Itworkss

Some misunderstandings about WILL

September 20, 2021 | by Varunraj kalse

इच्छापत्र – मृत्यूपत्र – काही गैरसमज

Some misunderstandings about WILL

इच्छापत्र / मृत्यूपत्र – काही गैरसमज



©संपदा गाडगीळ, कायदेशीर सल्लागार



बरेच वेळा सुशिक्षित लोकांमध्येही बरेच गैरसमज असतात आणि ते तसे समज कायम बाळगतात, पसरवतात. स्वतःचे आणि दुसऱ्यांचे नुकसान करतात.


आपण इच्छापत्र / मृत्यूपत्र (Will) ह्याबाबतीतील काही गैरसमजांवर प्रथम बोलू या –


मृत्यूपत्र हे मृत्यू जवळ आल्यावर करावे – मृत्यू काही सांगून आणि ठराविक वयानंतरच येतो असे नाही, तेव्हा आपल्या मालकीची पहिली मालमत्ता, पैसे हाती येऊ लागल्यावर ताबडतोब मृत्यूपत्र करावे.


ज्यांना एकच अपत्य आहे त्यांना मृत्यूपत्र करण्याची गरज नाही – पती व पत्नी साधारणपणे एकाचवेळी मृत्यू पावतील असे नाही.


तेव्हा आपल्या पश्चात आपल्या सहचाराची आर्थिक स्थिती यथाशक्ती भक्कम राहील हे पाहणे आपले कर्तव्यच आहे. मुलांना पैसे आणि मालमत्ता मिळणे ही नंतरची गोष्ट आहे.


नॉमिनी ठेवला की झाले आणखी काही लागत नाही – असे अजिबात नाही, कारण नॉमिनी हा केवळ एक ट्रस्टी असतो, मालक नाही. तो वारसदार आहे हे त्याला सिद्ध करावेच लागते.


माझी मुले समजूतदार आहेत, पैशासाठी भांडणार नाहीत – पण त्याच्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा आईवडिलांनी मृत्यूपत्र करून नीट वाटणी करून ठेवली तर हा प्रश्नच उद्भवणार नाही.


आणि मुलं भविष्यकाळात एकोप्याने राहण्याची शक्यता वाढेल.


माझ्याकडे फारसे काही नाहीच आहे, त्यामुळे मृत्युपत्राची गरज नाही – कायदा मालमत्ता / पैसे किती ते बघत नाही.


कितीही कमी मालमत्ता असेल तरी ती आपल्या नावावर करून घेण्यासाठी वारसदारांना जी प्रोसिजर आहे ती करावीच लागणार.


स्त्रियांना वेगळे मृत्यूपत्र करण्याची आवश्यकता नाही – स्त्रिया अनेक वेळा नोकरी/ व्यवसाय किंवा इतर घरगुती कामे करून पैसे कमवत असतात.

बचत करत असतात, त्यांच्याकडे “स्त्रीधन” असते, त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना पैसे, जमीनजुमला मिळालेला असू शकतो किंवा पुढे मिळू शकतो.


त्यामुळे त्यांनाही आपली इच्छा लिहून ठेवणे क्रमप्राप्त आहे.


काही लोकांना मृत्यूपत्र ह्या शब्दानेच अस्वस्थ किंवा निगेटिव्ह वाटते. – पण त्याला दुसरा चांगला शब्द आहे ना, इच्छापत्र.


खरंतर मृत्यू ही घटना दुःख्ख दायक असली तरी त्याच्या इतकी शाश्वत अशी घटना तीच. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आज ना उद्या इहलोक सोडणार हे नक्की.


मग थोडा प्रॅक्टिकली विचार करून वेळेत कृती केली (इच्छापत्र केले), तर मागे राहाणाऱ्यांसाठी ते चांगले नाही का?


इच्छापत्र करण्यासाठी खूप खर्च व धावपळ करावी लागते – आपल्या एकूण मालमत्तेचा, आपण इच्छापत्र करून न ठेवल्यास वारसांना होणाऱ्या त्रासाचा, मनःस्तापाचा विचार करता इच्छापत्र करून ठेवण्यासाठी लागणारा वेळ आणि कष्ट काही फार नाहीत.


शिवाय त्यावर कोणतीही स्टॅम्पड्युटी भरावी लागत नाही. ते रजिस्टर करणे कायद्याने बंधनकारक नाही.


आपले जर आपल्या कुटुंबियांवर डोळस आणि खरे प्रेम असेल तर आजच इच्छापत्र बनवायला घ्या. आपल्या मागच्या पिढीने किंवा मित्रमंडळींनी नाही केले म्हणजे आपण करू नये असे थोडेच आहे!


उलट “आधी केले मगची सांगितले” ह्या उक्तीप्रमाणे कदाचित तुमच्याकडून स्फूर्ती घेऊन ते तुमच्या पाठोपाठ इच्छापत्र करण्याचा विचार करतील सुद्धा!


चला तर मग “श्री गणेशा” करा. चांगल्या कामासाठी मुहूर्त कशाला असे म्हणतात. पण आत्ता तर शुभघडी सुद्धा आहे.


काही शंका, मदत लागली तर निसंकोच भेट/ लिहा.
संपदा गाडगीळ
कायदेशीर सल्लागार
९९३०३२१०३४


आमच्या  प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all