
एक शापित भूमिका सुपरमॅन…!
©प्रथम वाडकर
मित्रहो आपण लहानपणा पासून ह्या (बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन वगैरे) सुपर हिरोंना कॉमिक्स, कार्टून्स व मुव्हीज मधून पहात आलो पण तुम्हाला माहीत आहे का?
की सुपरमॅन ही भूमिका एक शापित भूमिका आहे.ज्या ज्या नटांनी ही सुपर हिरो सुपरमॅन ची भूमिका वठवली त्या त्या नटांच्या खासगी आयुष्यात जबरदस्त (वाईट) उलथापालथ झाली तर काहींचे रहस्यमय रित्या मृत्यू झाले.
हॉलीवूड चे बरेच ऍक्टर्स सुपरमॅन च्या भूमिकेला अशुभ मानायला लागले होते.सुपरमॅन वर पहीलं कार्टून बनवणारे डेव्ह फ्लेसर आणि मॅक्स फ्लेसर यांना पहिलं कार्टून लाँच केल्यानंतर अवघ्या काही काळात नोकरी वरून काढून टाकण्यात आलं.
सुपरमॅन वर पहील्या Live Action चित्रपटात काम केलं Kirk Alyn ने जी सुपरमॅन जंप या नावाने आली होती1948 मध्ये जी तुफान लोकप्रिय झाली.
परन्तु ह्या भूमिके नंतर kirk ने आता आपल्याला कोणतीही भूमिका करण्यात रस नाही असं सांगून फिल्म क्षेत्र व अभिनयाचा कायमस्वरूपी त्याग केला. पुढे ते खूप डिप्रेशन मध्ये गेले आणि झोपेच्या गोळ्यांचा अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाला.
त्या नंतर नेक्स्ट सुपरमॅन मुव्ही आली 1951 मध्ये ज्यात सुपरमॅन चा रोल केला होता George Reeves ने पण फिल्म केल्यानंतर त्यांच्या खासगी जीवनात बरेच प्रॉब्लेम आले.
त्यांची कंपनी डबघाईला आली आणि शेवटी ह्या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.त्यानंतर आलेल्या सुपरमॅन चित्रपटात Lee Quigly यांनी सुपरमॅन च्या बालपणातला रोल केला होता,आणि त्यांचा ही रहस्यमय कारणाने मृत्यू झाला होता.
त्या नंतर आली बिग बजेट सुपरमॅन मुव्ही 1988 ज्यात ख्रिस्तोफर रिव ने अभिनय केला होता ज्यात त्यांनी जान आणली फिल्म ने सर्वत्र रेकॉर्ड तोड कमाई केली.
आपल्या अभिनयाने त्यांनी सुपरमॅन ला लोकांच्या हृदयात जागृत ठेवलं असंख्य पुरस्कारानी त्यांना पुरस्कृत केलं गेलं त्यांनंतर आलेल्या चार ही सुपरमॅन सिरीज मध्ये त्यांनी लीड रोल केला.
त्यांनतर त्यांच्या खासगी आयुष्यात बरेच ताण तणाव निर्माण झाले होते, एकीकडे अभिनय चालू होता पण पर्सनल लाईफ पूर्णपणे डिस्टर्ब झालं होतं त्यांचा Divorce झाला.
एक दिवस घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून पडून त्यांच्या कम्बरेच हाड मोडलं आणि पूर्ण शरीराला लकवा मारला शरीराचा अधिकांश भाग पॅरॅलाईज्ड झाला आणि त्या नंतर 9 वर्षात त्यांचा मृत्यू झाला.
त्या नंतर बऱ्याच हॉलीवूड ऍक्टर्स ना हा रोल ऑफर करण्यात आला होता ज्यात पॉल वॉलकर सुद्धा होते पण सर्वांनी त्या रोल ला एक शाप आहे ह्या कारणाने सुपरमॅन करण्यासाठी साफ नापसंती दर्शवली.
ह्या सर्व प्रकारानंतर 2006 परत सुपरमॅन प्रोजेक्ट वर काम सुरू केलं ज्यात ब्रॅडन रूथ ने काम केलं आणि सुपरमॅन रिटर्न या नावाने फिल्म रिलीज झाली त्याचा sequel मात्र अर्धवट राहिला आणि त्या नंतर ब्रॅडन रूथ ला काम मिळणं बंद झालं.
त्यानंतर परत सुपरमॅन वर मुव्ही आली 2013 मध्ये पण आता पर्यंत झालेल्या सर्व अशुभ घटनांचा विचार करून पुढील प्रोजेक्ट मध्ये सुपरमॅन च्या नावात,रोल मध्ये बरेच बदल करण्यात आले खास करून त्याच्या प्रसिद्ध पेहरावात सुद्धा.
आणि ह्या वेळेस सुपरमॅन मध्ये रोल केला हेन्री कॅविल ने त्यानंतर पण आलेल्या जस्टिस लीग व बॅटमॅन VS सुपरमॅन dawn ऑफ जस्टिस मध्ये पण हेन्री नेच रोल केला.
फिल्म मध्ये सुद्धा सुपरमॅन नावाचा खूप कमीवेळेस उल्लेख केला गेला. परंतु सुपरमॅन भूमिकेत खूप मोठा बदलावं आणल्या कारणाने त्याला लागलेल शापित सावट नाहीस झालं म्हणायला हरकत नाही कारण हेन्रीला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
उलट त्याला त्यांनतर मिशन इम्पोसीबल फॉलआऊट मध्ये काम मिळालं.तर खरच सुपरमॅन भूमिकेला एक शाप होता का? आणि त्यात बदलावं केल्याने त्याचा प्रभाव नष्ट झाला का? का हा एक फक्त योगायोग होता.
संदर्भ गूगल, YouTube, News
©प्रथम वाडकर
RELATED POSTS
View all
