My title My title
Mental HealthPost's
Trending

1st Stage of Self Counselling

Self Counselling

1st Stage of Self Counselling

 मागील लेखामध्ये स्व समुपदेशन म्हणजे काय? हे पाहिले आहे. या लेखात आपण स्व समुपदेशनाचे पहिले तंत्र पाहूया. ‘स्व’ समुपदेशनाची पहिली पायरी म्हणजे स्वतःची ओळख होय. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या आवडी, छंद, स्वतःमध्ये असलेल्या गुणाला, वैशिष्टयांना ओळखणे हे होय. स्वतःचा मानसन्मान, स्वतःचे विचार किंवा मत, स्वतःच्या भावनांना आदर देणे म्हणजेच स्वतःच्या मानसिकतेला जपणे होय. स्वतःचे मन किंवा मानसिकता चांगली असेल तर आपला दृष्टीकोन पॉझिटिव्ह बनतो त्यामुळे आपल्या जीवनात अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडतात.

परंतु कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे, चूक-बरोबर, नैतिक अनैतिक गोष्टीचा विचार करणे, भविष्याची काळजी करून आपल्या मनाकडे, भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या आवडी-निवडी किंवा छंद याकडे दुर्लक्ष केले जाते. मग हळूहळू आपण आपल्या अनेक भावनाकडे दुर्लक्ष करतो. मग थेंब-थेंब तळे साचे या म्हणीप्रमाने आपल्या भावना मनात तशाच साठल्या जातात. मग मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या की, याच साठलेल्या भावना उफाळून येतात.

परंतु आपले वय, आपली प्रतिष्ठा, आपल्या नैतिकतेच्या गोष्टी याचा विचार करून अजून आपण आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. मग याच भावना आपल्या मनाला कमजोर बनवितात. मग आपले विचार गोंधळून जातात, कामातील चुका वाढतात. मनात उदासीनता घर निर्माण करते. सतत उदासीन भाव निर्माण झाले की नैराश्य आपल्यामध्ये निर्माण होते. मग तर आपल्याला अनेक मानसिक त्रास सुरु होतात. आनंद हरवला जातो, जेवणावर, स्वतावर स्वतःच्या मनाकडे, भावानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. चिंता आणि काळजीमध्ये आपले मन अटकून राहते. त्यामुळे नैराश्यासारखे मानसिक त्रास कायमचे आपल्याला सुरु होतात.  

आपल्या मानसिकतेचा परिणाम आपल्या मेंदूवर, मेंदूतून स्त्रावाणाऱ्या विविध रसायनावर पडतो. आपल्या शरीरात स्त्रावाणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते, यामुळे bp, शुगर, पॅरालीसेस, हार्ट अटॅक यासारखे शारीरिक त्रास सुद्धा सुरु होतात. हळूहळू आपले मन आणि शरीर कमजोर पडते. मग आपण अनेक डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे जाऊन आपले आर्थिक आणि मानसिक नुकसान सुरु करतो. 

हे जर टाळायचे असेल तर वेळीच आपल्याला आपल्या मनाकडे, भावनांकडे, मानसिकतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणताही व्यक्ती आपल्या मनात निर्माण होणारे विचार, आपल्या भावना थांबवू शकत नाही. आपल्या मनात निर्माण होणानाऱ्या विचार, आणि भानांचे व्यवस्थापन करून किंवा स्व समुपदेशनाची अनेक तंत्रे वापरून आपले मानसिक संतुलन आणि मेंदूची अचूक कार्यपद्धती साबूत ठेवू शकतो.

कोणत्या मानसिकतेत मेंदू कसा काम करतो, मेंदुमधून कोणत्या मानसिकतेत कोणती रसायने बाहेर येतात, त्या रसायनाचा माझ्या आरोग्यावर, माझ्या स्वभावावर, माझ्या विचारावर, दृष्टिकोनावर आणि माझ्या कार्यक्षमतेवर कोणता परिणाम पडतो, माझ्यावरच नव्हे तर माझ्या कुटुंबावर, परिसरावर कसा पडतो हे समजून घ्यावे लागणार आहे.

उदा-मी तान-तणावात असताना मेंदूतून कार्टेसॉईल हा हार्मोन्स बाहेर पडतो, यामुळे माझे हार्ट बीट वाढतात, वारंवार तणावात राहिलो, तर जास्त प्रमाणात कार्टेसॉईल हा हार्मोन्स स्त्रावतो आणि त्याचा परिणाम BP हा आजार आपल्याला कायम स्वरूपी सुरु होतो. तर याउलट विविध मानसिकतेतून आपल्याला डोपामाईन, सेरोटोनीन, एन्ड्रॉफिन सारखे पॉझिटिव्ह हार्मोन्स सुद्धा बाहेर पडतात, जे आपल्याला आत्मविश्वास, उर्जा, चांगले आरोग्य पुरवितात.

अधिक माहितीकरिता सुजाण पालकत्व या युटयूब चॅनेल वरती अनेक व्हिडीओ आहेत, त्याचा अभ्यास स्व-समुपदेशन, मेंदूची कार्यपद्धती, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य याकरिता पाहू शकता.

 

Source: itworksseducation

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button