
Mano ya Na Mano -Dynamo The Magician
©प्रथम वाडकर
मित्रांनो जादुचे खेळ पहायला कोणाला आवडत नाहीत…?
लहान मुलांपासून ते आबालवृद्ध अगदी महिला वर्गा ला सुद्धा आवडणारा,ज्याला कोणी हेटर्स नाहीत असा एकमेव शो म्हणजे मॅजिक शो.
निदान आजवर तरी कुठल्या मॅजिक शो ला नाव ठेवणारी,किवा त्याला निगेटिव कॉमेंट्स करणारी व्यक्ति माझ्या तरी पाहण्यात आली नाही.
आता यात प्रामुख्याने दोन प्रकार असतात एक म्हणजे स्टेजवर केले जाणारे शो व दूसरे पब्लिक मधे पब्लिक ला इन्वॉल्व करून केले जाणारे स्ट्रीट शो.
आपल्याला माहीत असत की या जादू मागे त्या जादुगाराची वर्षानुवर्ष केलेली प्रैक्टिस आणि हाथचलाखी असते.
तरी त्यांच कसब ते पणाला लावून जी जादू करून दखवतात ति आपल्याला अगदी खरी वाटते(खरी नसली तरीही).
पण याच जादुच्या दुनियेत एक असा अवलिया जादुगार आहे जो आज टॉप च्या जादुगारां मधे गणला जातो तो ब्रिटीश स्ट्रीट मैजिशियन ‘Dynamo‘.
Dynamo हा असा एकमेव मॅजिशीयन आहे ज्याच्या जादू आजवर कोणी ही डिकोड करू शकला नाहीये.
किंवा त्याच्या जादू ला कोणी ही आव्हान देऊ शकले नाहिये.
जर तुम्ही इतर जादुगारांचे शो पाहिले असतील तर त्यांनी केलेल्या जादू च्या मागच रहस्य किंवा ति कशी केली…?
याबद्दल बरेच वीडियो Facebook, YouTube वर पहायला मिळतात की कशी ति जादू प्रिप्लांड होती.
त्यात कश्या प्रकारे हाथचलाखी वगैरे करतात, याबद्दल व्यवस्थित विवरण ही केल जात.
पण…… Dynamo हा असा एकमेव मॅजिशीयन आहे ज्याच्या जादू कोणीही डिकोड करू शकल नाही.
इतक्या अविश्वसनीय जादू पब्लिक मधे जाऊन करतो की पहाणारा प्रत्येक व्यक्ति अवाक झाल्या शिवाय राहू शकत नाही.
बऱ्याच देशविदेशात जाऊन त्याने अविश्वसनीय अजीबोगरीब मॅजिक केल्यात. भारतात ही येऊन गेलाय.
म्हणजे बर्फाच्या गोळ्या तून डायमंड रिंग काढण असो.
किंवा मिरिंडा च्या सील बंद बॉटल मधे कोक व कोक च्या सील बंद बॉटल मधे मिरिंडा ट्रान्सफ़र करण.
हवेत अधान्तरित उड़ण,प्रसिद्ध नदीच्या पाण्यावरुन चालण.
अचानक पब्लिक प्लेस मधून पब्लिक च्या समोरून गायब होण.
काचेच्या डोअर मधून आरपार जाण असो.
त्याची एक सर्वात भारी व प्रसिद्ध जादू होती फिश ची, जी त्याने ब्राझिल मधे केली होती ति म्हणजे एका रिकाम्या छोट्याशा बकेट मधून त्याने हजारो फिश काढले होते सगळे गाव वाले सकट प्रत्यक्षदर्शि अचाट झाले होते.
या पेक्षा ही माइंड रीड च्या अनोख्या जादू बऱ्याच जादू त्याने केल्यात ज्या आजवर कोणीच खोडू शकलेला नाही.
न कोणाला डिकोड करता आल्या….
असो, पण 2017-18 मधे याच Dynamo ने त्याच्यावर त्याच्या मैजिक सन्धर्भात एक फ़िल्म इंटरनेट वर रिलीज केली होती.
पण नंतर त्यानेच ति परत रिमूव केली ज्यात बऱ्याच सीक्रेट गोष्टी त्याने त्याच्याबद्दल सांगितल्या होत्या त्यात एक गोष्ट अशी सांगितली होती कि…
त्याला लहानपणा पासून एक स्पिरिट दिसत असे हा स्पिरिट डेविल स्पिरिट होता.
पण त्याने Dynamo ला कधीच त्रास दिला नाही. पण जेव्हा जेव्हा Dynamo मोठा होत गेला त्याला कळायला लागल तेव्हा तो डेविल स्पिरिट त्याच्याशी बोलत असे.
या Dynamo चेआजोबा सुद्धा एक मैजिशियन होते. Dynamo सुद्धा त्यांच्या पावलावर पाउल ठेवत मैजिक करू लागला.
पण तो आजोबां प्रमाणे कार्ड्स मैजिक वर सिमित न रहाता अनोख्या प्रेडिक्शन वाल्या मैजिक करू लागला. त्याचे सर्व प्रेडिक्शन्स बरोबर येऊ लागले.
आणि बघता बघता तो टॉप लेवल चा मैजिशियन बनला त्या फ़िल्म मधे एक वाक्य तो बोलला होता. कि मैजिक करतानां मि जेव्हा डोळे मिटतो;
तेव्हा मि माझ्या शरीरात रहात नाही माझ्या शरीराचा ताबा पूर्ण पैकी त्या स्पिरिट च्या अमला खाली येतो.
अश्या खूप सीक्रेट्स गोष्टि त्याने ओपनली सांगितल्या पण का कोणास ठाऊक त्याने ति फ़िल्म रिलीज करून डिलिट का केली.. हे समजू शकले नाही.
पण त्या नंतर मात्र तो भयानक आजारी पडला पण त्याच कारण देताना तो सांगतो की त्याला फ़ूड इन्फेक्शन झाल होत.
पण जाणकार सांगतात त्याने त्याची सीक्रेट्स रिव्हिल करून खूप मोठी चूक केली हीच चूक त्याच्या जीवावर बेतली असती…
कारण काही जण अस सांगतात की त्याला कैंसर झाला होता पण तो हे लपवत आहे.
त्याच्या मित्राच अस स्टेटमेंट होत की Dynamo एक शैतानाचा उपासक असून तो इल्युमिनाटी चा मेम्बर आहे.
त्याने त्याची सोल शैतानाला विकली आहे आज ही तो डेविल त्याच्या सोबत आहे. पण सध्या तो या अनोख्या जादू करण सोडून साध्या कार्ड ट्रिक्स करतोय पण एक काळ असा होता कि त्याने क्रिस एंजेल ला सुद्धा मागे टाकल होत.
या क्रिस एंजल ची पण एक वेगळी कहाणी आहे. त्याच्या एक लाइव शो मधे एक स्पिरिट त्याच्या शरीरात असलेला कैमेरात कैप्चर झाला होता. त्यानंतर त्याने लाइव शो करण सोडून दिले.
सध्या टॉप ला डेविड ब्लेंन जादूगर आहे ज्याच्या जादू आवाक्या बाहेर च्या असतात पण Dynamo लाआज ही प्रेक्षक पसंद करतात.
पण त्याच्या बद्दल सांगितल्या जाणाऱ्या डेविल स्पिरिट च्या गोष्टीत कितपत तथ्य आहे हे व त्याने रिलीज केलेली फ़िल्म डिलिट का केली हे एक गूढ़ आहे.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©प्रथम वाडकर
RELATED POSTS
View all
