र ‘ॐ हीं हूम नमः’ असा आहे.

प्रामुख्याने वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींना हे अधिक लाभदायी आहे. तसेच भरणी, पूर्वाफाल्गुनी वा पूर्वाषाढा नक्षत्र असेल तरीही या रूद्राक्षाचा वापर बराच उपयुक्त व लाभदायक ठरू शकतो.

बुद्धी, शक्ती आणि त्यांच्याद्वारे मिळवलेले ज्ञान व विद्या यांच्याकरता या रूद्राक्षाचा विशेष करून वापर होतो.

बौध्दिक शक्तीसाठी सहामुखी रूद्राक्ष हे अधिक परिणामकारक असले तरीही त्याबरोबरच जोडीला चारमुखी रूद्राक्ष धारण केले तर त्याची फलप्राप्ती अधिक दिसून येते.

आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवण्याची क्षमतादेखील या रूद्राक्षामध्ये आहे. हे रूद्राक्ष शुक्राच्या प्रभावाखाली असल्यामुळे वैवाहिक सुख वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.

सहामुखी तीन रूद्राक्षे एका धाग्यात ओवून घातल्यास त्याचा जास्त प्रभाव दिसून येतो.

सहामुखी रूद्राक्ष पोलिस खाते, संरक्षणखाते, साहसी कामे करणारे लोक, धोका पत्करणारे लोक, या सार्‍यांना कवचकुंडलासारखे असते. या क्षेत्रातील लोकांना यश आणि चातुर्य प्राप्त होते.

कंपन्यातील उच्च पदाधिकारी, व्यापार,उद्योजक, पत्रकार, प्रकाशन या क्षेत्रातील व्यक्तिंना सहामुखी रूद्राक्ष अतिशय फायदेशीर ठरते.

तसेच अभिनय, संगीत, वक्तृत्व या क्षेत्रातील व्यक्तिंनाही हे रूद्राक्ष सहाय्यकारी ठरते.

पत्रिकेतील शुक्र या ग्रहाची स्थिती खराब असेल तर त्याची अनिष्टता टाळण्यासाठी सहामुखी रूद्राक्ष धारणा उपयुक्त ठरते.

दुसर्‍याला आकर्षित करून घेणे, वश करणे यांमध्येही या सहामुखी रूद्राक्षाचा वापर होतो.

वैद्यकियदृष्टिनेः- सहामुखी रूद्राक्ष हे सर्व तर्‍हेचे मानसिक विकार, फेफरे वा मिरगी येणे, उन्मादावस्था, वेडसरपणा या सार्‍यांवर गुणकारी ठरते.

रोज सहामुखी रूद्राक्षाचा लेप करून मस्तकावर लावल्यास, हे विकार पूर्वपणे आटोक्यात येतात.

हे रुद्राक्ष थंडावा निर्माण करणारे असल्याने प्रामुख्याने उष्णतेमुळे निर्माण होणार्‍या नेत्रविकारासारख्या विकारांवर तसेच त्वचाविकारांवरही हे रूद्राक्ष गुणकारक आहे.

ह्या रुद्राक्षधारणेने समाधान आणि मानसिक शांती, बौद्धिक विकास, हजरजबाबीपणा प्राप्त होतो. गुप्तेंद्रियाच्या रोगावरही ते गुणकारी मानले जाते.

जननेंद्रियांवर याचे प्रभुत्व असल्यामुळे त्या संबंधींच्या क्रियांवरही त्याचा परिणाम दिसून येतो.

मूत्राशय व त्यासंबंधीचे रोग, प्रोस्टेट ग्रंथी व त्यासंबंधीचे रोग, मुख व घसा यावरही सहामुखी रूद्राक्षांचे वर्चस्व असल्यामुळे या संबंधीच्या विकारांवर हे रुद्राक्ष औषधी ठरते.

हे रूद्राक्ष माणसाला चिंतामुक्त करते आणि जीवनातला आनंद मिळवून देते. तसेच दैनंदिन जीवनात चातुर्य आणि खेळकरपणा आणते. त्यामुळे साहजिकच मनुष्य आनंदी राहतो. एकप्रकारची मानसिक शांती मिळते.

पापक्षालनासाठी सातमुखी रूद्राक्ष-

सातमुखी रूद्राक्षावर जणू सप्तऋषी विराजमान झालेले असतात. या ऋषींच्या सामर्थ्याने यश, कीर्ती, प्रतिष्ठा इ. प्राप्त होतात.

याला सप्तर्षीचा व देवी सरस्वतीचा आशिर्वाद आहे. हा रूद्राक्ष सप्तमातृका किंवा अनंतनागाचे प्रतीक मानला जातो.

सातमुखी रूद्राक्ष हे ‘अनंग’ या नावाने प्रसिध्द आहे. पापक्षालनासाठी ह्या रुद्राक्षाची धारणा केली जाते. मग संसारातले पाप असो किंवा राजकारणातले किंवा नोकरी व्यवसायातले.

विशेषतः सोनेचौर्य करणार्‍यांनी हे रूद्राक्ष जवळ बाळगावे. त्यामुळे मानसिक शांती मिळते. या रुद्राक्षाजवळ आपल्या पापाची कबूली द्यावी.

या रुद्राक्षाचा स्वामी सूर्य आणि सप्तर्षी आहेत. ज्या सप्त मातृका मानल्या गेल्या आहेत, त्यांचा थेट संबंधदेखील या सप्तमुखी रूद्राक्षाशी पोहोचतो.

महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सप्तमुखी रूद्राक्ष हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लक्ष्मीबरोबरच सरस्वतीलाही प्रसन्न करुन घेण्यासाठी हे रुद्राक्ष संबंधित आहे.

अनंग नावाने ओळखल्या जाणार्‍या सातमुखी रूद्राक्षाचा ज्ञाप्राप्तीसाठीही उपयोग होतो.

शनिची कृपा असणारे हे रूद्राक्ष साधकांना दिलासा देते. हे रूद्राक्ष महाक्ष्मीशीं संबंधित आहे त्यामुळे पैशाच्या गल्ल्यातच हे सातमुखी रूद्राक्ष ठेवावे.

लक्ष्मी देवता ही स्वभावतः चंचल असल्यामुळे ती ‘फिरती’ असू नये असा यामागील उद्देश आहे.

काहींच्या मते हे रुद्राक्ष शनिच्या प्रभावाखाली आहे. शनिचा खडा ज्याप्रमाणे काळजीपूर्वक, तो लाभदायक आहे का नाही याची खात्री करून वापरला जातो.

त्याचप्रमाणे हे रुद्राक्षही धारण करण्याऐवजी लांबूनच त्याच्या शक्तीचा अनुभव घेतलेला बरा. असा एक विचार केला जातो.

ते काही असले तरी हे रूद्राक्ष धारण केल्यास हे सातमुखी रूद्राक्ष महागुणकारी आहे हे नक्की.

वैष्णव मताप्रमाणे ‘शंख’ म्हणजेच सातमुखी रूद्राक्ष. त्यामुळेच या सप्तमुखांचा संबंध ते सात सर्पकुळांशी जोडतात.

सप्तमुखी रूद्राक्षातील प्रत्येक मुखाचा संबंध हा पुंडरिक, तक्षक, विश्वेलंबन, करिंबा आणि शंखचूड अशा सात सर्पकुळांशी आहे.

दक्षिणेकडे या सप्तमुखी रूद्राक्षाला मन्यदन असेही नाव आहे.

शनिच्या प्रभुत्वाखाली येणारे हे रूद्राक्ष पत्रिकेतील शनिची अनिष्टता दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे.

साडेसातीमधील त्रास किंवा चित्रविचित्र घटना या सप्तमुखी रूद्राक्षामुळे नियंत्रणाखाली येतात. ज्यांना शनिपूजा, शनिमाहात्म्य वाचणे जमत नाही किंवा पटत नाही अशांनी या सातमुखी रूद्राक्षाचा वापर करावा.

आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी-

या सप्तमुखी रूद्राक्षाचा उपयोग संपत्तीमध्ये वाढ करणे, आर्थिक स्थैर्य, ऐश्वर्य व शांती प्राप्त करण्यासाठी केला जातो.

कामदेवाला प्रिय असणारे हे रूद्राक्ष अत्यंत प्रभावशाली असे वशीकरणाचे कार्यही पार पाडते. ज्यांना बचत करणे शक्य होत नाही, पैसा मिळतो परंतु टिकत नाही, त्यांना सातमुखी रुद्राक्षधारणा जास्त फलदायी होते.

दैनंदिन जीवनात नम्रता, सहनशक्ती, चिकाटी वाढवायची असेल, प्रगतीतील अडथळे, निराशा, दूःख, चिंता दूर करायची असेल तर या रुद्राक्षधारणेचा उपयोग होतो.

अंतःस्फूर्तींचे कारकत्वही याच सातमुखी रूद्राक्षाकडे असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठीदेखील हे रूद्राक्ष विलक्षण प्रभावशाली ठरते.

हे रुद्राक्ष शानिच्या प्रभावाखाली असल्यामुळे सातमुखी रूद्राक्ष हे मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना जास्त लाभदायक ठरते.

तसेच जन्मनक्षत्र पुष्य, अनुराधा वा उत्तराभाद्रपदा असणार्‍यांनाही हे रूद्राक्ष अधिक लाभदायी ठरते.

सातमुखी रूद्राक्ष हे तांत्रिकांच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आणि मौलिक आहे. ज्या सप्तमातृकांचा संबंध या रूद्राक्षांशी येतो त्यांचे अर्चन तामसी जन करतात असे उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आहेत.

या सप्त मातृका म्हणजे अन्य कोणी नसून माता पार्वतीचीच दुर्गेच्या रूपातील अवतरणे आहेत.

“सप्तमातृका म्हणजे वराही, इंद्रायणी, वैष्णवी, कौमारी, शिवानी, ब्राह्मणी आणि चामुंडा” जगोत्पत्तीस कारणीभूत असलेल्ला प्रक्रियेत सत्तावीस प्रजापतींप्रमाणेच या मातृकांचाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच.

या सार्‍या अवतारांमध्ये या मातृकांना दोन किंवा चार हस्त असल्याचे दाखवले गेले आहे. सप्तमुखी रूद्राक्षाशी थेट संबंधित अशा या सप्तमातृकांचे मंदिर जजपूर येथील वैतरणी नदीच्या तीरावर आहे.

या ठिकाणी दशाश्वमेध घाटावर असलेल्या थेट संबंधामुळेच तांत्रिक लोकांच्या दृष्टिनेदेखील सप्तमुखी रूद्राक्ष अतिशय महत्त्वाचे ठरते.

मंत्रः- ‘ओम हुम नमः’ हा जप करुन हे रूद्राक्ष धारण करावे.

वैद्यकिय दृष्ट्याः- हे रूद्राक्ष अनेक आजारांवर गुणकारी आहे.

थंडी, वातविकार, संधिवात, सर्व तर्‍हेचे स्नायू व हाडांचे विकार, अर्धांगवायु, त्वचेसंबंधीचे सर्व आजार, वंध्यत्व, मानसिक व शारीरिक दौर्बल्य, नपुसंकत्व या सार्‍यांवर हे रुद्राक्ष औषधी आहे.

सर्व लहान मोठे आजार, दीर्घकाल असणार्‍या शारीरिक व्याधी यांपासून सातमुखी रूद्राक्षधारणा मुक्ति देते.

रूद्राक्षाचा जैवविद्युतावर चांगला परिणाम दिसून येत असल्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास त्याचा उपयोग होतो

अशी घ्या रूद्राक्षाची काळजी…

१) रोज झोपताना रूद्राक्ष काढून ठेवण्याची सवय केव्हाही चांगली.

२) रसायनांशी संबंध असणारे आपले कामाचे स्वरूप असेल तर त्यावेळेस रसायनांचा त्यावर परिणाम होऊ नये म्हणून रुद्राक्ष उतरवून ठेवावे.

३) रुद्राक्ष धारणकर्त्याचे काम जर श्रमाचे असेल आणि त्याचा संबंध जर रुद्राक्षाशी येत असेल तर त्यावेळेपुरते रुद्राक्ष काढून ठेवावे.

४) रूद्राक्ष तुटले असेल किंवा खराब झाले असेल तर बदलावे शक्यतो दोन—तीन वर्षानी नवीन रुद्राक्ष धारण करावे.

अशा वेळी जुने रूद्राक्ष पूजनामध्ये ठेऊन देणे आणि जर ते तुटले वगैरे असेल तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणे हा सर्वांत प्रशस्त मार्ग होय.

रुद्राक्ष धारणकर्त्याने रोज जप करावा का…?

कोणत्याही साधनेसाठी जप ही एक आवश्यक बाब असतेच. पण त्याबरोबर जपाचे, मंत्राचे योग्य उच्चारणही महत्त्वाचे असते.

केवळ विशिष्ट संख्या पूर्ण करावयाची यासाठी अनेक वेळा त्या मंत्राचा उच्चार स्पष्ट न होता तोंडातल्या तोंडात किंवा अर्धवट होतो ते योग्य नाही.

सहस्त्रजप करायचा या विचारानेच साधकाला वेळेअभावी धडकी भरते आणि जपसाधनेच्या वेळी सारखे घड्याळाकडे लक्ष लागून एकाग्रचित्त होत नाही.

म्हणूनच जोपर्यंत मन एकाग्रचित्त असते. शारिरीक आणि मानसिक स्वस्थता असते तोपर्यंतच जप करणे इष्ट ठरेल.

अस्थिर मनाने केलेल्या जपाचे फलित काहीच मिळणार नाही. अस्थिर, चंचल मनाने केवळ जपसंख्या पूर्ण करायच्या उद्देशाने भराभर स्पष्ट मंत्रोच्चार न केलेल्या जपापेक्षा मोजकाच पण स्थिर, शांत मनाने केलेला जप केव्हाही योग्य फलप्राप्ती मिळवून देईल.

एखाद्या दिवशी आपल्याला एखाद्या घटनेची (कोणी हाॅस्पिटलमध्ये आहे, एखादी वस्तू चोरीला गेलेली किंवा हरवलेली असेल तर, कौटुंबिक किंवा ऑफिसमध्ये कलह झाला असेल तर) काळजी वाटते.

जप करण्यास बसले तरी सारखे त्या घटनेचेच विचार मनात येत असतील तर त्या दिवशी जप न करणे उत्तम.

आपले मन कणखर असेल आणि अशा घटनांचा विचार न आणता पूर्णपणे जपावर लक्ष केंद्रित होणार असेल तर जप करणे इष्ट होय.

“जपसंख्या हे एक साधन आहे अंतिम ध्येय नव्हे, हे लक्षात घेऊन जपसाधना आचरणात आणायला हवी.”

जप करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जपसाधनेच्या वेळी आपली चंद्र नाडी चालू असेल म्हणजेच डावी नासिका कार्यरत असेल. तर अशा काळात केलेला जप जास्त फलदायी ठरतो.

दीर्घायुष्यासाठी अष्टमुखी रूद्राक्ष-

हा रुद्राक्ष बटुक भैरवाचे प्रतीक आहे. याच्या धारणेने आयुष्य वाढते. महामृत्युंजयाच्या मंत्राचा अभिषेक रुद्राक्षावर करुन ते आजारी अथवा पिडलेल्या व्यक्तिस दिले तर मनुष्य हमखास पूर्ण बरा होतो.

याला साक्षात श्रीगणेशाचे प्रतीक मानतात. इतकेच नव्हे तर चिंतामणी व विनायक या नावानेही हा ओळखला जातो.

अष्टमातृका, ब्रह्मा, विष्णु व महेशाचा पूर्ण आशीर्वाद याला लाभला आहे. तांत्रिक लोक या रूद्राक्षाला कुण्डलिनी जागृत करण्याचे साधन मानतात.

हा रूद्राक्ष लाल रेशमी धाग्यात गुंफून गळ्यात धारण करावा, हा जवळ बाळगल्याने अचानक धनलाभ होतो.

ह्या रुद्राक्षावर साक्षात भैरवनाथाचा प्रभाव असतो. हे अतिशय बलशाली असते.

हे रुद्राक्ष दुर्मिळ असते. दैविक, शारीरिक आणि भौतिक त्रासापासून, संकटापासून मुक्ति मिळवून देणारे असे संरक्षक कवचासारखे हे रुद्राक्ष असते.

श्रीगणेशाचेही स्वामित्व या रूद्राक्षावर असते. शंकर— गणेश या पितापुत्रांच्या सामर्थ्याने हे अष्टमुखी रूद्राक्ष जास्तच प्रभावशाली असते.

दीर्घायुष्य लाभण्यासाठी या रूद्राक्षाचा अतिशय परिणामकारक उपयोग दिसून येतो.

पृथ्वी, आप, तेज, वायु, अग्नि ही पंचमहाभुते आणि मन, बुद्धी, अहंकार अशा आठ गोष्टींचे प्रतीक म्हणजे हे अष्टमुखी रूद्राक्ष होय. रूद्राक्ष हे पृथ्वी आणि स्वर्ग यांमधील एक दुवा आहे.

अष्टमुखी रूद्राक्ष हे मुख्य करून मकर राशीच्या व्यक्तींना जास्त फलदायी असते. त्यांचे सामर्थ्य वाढवते.

या बरोबर आर्द्रा, स्वामी आणि शततारका नक्षत्रावर आठमुखी रूद्राक्षाची अधिसत्ता चालते.

मंत्रः- ‘ओम हुम नमः’ हा जपमंत्र म्हणून अष्टमुखी रुद्राक्ष धारण करावा.

हे रूद्राक्ष ‘राहू’ च्या प्रभावाखाली येते.

त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत राहुदोष आहे किंवा कालसर्पयोग आहे किंवा मूळ पत्रिकेत चंद्राबरोबर वा रविबरोबर राहू आहे अशा लोकांनी हे आठमुखी रूद्राक्ष जरूर धारण करावे.

आपल्या हातून चुकून दुराचार घडत असेल किंवा तसे करण्यास भाग पडत असेल तर पापक्षालनासाठी हे रूद्राक्षधारण करावे.

अन्नातून झालेली विषबाधा, परस्त्रीचा स्पर्श, गुरूपत्नीचा स्पर्श हा नकळत झाला असेल तरी त्यामुळे निर्माण होणार्‍या दोषावर हे आठमुखी रूद्राक्ष बहुमोल ठरते.

संसारसुखाचा आनंद घेत मोक्षप्राप्तीचा आनंद मिळवायचा असेल तर हे रुद्राक्ष धारण करावे. हे रूद्राक्ष काळसर रंगाचे असेल तर ते विशेष प्रभावी ठरते.

हे धारण करण्यासाठी धातूची तार वापरावयाची असेल तर ती पूर्ण सोन्याची वा चांदीची तार वापरू नये. यासाठी मिश्रधातूच्या तारेचा वापर करावा.

वैद्यकिय दृष्ट्याः- त्वचेचे रोग बरे करण्यासाठी आणि त्वचेवरचे डाग घालवण्यासाठी, गुडघे व पावलांचे आजार, सांधे आखडणे, वातविकार यासारख्या व्याधींवरही हे उपयुक्त ठरणारे रूद्राक्ष आहे.

फुफ्फुसे, पाय, डोळे व त्वचा यांच्या व्याधीवर हे रुद्राक्ष औषधी आहे.

या रुद्राक्षधारणेने आत्मविश्वास वाढतो, मानसिक आरोग्य चांगले राहते, समाधानी वृत्ती वाढते, सत्याने, सचोटीने वागण्यास हे रुद्राक्ष भाग पाडते.

अष्टमुखी रूद्राक्ष हे काळसर रंगाचे असेल तर बर्‍याचदा त्यामध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते.

असे रुद्राक्ष जास्त परिणामकारक ठरते. या रूद्राक्षाचा उपयोग हा सातत्याने अपयशी ठरणार्‍या लोकांकरता महत्त्वाचा ठरतो.

ज्यांना व्यवसाय, शिक्षण, संसार यामध्ये सातत्याने अपयशाचा सामना करावा लागतोय त्यांच्या बाबतीत असे अष्टमुखी रूद्राक्ष अतिशय प्रभावीपणे कार्य करते.

त्रास किंवा त्रासदायक गोष्टींना नाहीसे करून धन आणि अधिक उपयुक्त उर्जाभाराची निर्मिती ही या अष्टमुखी रूद्राक्षामुळे शक्य होते.

अष्टमुखी रूद्राक्ष हे दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरते. आठमुखी रूद्राक्षाची माळ घालताना ही कमीत कमी १, ४, ७ व ८ अशा मण्यांची असावी.

हे अष्टमुखी रूद्राक्ष हे ऋध्दि सिध्दींशी संबंधित आहे आणि ते धारणकर्त्याला दोन्हींचा लाभ मिळवून देते. लेखक व बुध्दिवादी लोकांना हे रूद्राक्ष वरदानच असते.

अष्टमुखी रूद्राक्षाच्या धारणकर्त्यास असत्य वचनाचा दोष लागत नाही कुठलीही साधना, आराधना किंवा धार्मिक कार्य करताना हे रुद्राक्ष धारण केले तर फलप्राप्ती लवकर मिळते.

प्रामुख्याने व्यवसाय भरभराटीसाठी हे रूद्राक्ष अतिशय उपयुक्त ठरते.

चाणाक्षपना, हजरजबाबीपणा आणि चातुर्यात वृध्दी, व्यक्तिमत्व विकास होण्यास हे रुद्राक्ष उपयोगी ठरते तसेच वादविवादात आपलीच बाजू खरी करायची असेल तरी या रुद्राक्षधारणेचा उपयोग होतो.

रुद्राक्ष त्राटकाचा प्रयोगः-

रुद्राक्ष त्राटक (एकाग्र चित्ताने रुद्राक्षाकडे एकटक पाहाणे व आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे बघणे) केले असता त्याचे विलक्षण सामर्थ्य दिसून येते.



टिप- वरील लेख पुरातन ग्रंथाच्या आधारे लिहला आहे. ह्याची कृपया नोंद घ्यावी.



©Anna®2021 (7249157379)



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all