Itworkss

Use this 10 Instagram Features to Grow Your Followers

September 11, 2021 | by Varunraj kalse

Instagram Features to Grow Your Followers

Use this 10 Instagram Features to Grow Your Followers



©टीम नेटभेट



सोशल मीडियाच्या या जमान्यात तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक युक्त्या वापराव्या लागतात तसंच, अनेक नवे नवे फीचर्स आत्मसात करावे लागतात.

नवीन समाजमाध्यमांमध्ये सतत येणारे अपडेट्स तुम्हाला लक्षपूर्वक शिकावे लागतात. यामुळे सोशल मीडियावर तुमची लोकप्रियता अबाधित ठेवण्यात तुम्हाला यश येतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात होतो.

अनेकजणं फेसबुकशी सरावले आहेत मात्र Instagramशी ते तेवढे अद्याप सरावलेले नसल्याचं सांगतात.

Instagramवर असे काही भन्नाट फीचर्स आहेत जे वापरून तुम्ही तुमचे फोटोज आणि व्हिडीओज आणखी रंजक करून तुमचे फॉलोअर्स वाढवू शकता.

जाणून घेऊयात आज या 10 Instagram फीचर्सविषयी –



1. Green Screen Story –

Instagramच्या तुमच्या वॉलवर फोटो अपलोड करताना जे फिल्टर सेक्शन्स मिळतात, त्यात तुम्हाला ग्रीन स्क्रीन नावाचा ऑप्शन मिळतो.

हा पर्याय निवडल्यावर तुमच्या फोटोला हिरव्या रंगाची बॅकग्राऊंड मिळते. यावर तुम्ही तुमच्या फोटोसह अन्य मीडिया जसं, तुम्हाला आलेली एखादी काँम्प्लिमेंट, कॉमेंट किंवा व्हिडीओ वगैरे बॅकड्रॉपला शेअर करू शकता.



2. Picture Sticky –

जेव्हा तुम्ही Instagramवर नवीन पोस्ट शेअऱ करणार असता तेव्हा तुम्ही त्या फोटोच्या वर दिलेल्या सेटींग्जमध्ये स्टीकर आयकॉनवर क्लिक करून,

तुमच्या फोटोवर निरनिराळे कॉमेडी, चित्रविचित्र स्टीकर्स देखील पेस्ट करू शकता. तसंच, इथेच तुम्हाला एक गॅलरी आयकॉन मिळतो,

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या फोन गॅलरीच्या इमेजचंच स्टीकर मिळतं, ते पेस्ट करून त्यावरून तुम्ही तुमच्या गॅलरीत आज लोकांना नवीन कोणते फोटो पहायला मिळतील.

व्हिडीओ मिळतील ते इमेज व्ह्यूमध्ये सांगू शकता.



3. Rainbow Story Ring –

अनेकदा तुम्ही नोटीस केलं असेल की Instagramवरच्या काही अकाऊंटच्या प्रोफाईल पिक्चरला रेन्बो सर्कल दिसतं.

तुम्हालाही तुमच्या प्रोफाईल पिकला तसं रेन्बो सर्कल हवं असेल तर Instagramवर #Pride टाईप करून तो सिलेक्ट करायचा.

या हॅशटॉगचं सेलिब्रेशन म्हणून ज्या ज्या फोटोवर हा हॅशटॅग असतो, त्यांच्या मिनीएचर प्रोफाईल पिकला ते रेन्बो सर्कल मिळतं.



4. Duel Camera –

हे एक असे भन्नाट फीचर आहे की यात एकाचवेळी तुम्ही तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेराही ऑन करून कोणतेही फोटो क्लिक करू शकता.



5. Pin Comment –

जेव्हा तुमच्या फोटोला एखादी मस्त कॉमेंट येते तेव्हा तुम्हाला ती कॉमेंट तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना दाखवण्याचा मोह होतोच. पण मग ती कशी दाखवणार .. ?

यासाठीच मग तुम्हाला Instagramने कॉमेंट पिन करण्याचा ऑप्शन दिला आहे. जी कॉमेंट तुम्हाला आवडेल ती तुम्ही पिन करून ठेऊ शकता.

त्यासाठी इतकंच करायचं की त्या कॉमेंटला डावीकडे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात पिन कॉमेंटचा आणि डिलीट कॉमेंटचा पर्याय मिळेल.

त्यातील पिन कमेंटवर क्लिक करताच ती कॉमेंट लगेचच तुमच्या फोटोखाली, स्टोरीखाली प्रथमस्थानावर दिसायला लागेल.



6. Remove Follower –

तुम्हाला जर Instagramवर अनोळखी फॉलोअर्सचा त्रास होत असेल तर तुम्ही चक्क अशा फॉलोअर्सना रिमूव्ह करून टाकू शकता.

त्यासाठी ज्या फॉलोअरला रिमूव्ह करायचं असेल त्याच्या नावावर क्लिक करायचं आणि लगेचच तुम्हाला रिमूव्ह फॉलोअरचा पर्याय मिळतो त्यावर क्लिक करायचं.



7. Post to multiple accounts –

एखाद्या व्यक्तीचे जर Instagramवर एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर ती व्यक्ती एकाच वेळी तिच्या सर्व अकाऊंटवर पोस्ट करू शकते.

त्यासाठी सेटींग्समध्ये Instagramने शेअर टू मल्टीपल अकाऊंट असा पर्याय दिलेला आहे तो वापरता येईल.



8. New Fonts –

नवीन स्टोरी क्रिएट केल्यावर जर तुम्हाला त्यावर काही टेक्स्ट लिहायचं असेल तर तुम्ही तिथेच टेक्स्ट्च्या ऑप्शनमध्ये मिळणारे नानाविध फाँट्स वापरून तुमचा मेसेज लिहू शकता.

यामुळे तुमच्या फोटोला व टेक्स्टला छान उठाव येईल.



9. Small Business Card-

Instagram स्टोरीजमध्ये तुम्हाला हा पर्याय मिळतो. तो वापरून तुम्ही बिझनेस स्टोरी स्टिकरवर तुमच्या बिझनेस हँडलचं नाव टाईप करताच.

तुम्हाला तिथे तुमच्या व्यवसायाशी निगडीत तीन फोटोज, Instagram फीडमधून सिलेक्ट करून त्यावर पेस्ट करण्याचा पर्याय मिळतो.

तो वापरून तुम्ही तुमचं छोटंसं बिझनेस कार्ड Instagramवर तयार करून सगळ्यांसोबत ते शेअर करू शकता.



10. Respond with a GIF –

एखाद्या स्टोरीला, मेसेजला, GIF स्टिकर्स वापरून तुम्ही रिप्लाय करू शकता. GIF स्टिकर मेसेजेस तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सापडतात.

त्यापैकी योग्य ते GIF स्टीकर निवडून तुम्ही ते शेअर करून तुमच्या कमेंट लक्षवेधी बनवू शकता.



आमच्या  प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



धन्यवाद
टीम नेटभेट
learn.netbhet.com

RELATED POSTS

View all

view all