Itworkss

Aata Majhi Satakli

November 12, 2021 | by Varunraj kalse

मला राग येतोय ….. आता माझी सटकली



©महेश शिंदे



काल एक मित्र बोलता बोलता म्हणाला की या माणसाला पाहिल्यावर मला खूप राग येतो.

का ? मी प्रश्न केला.

मित्र: या माणसाने मला वेळेला मदत केली नाही.

हा व्यक्ती कधी काळी माझा मित्र होता मी त्याला मदत करायचो पण जेव्हा वेळ माझ्यावर आली तेंव्हा याने मला मदत केली नाही.

आता मी त्याच्याशी बोलत नाही त्याचे तोंड जरी पाहिले तरी मला राग येतो.

मला थोडी गंमत वाटली म्हणून मी त्याला विचारले की तुला राग आल्यावर नक्की काय होते.

मित्र: काहीनाही रे मुड ऑफ होतं. दुसरं काय होणार.

मी आणखी खोलात जाऊन विचारले की किती वेळ मुड ऑफ होतो ?

तो म्हणाला दोन – तीन तास होतो.

प्रत्येक वेळी असेच होते का ? मी विचारले.

तो हो म्हणाला.

मी: हा माणूस दररोज तुला दिसतो का ?

मित्र: हो कधी कधी तर दिवसातून दोन वेळा तोंड पाहावे लागते त्या भाxxxxxचे.

आता स्वारी गरम व्हायला लागली होती.

चल आपण थंडगार लस्सी घेऊया असे म्हणून मी त्याला त्याच्या आवडत्या दुकानात नेऊन त्याचा आवडता फ्लेवर ऑर्डर केला आणि आम्ही पुन्हा गप्पांचा ओघ सुरू केला.

आता मला सांग की तुझ्या आसपास असे किती लोकं आहेत की ज्यांच्याकडे पाहिले की तुझा मुड ऑफ होतो.

साधारण 4 – 5 जण आहेत अशी .

आता मी calculation करू लागलो.

आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त  5 डिसेंबर पर्यत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/

जर एका माणसांमुळे तुझे दोन ते तीन तास वाया जातात रक माणूस आठवड्यातुन 3 दिवस दिसला तर याचे 9 तास मुड ऑफ होतो.

आणि ही 4 ते 5 माणसे याला आठवड्यात 3 दिवस जरी दिसली तरी याचा आठवड्यात 45 तास मुड ऑफ होतो.

मी हे calculation त्याला सांगितले आणि तो उडालाच कारण त्याचे आठवड्यातील दोन दिवस विनाकारण मुड ऑफ होतो.

कारण मुड ऑफ झाला की कामात लक्ष लागत नाही , विनाकारण मुलांवर कधी कधी बायकोवर चिडचिड होते.

कधीतरी नवीन माणसावर चिडचिड होते आणि नव्यानं माणसं दुखावली जातात.

माझं म्हणणं त्याला हळूहळू पटू लागलं. आपल्या मुड चा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात का असावा?

आता यावर उपाय काय करावा असं तो विचारू लागला मी काही मानसोपचार तज्ञ नाही.

किंवा psychology माझा फार अभ्यास नाही पण मीही अशाच प्रकारची मानसिकता अनुभवली होती व काही ढोबळ पध्दती वापरून मी आता त्यावर नियंत्रण मिळवले आहे.

आता तो कान देऊन ऐकू लागला.

सुरवातीला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे अश्या व्यक्ती समोर दिसल्या की लगेच आपल्याला आज सगळ्याना मह्त्वाचे काय काम आहे.

आणि ते आपण चांगल्या प्रकारे कसे करू शकतो यावर मन केंद्रित करायचे.

तिसरी व शेवटची स्टेप म्हणजे अनोळखी व्हायचे म्हणजेच त्या व्यक्तीला आपण ओळ्खतच नाही अशा प्रकारे मनाला प्रोग्राम करायचे.

मित्रांनो आपल्या आसपास असे मित्र मैत्रिणी असतील ज्यांना अशा प्रकारची समस्या आहे यावर सविस्तर लेख मी लिहिणार आहे

क्रमश:

©महेश शिंदे



RELATED POSTS

View all

view all