Itworkss

Reiki Series Part 1 & Part 2 in Marathi

October 30, 2021 | by Varunraj kalse

Reiki अभ्यास भाग-१



©दयानंद गुरूजी, संपर्क-8652170720



‘की’ — जीवन स्त्रोत…

Reiki मधील ‘की’ म्हणजे चीनीमधील चीसारखाच आहे. संस्कृतमध्ये त्याला प्राण म्हणतात. हवाईतील Reiki शिक्षक त्याला ती किंवा की नावाने जाणतात.

त्याला ‘ओडिस फोर्स, ऑर्गन किंवा बायोप्लास्मा’ ही म्हटले जाते. प्राणाला विविध अनेक संस्कृतींनी अनेकानेक विविध नावे दिली आहेत. पण ते तत्त्व मात्र एकच आहे.

‘की’ म्हणजे जीवन स्त्रोत. त्याला जीवनातील खरा सत्याचा स्त्रोत किंवा वैश्विक जीवनाचा स्त्रोतही म्हटले जाते. ती अशारीरिक शाक्ति आहे. ती सर्वामध्ये असते.

जोपर्यंत कुठली गोष्ट जीवंत असते तोपर्यंत तीत या शक्तीचा वास असतो. ती गोष्ट मृत होते म्हणजे तिच्यातील ती शक्ती बाहेर पडली असते.

हा जीवनस्त्रोत तुमच्यात कमी प्रमाणात असेल किंवा तो पूर्णपणे तुमच्यात येण्यास अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही आजारी असता किंवा अतिसामान्य, नगण्य असता.

जेव्हा हा स्त्रोत आपल्यात अडथळ्याशिवाय, जोरात, मोकळेपणे असतो तेव्हा आपण आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

आपण जी प्रत्येक गोष्ट करीत असतो त्यात जीवनस्त्रोत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावित असतो. तो आपल्या शरीरात चैतन्य भरतो.

आपल्या भावानांची प्राथमिक शक्ती या स्त्रोताद्वारेच येते. आपल्या विचारांमध्ये आणि आध्यात्मिक जीवनातही त्याचा वाटा असतो.

चिनी लोक या जीवनस्त्रोताला अत्यंत महत्त्व देतात. ते ह्या जीवन स्त्रोताला ‘ची’ म्हणतात. त्यांनी ‘ची’ बाबत प्रचंड अभ्यास केलाय.

हजारो वर्षांपासून ते त्याबाबत संशोधन करुन त्याचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या संशोधनातून अनेक प्रकारचे ची असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

आंतरिक औषधाचे पिवळे श्रेष्ठ, सार्वभौम राजे’ की जे ४००० वर्षापूर्वीचे आहेत ते बत्तीस विविध प्रकारच्या ‘ची’ किंवा ‘की’ ची यादी देतात.

युद्धकला शिकणारे शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ‘की’ चा उपयोग करतात. प्राणायामासारख्या चित्तैकाग्र करण्याच्या साधनेतही त्याचा वापर होतो.

सर्वच विविध संस्कृतीमधील पारलौकिकतेच्या गोष्टी त्याच्याशी संबंधितच असतात. आध्यात्मिक जागृतीसाठी ही त्याचे अनन्यासाधारण महत्त्व आहे.

आपल्या भावनांच्या प्रकटीकरणासाठी त्याची आवश्यकता असते. सर्व कमींना भरुन काढण्याच्या पद्धतीतही की आहेच. ही अशारीरिक अद् भूत शक्ती आहे.

सर्वकमींना भरुन काढण्यासाठी ती आवश्यक आहे. ‘की’ म्हणजे आपले वर्तमान अस्तित्व. ‘की’ चे अस्तित्व आपल्या सभोवती आहे.

साक्षात चैतन्याच्या मार्गदर्शनाने चालणारा जीवन स्त्रोत.

साक्षात चैतन्य म्हणजे ‘रे’ आणि त्याच्या मार्गदर्शनाने चालणारा जीवन स्त्रोत किंवा जीवनातील खरी शक्ती म्हणजे ‘की’ त्याला आपण Reiki म्हणतो.

या सूत्राला आपण Reiki म्हणतो. जीवनाला आत्मोन्नतीकारक मार्गदर्शन करणारे सूत्र म्हणजे ‘Reiki ‘ आहे, असेही म्हणता येईल.

आणि Reiki या शब्दाचे हे सार्थक स्पष्टीकरण आहे. Reiki चा अनुभव घेतल्या नंतरच ते अधिक चांगल्या रीतीने कळते. Reiki स्वतःच्या बुद्धीनेच मार्गदर्शन करुन त्या नुसार वागण्याचा निर्णय ते कारणार्‍यावर सोडते.

रेकी अभ्यास भाग —२

सर्वच कमींना भरुन काढण्यासाठी Reiki चा उपयोग होतो का?

जीवनातील सर्व कमींना Reiki भरुन काढत नाही. Reiki म्हणजे जीवनातील एक विशिष्ट प्रभावी शक्ती आहे की जी जो तिची साधना करीत असतो त्यालाच प्राप्त होते.

ती शक्ती तिची साधना करणार्‍यातच समरस होते. ज्या लोकांनी Reiki चे शिक्षण घेतले त्यांनी कमींना भरुन काढण्याची शक्ति पन्नास टक्क्यांनी वाढल्याचे तेच सांगतात.

कमींना भरुन काढण्याच्या इतर पद्धतीसुध्दा आहेत. पण Reiki त्यापेक्षा वेगळी आहे.

मी Reiki वर्ग नुकतेच सुरु केले होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. मला भविष्य अचूकपणे पाहण्याची द्दष्टी असलेले दोनजण माहीत आहेत.

कमींना भरुन काढण्याची क्षमता त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने आत्मसात केली होती. द्दष्टीआड असणार्‍या गोष्टींना पाहण्याची दिव्यद्दष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे व्यक्तिच्या शरीरातील जीवनस्रोताला ते पाहू शकत होते.

ते शरीरातील षङचक्रही बघू शकत होते. ते व्यक्तीला मार्गदर्शन करणार्‍या उच्च शक्तिशी संभाषणसुध्दा करु शकत होतो.

ते शरीरातील नकारात्मक शक्तींना काढून कमींना भरुन काढू शकत होते. माझ्या बावीस वर्षांच्या तत्त्वज्ञानाच्या कामात मला त्यांच्याएवढे कमींना भरुन काढणारे प्रभावी निष्णात कोणीही भेटले नाही.

मी जे शिकवतोय ते आपल्याला येत नसावे अशी शंका त्या दोघांना आल्याने त्यांनी Reiki वर्ग सुरु केला. तसेच माझ्या कार्याला हातभार लावणे हासुध्दा त्यामागील उद्देश होता, असे मला वाटते.

Reiki तील अंतिम एकरुप होऊन कमींना भरुन काढण्याची पद्धत बघून आश्चर्यचकित झाले. त्यांना इतर कमींना भरुन काढण्याच्या पद्धती आणि Reiki यातील फरक जाणवला.

Reiki ची शक्ति सर्वात शक्तिमान, उच्च आणि सर्वात प्रभावी असल्याचे ते म्हणाले. ते वापरत असलेल्या इतर शक्तिप्रमाणे Reiki नाही.

इतर शक्तिप्रमाणे बांधील नाही. त्यामुळे Reiki सहज, सुलभ आहे. पण Reiki चा परिणाम मात्र अद् भूत आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. Reiki ची अंतिम पायरीच कमींना भरुन काढणारी आणि अद् भूत अनुभव देणारी आहे.

याद्वारे गतकाळात कमींना भरुन काढण्याच्या द्दष्टीने त्यांना जे अडथळे येत होते तेसुद्धा दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांना Reiki शिकल्याबद्दल खूप आनंद झाला. माझ्या Reiki वर्गाला त्यांनी शुभेच्या दिल्या.



©दयानंद गुरूजी, संपर्क-8652170720



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all