What is Metaverse
फेसबुक मेटाव्हर्स म्हणजे काय…?
©टीम नेटभेट
काही दिवसांपूर्वी एक दिवशी सकाळी सकाळी अचानक Facebookने घोषणा करून त्यांचं रिब्रँडींग केलं..
मार्क झुकेरबर्गने खुद्द जाहीर केलं की यापुढे Facebook Metaverse नावाने ओळखलं जाईल.
मग हे Metaverse म्हणजे नक्की काय आहे.. Facebook आणि Metaverseमध्ये नेमका काय फरक आहे आणि काय वेगळेपण आहे..?
चला जाणून घेऊया.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 5 डिसेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
Metaverse हे इंटरनेटचं भविष्य आहे.
तुम्ही आठवून पहा, जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा आपल्याला अविश्वसनीय वाटतील अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेल्या.
विशेषतः आपलं सोशल लाईफ वेगळं झालं, तसंच व्यक्तीगत आयुष्यातही आपण सतत इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहू लागलो.
सुरूवातीला व्हिडीओ कॉल, चॅटींग, ऑडीओ मेसेजिंग या सगळ्याचं जितकं अप्रूप वाटायचं तितकं नंतर ते सगळं आपल्या जीवनाचा भाग बनलं.
आता या सगळ्याच तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे Metaverse असेल.
हे Metaverse कायम सुरू असेल, लाईव्ह असेल, यात कधीच पॉझ असणार नाही, तसंच कधीही ते रिसेट होणार नाही.
डिजीटल करन्सी असेल
आभासी दुनिया आणि वास्तव दुनिया दोन्हीकडे Metaverse असेल असं सध्या समजतंय
पॅरलल व्हर्चुअल वर्ल्ड असंही आपण त्याला म्हणू शकतो.
व्हर्च्युअल रिएलिटीमध्ये तुमचे अवतार प्रत्यक्ष जगल्यासारखे जगतील. तुम्हाला हवं तसे ते दिसतील, तुम्हाला हवं तिथे फिरू शकता.
जगाच्या कोपऱ्यात, केव्हाही, कुठेही व्हर्चुअल रिएलिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता.
अनेक गेमिंग कंपन्यांनी आजवर अशाप्रकारे व्हर्च्युअल रिएलिटी यापूर्वी वापरली आहे, वापरते आहे.
फोर्टनाईट गेम नावाच्या कंपनीने या तंत्रज्ञानाचा आधीच बऱ्यापैकी वापर केलेला आहे.
या Metaverseमध्ये व्हर्च्युअल करन्सी वापरली जाईल.
इंटर ऑपरेटीबिलीटी हे आणखी एक वैशिष्ट्य असेल, अर्थात तुम्हाला या जगात वावरताना सतत लॉगिन लॉगआऊट करण्याची गरज असणार नाही.
हजारो किमी दूर असलेल्या लोकांना Metaverseमुळे एकत्र आल्याच्या आभासात वावरता येईल. यामुळे तुमचा ऑनलाईन टाईम जास्त मीनींगफुल होईल असा Facebookचा विश्वास आहे.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 5 डिसेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
मात्र, हे सगळे असले तरीही, आजवर अनेकांनी या व्हर्चुअल पॅरेलल वर्ल्डबद्दल खूप निगेटीव्ह अंदाज बांधले आहेत.
डिस्टोपिया म्हणजे ज्याचा शेवट वाईट असतो, असं या जगाबद्दल बोललं जातं. म्हणूनच Facebook आता पूर्ण काळजी घेऊन या जगात प्रवेश करत आहे.
Facebookला माहित आहे की जेव्हा असं एक संपूर्ण आभासी जग उभं राहील, तेव्हा तिथे ज्याप्रमाणे सकारात्मक गोष्टी, घटना घडतील, त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि असंख्य नकारात्मक घटनाही घडू शकतात.
त्यामुळेच Facebook आता याबाबत प्रचंड संशोधन करून काम करते आहे. त्यासाठी Facebook अनेक सिव्हील सोसायटी ग्रुप्सची मदतही त्यासाठी घेत आहे.
प्रचंड पैसा, वेळ, बुद्धिमत्ता खर्च करून उभं रहाणारं हे व्हर्च्युअल आभासी जग नेमकं कसं असेल याबाबत आता जनमानसात उत्सुकता लागून राहिलेली आहे हेच खरं..
धन्यवाद
टीम नेटभेट
learn.netbhet.com
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
