“श्रीयंत्र” म्हणजे काय…?
©यशश्री ताई – 7249073958
श्रीयंत्र हे महात्रिपूरसूंदरीचे प्रतीक आहे. या यंत्रातील बीजमंत्र व मांडणी बारकाईने पाहिली म्हणजे समस्त ब्रम्हाण्डाची उत्पत्ती व विकास कसा झाला हे समजते.
या यंत्रातील मध्यबिंदू म्हणजे शक्तित्रिकोण असून याच्या चारी बाजूंना एकूण नऊ त्रिकोन आहेत. त्यांपैकी उर्ध्वमूखी पाच त्रिकोण हे शक्तिदेवतांचे द्योतक असून ते ‘शिवयूवती’ या नावाने ओळखले जातात.
उर्वरित चार अधोमूखी त्रिकोण हे शिवद्योतक असून त्यांना ‘श्रीकंठ’ असे संबोधिले जाते.
शिवयूवतीचे पाच त्रिकोण हे ब्रह्मांडातील पंचमहाभूते, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रिये व पंचप्राण यांचे द्योतक समजले जातात.
मनूष्यदेहाबरोबर असलेले या त्रिकोणाचे साम्य तक् ,असृक, मांस, भेद व अस्थी या स्वरूपांशी दाखविले जाते.
ब्रम्हांडातील चित् ,बुध्दी,अहंकार व मन यांचे प्रतीकात्मक चार श्रीकंठरूपी कोन हे मनूष्यदेहात मज्जा, शुक्र (वीर्य) ,प्राण व जीव या रूपाने वास करतात.
श्रीयंत्र प्रकार-
श्रीयंत्राचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक सृष्टिक्रमानुसार व दोन संहारक्रमानुसार बनविलेले.
वरील वर्णन पहिल्या प्रकारच्या यंत्राचे आहे. श्रीमत् आद्य शंकराचार्य याच तत्त्वाचे पूजक व प्रसारक होते.
म्हणजे याचा अर्थ दक्षिणमार्गी लोक या श्रीयंत्रा उपासना करतात.
दूसर्या प्रकारचे जे यंत्र आहे त्याची रचना पहिल्याच्या नेमकी उलट आहे.
म्हणजे ‘शिवयूवती’ त्रिकोण अधोमुख व ‘श्रीकंठ’ त्रिकोण उर्ध्वमुख असतात.
कौलमतानुयायी याच यंत्राची पूजा करत असल्याने याला ‘कौलाचार श्रीयंत्र’ अशी तंत्रशास्त्रात संज्ञा आहे.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 5 डिसेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
श्रीयंत्राची रचना-
‘शिवयूवती’ आणि ‘श्रीकंठ’ या त्रिकोणांच्या भोवती आणखी ४३ त्रिकोण रेखाटलेले असून या सर्व त्रिकोणांच्या भोवती आणखी एक वर्तुळ आहे.
त्याच्याबाहेर आठ पाकळ्यांचे कमळदळ असून याच्याबाहेर पुन्हा सोळा पाकळ्यांचे कमळदळ आहे आणि त्याच्याबाहेर भूपूर आहे.
त्यावरील वर्तूळात व बाहेर मूद्राशक्ती, लोकपाल, मातृका, सिध्दी इत्यादिकांची स्थाने आहेत. शंकराचार्यांनी श्रीयंत्राच्या रचनेचे रर्णन एका श्लोकात केलेले आहे.
तो श्लोक असा—
चतूर्भिः श्रीकण्ठैः शिवयूवतिभिः पंचभिरपि। प्रभिन्नाभिः
शम्भोर्नवभिरपि मूलं प्रकृतिभिः॥
त्रयश्चत्वारिंशत् वसुदलकमलब्जात्रिवलयः।
त्रिरेखाभिः सार्धं तव भवनकोणः परिणतः॥
या यंत्रात एकूण त्रिकोणसंख्या किती याचे काव्यमय वर्णन ‘रूद्रयामल’ तंत्रात खालीलप्रमाणे आढळून येते.
बिन्दूत्रिकोणवसुकोणदशायूग्मम्।
मन्वस्त्रनागदलसंयुतषोडशास्य॥
वृत्तत्रयं च धरणी सदनत्रयं च।
श्रीचक्रराजमुदितं पर देवतायाः॥
या यंत्रात जी नऊ चक्रे रेखाटलेली आहेत, त्यांची नावे अशी—
१)बिन्दू,
२) त्रिकोण,
३) आठ त्रिकोणसमुह ,
४) दहा त्रिकोणसमुह,
५) दहा त्रिकोणसमुह,
६)चौदा त्रिकोणसमुह,
७)आठ पाकळ्यांचे कमळ,
८)सोळा पाकळ्यांचे कमळ ,
९)भूपूर व त्यामधील इतर देवता .
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 5 डिसेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
श्रीयंत्राच्या नऊ चक्रांबदल माहिती-
१)बिन्दू —
शक्तित्रिकोणातील हा बिन्दू म्हणजे महात्रिपूरसूंदरी किंवा ललितादेवीचे निवासस्थान होय.
मणिव्दीप हे सूधासागरात आहे, असे तांत्रिक मानतात. तेव्हा बिन्दू हा व्दीपाचा निर्देशक होय, असे काही जाणकार मानतात.
२)त्रिकोण —
हे चक्र त्रिकोणाचे बनलेले आहे. त्रिकोणाच्या तीन कोनांवर कामरूप येथील कामेश्वरी, पूर्णगिरी येथील वज्रेश्वरी (या पीठाच्या देवतेचे नाव ‘कालिका’ असे आहे).
जालंधर येथील ‘भगमालिनी’ (या पीठाची देवता वज्रेश्वरी आहे) या देवता अधिष्ठित असून मध्यभागी उडियान येथील ‘कात्यायनी’ देवता आहे.
३)त्रिकोणसमूह—
या चक्रात आठ त्रिकोण आहेत. या त्रिकोणांच्या बिन्दूवर क्रमशः वशिनी, कामेश्वरी, मोहिनी, विमला, अरुणा, जयिनी सर्वेश्वरी व कौलिनी या देवता असून.
त्या मानवी शरीरातीत शीत, उष्ण, सुख, दु:ख, इच्छा, सत्य, रज व तम या गुणांचे प्रतीक आहेत.
४)दहा त्रिकोणसमूह—
या चक्रात दहा त्रिकोण आहेत. त्यातील देवता अशाः सर्वज्ञा, सर्वशक्तिप्रदा, सर्वेश्वर्यप्रदा, सर्वज्ञानमयी, सर्वव्याधिनाशिनी, सर्वधारा, सर्वपापहरा, सर्वानन्दमयी सर्वरक्षा, सर्वइच्छाफलप्रदा या आहेत.
या देवता मानवी शरीरातील रेचक, पाचक, शोषक, दाहक, प्लावक, क्षारक, उध्दारक, क्षोभक, जृम्भक, मोहक या गुणांच्या प्रतीमूर्ती आहेत.
५)दहा त्रिकोणसमूह—
या चक्रात दहा त्रिकोण आहेत.
त्यातील देवता अशाः सर्वसिद्धीप्रदा, सर्वसंपत्प्रदा, सर्वप्रियंकरी, सर्वमंगलकारी, सर्वकामप्रदा, सर्वदु:ख विमोचिनी, सर्वमृत्यूप्रकाशमयी, सर्वविघ्ननिवारिणी, सर्वांगसुंदरी, सर्वसौभाग्यदायिनी या आहेत.
६)चौदा त्रिकोणसमूह—
या चक्रात चौदा त्रिकोण असून त्यातील देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांच्या निदर्शक आहेत. या देवता अशाः सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी, सर्वाह्रदिनी, सर्वसंमोहिनी, सर्वस्तंभिनी, सर्ववशंकरी, सर्वरंजिनी, सर्वोन्मादिनी, सर्वार्थसाधिनी, सर्वसंपत्तिपूरणी, सर्वमंत्रमयी, सर्वव्दंदक्षयंकरी.
या देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्या, अलंबुखा, कूहु, विश्वोदरी, वारणा, हस्तिजिव्हा, यशोवती, पयास्विनी, गंधारी, पूषा, शंखिणी, सरस्वती, इडा, पिंगला, सूषम्ना यांच्या प्रतीक आहेत.
७)आठ पाकळ्यांचे कमळ—
या चक्रात अष्टपद्मदल असून त्यात अनंगकुसुमा, अनंगमेखला, अनंगमदना, अनंगमदनतुरा, अनंगरेखा, अनंगवेगिनी, अनंगमदनांकुशा, अनंगमालिनी या देवता आहेत.
या सर्व देवता मानवी शरीरातील वचन, आदान, गमन, विसर्ग, आनंद, उपादान, दान, उपेक्षा या गूणांच्या निदर्शक आहेत.
८)सोळा पाकळ्याचे कमळ—
या चक्रात सोळा दळांचे कमळ आहे यातील देवता अशाः कामाकर्षिणी, बुध्याकर्षिणी, अहंकारकर्षिणी, शब्दाकर्षिणी, रूपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गन्धाकर्षिणी, चित्ताकर्षिणी, धैर्याकर्षिणी, शरीराकर्षिणी या देवता मानवी शरीरातील मन, बुध्दी, अहंकार इत्यादी गुणांच्या निदर्शक आहेत.
९)भूपूर व त्यामधील इतर देवता—
या चक्राला ‘भूपूरचक्र’ असे नामाभिधान असून याचे चार भाग आहेत ते असेः
(अ) षोडशडल कमळाच्या बाहेरील तडाग—सदृश चार
वर्तुळे
(ब) षोडशदलाला लागून असलेली बाहेरची पहिली रेखा
(क) षोडशदलाला लागून असलेली बाहेरची दुसरी रेखा
(ड) वरील रेखांच्या बाहेरचा भाग.
या चार भागात क्रमशः १० मूद्राशक्ति, १० दिक् पाल, ८ मातृका आणि १० सिध्दी अधिष्ठित आहेत.
या देवतास्वरूप यंत्राची स्थापना अनेक शक्तिपीठातून केलेली आढळते.
उदाहरणार्थ, विंध्यवासिनी पीठामध्ये भैरव कूंडाजवळ, तिरवा (जिल्हा फरूकाबाद) येथे अन्नपूर्णा मंदिराच्या परीसरात काशी विश्वेश्वराच्या मंदिरात, कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदीरात तुळजापूरला भवानी मंदिरात, कांजीवरमला कामाक्षीच्या मंदिरात श्रीयंत्राची स्थापना केलेली आढळते.
यशश्री ताई – 7249073958
तळटीप – * सर्वांना विनंती आहे की आपली समस्या व्हॉटसअप करावी. समस्या जाणून योग्य ते मार्गदर्शन केले जाईल*
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
