
Gramophone – ग्रामोफोन
©प्रथम वाडकर
बऱ्याच लोकांना एंटिक वस्तुचा संग्रह करण्याचा छंद असतो तसेच घरात गूढ वातावरण निर्मिति करून त्यात रमायचा छंद असतो विशेष करून संध्याकाळ 8 नंतर ची बैठक.
असाच एक छंदिष्ट थॉमस मैथयू फर्नांडीस ज्याला अश्या वस्तुंचा संग्रह करण्याचा छंद होता. घरची आर्थिक परिस्थिति चांगली. वडीलोपार्जित गैरेज त्यालाच लागून त्याचा वाडा होता.
वाड़ा तसा भव्य होता पण थॉमस ने त्या घराच घर पण आपल्या विचित्र छंदा पाई घलवल होत, घरात वाघ,सांबर, मगर अश्या हिंस्र पशुंची डोकी भिंतिला टांगलेली,(जशी हॉरर फ़िल्म मधे प्रशस्त हवेलिमधे लावलेल्या असतात अगदी तशा).
घरात इनमीन चार जण प्रत्येकाच्या सेपरेट रूम्स पण दिवसात रात्रि जेवताना फक्त एकत्र येत.
थॉमस ला बाई आणि बाटली चा ही नाद होता रोज रात्रि भरपूर ढोसुन येत आणि कधी कधी बाई सुद्धा घरात आणत.
त्याच्या या सवईला त्याचे mom-dad वैतागुन गेले होते त्याच्या रागिट स्वभावाला घाबरून ते त्याला काही बोलत नासत पण त्याच्याशी ते जरा एरव्ही पण अंतर राखूंन बोलत.
त्याची बहीण मात्र त्याला पाठीशी घालत तीच भावावर नितांत प्रेम होत कधी कधी त्याच्या सवईला तिही कंटाळून जात त्याला घालून पाडुन बोलत पण परत..
अस नको करू काय कमी आहे आपल्याला… आम्हाला तू हवा आहेस म्हणून परत समजूत काढून त्याला जवळ करत पण शेवटी ती वेळ आली की तो अस्वस्थ होई.
घरात मिनी बार असून सुधा बाहेर बार मधे जाऊंन तासनतास पित बसे आणि येताना बरोबर कुणाला तरी घेऊन येत असे हे रोजच झाल होत.
तर ह्या थॉमस ला अति दुर्मिळ वस्तुंचा संग्रह करण्याची आवड़ आणि त्यासाठी तो कितीही रक्कम मोजायला तयार असे.
त्यासाठी तो देश विदेशात ही भटकन्ति करत असे तिथे ही जाऊन तिथल्या म्यूझियम व एंटिक शोरूम्स ना भेटी देत असे.
असाच एकदा थॉमस बहिणी सोबत तिच्या साठी birthday गिफ्ट घेण्यासाठी एका एंटिक शोरूम ला गेला असता तिथे त्याने एक ग्रामोफोन पाहीला.
दिसताक्षणीच त्याला तो आवडला होता त्याने सौदा करायला शोरूम च्या मालकाशी भेट घेतली आणि खरेदी करण्यासाठी त्याला रक्कम विचारली. अगदी चेकबुक पेन काढून साहेब तायारित…
पण तो शोरूम चा मालक काही केल्या विक्री साठी तैयार होईना थॉमस दुप्पट भावाने तो ग्रामोफोन घेण्याची तयारी दाखवत खुप विनंती करू लागला शेवटी नाइलाजास्तव तो तयार झाला.
पण जाता जाता त्या मालकाने त्यांना तो परत माझ्याकडेच येईल अस सांगितले. तेव्हा त्या दोघानी ह्याला आपण जबरदस्ती ने विकायला भाग पाडला.
म्हणून असा बोलत आहे अस वाटल म्हणून त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिल नाही आणि बिल व तो ग्रामोफोन घेऊन घरी आले.
घरी आल्यावर प्रथम त्याने तो घरच्या मध्यभागी असलेल्या सुंदर नक्षीकाम असलेल्या टीपॉय वर ठेवला आणि चारी बाजूने सोफे ठेवले मध्यभागी टीपॉय व त्यावर ग्रामोफोन.
थॉमस जसा जुन्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी माहीर होता तसा तो म्युझिक चा सुद्धा दर्दी होता.
विशेषतः तो carl orff carmina burana o fortuna empress of the world या सॉन्ग चा भलताच चाहता होता.
खरच हे song… याची थीम म्यूजिक ऐकली कि एक वेगळ्याच जगाची अनुभूति येते मला तरी.
जेव्हा मला समजल तेव्हा मि हे song हेडफोन लावून ऐकल तसा एका वेगळ्या दुनियेत हरवलो होतो.
खुप रहस्यमयी गूढ दुनियेत ज्यांना रमायला आवडत त्यांना हे song आवडत.
असा एक रिसर्च सांगतो इतके वेगळ्याच लेवल ला जाऊन ठेवते ते song.
you tube वर आहे तुम्ही ही जरूर ऐका आणि या सॉन्ग बद्दल ची तुम्हाला आलेली फिलिंग नक्की सांगा … असो.
तर थॉमस ला ही आता ग्रामोफोन वर ते वाजवायची ओढ़ लागली आणि त्याने कुठून तरी त्याची तबकड़ी आणली.
आज थॉमस बार मधे भरपूर दारू पिऊन ती तबकडी घेऊन निघाला रात्र खुप झाली होती पाऊस पड़त होता बहुतेक तूफान येण्याची चिन्ह दिसत होती .
थॉमस ची बहीण कैथरीन त्याची वाट पहात सोफ्यावर बसली होती.
इतक्यात फूल टुन झालेला इकडे तिकडे झोके जात असलेला थॉमस घरात आला. रात्र होती… डीम्ड लाइट फक्त चालू होते.
थॉमसने हातातील ती डिस्क त्या ग्रामोफोन ला लावली आणि तेच त्याच्याच आवडीच carmina burana o fortuna song लावले.
सिगरेट पेटवत जिन्याने आपल्या रुम मधे जात असता कोणी तरी त्याच्या मागे मागे जात असल्याची एक आकृति दिसली.
कैथरीन ला वाटले नेहमी प्रमाणे कोणी तरी कॉल गर्ल असेल म्हणून ती सुद्धा गाण ऐकत त्यांच्या कड़े पहात होती.
पण त्याच्या मागे मागे असणारी ती आकृति आता त्याच्या खांद्यावर जाऊन बसली होती.
तो सिगरेट पितपित जीने चढायचा प्रयत्न करत होता जाम नशा झाली होती.
आता ती आकृति त्याचे केस धरून त्याच्या गळ्यावर चाकू घासत असताना स्पष्ट दिसू लागली.
कैथरीन ने हे दृश्य पहताच ती जोरात थॉमस म्हणून किंचाळत त्याकडे धावली त्याच्याच हाथाला धरून धावत सुटली.
जस जसे ते धावत होते तसा तो ग्रामोफोन जोरजोरात वाइबरेट होत होता आणि ते गाण अजुन लाऊड होत चाललेल.
हे दोघ जीव मुठीत घेऊन धावत आहेत,आणि ती आकृति त्यांचा पाठलाग करते आहे.
अगदी जाणून बुजुन एक विताच अंतर ठेवून ती आकृति त्याना घरातल्या घरात सळो की पळो करून सोडत होती.
त्यांचे mom dad दोघेही आपापल्या रूम मधे झोपले होते. त्याना तसुभर ही कळल नाही की बाहेर एक प्रचंड थरार नाट्य चाललय ते.
पहाटे च्या सुमारास तो थरार थाम्बला अचानक एक मोठ वादळ येऊन गेल्यावर जी शांतता पसरते ती शांतता पसरली.
ती आकृति निमुळती होत होत त्या ग्रामोफोन च्या साउंड स्पीकर मधे लुप्त झाली.
ते थ्रिल्लिंग म्युझिक बन्द झाल त्या बरोबर तो वाइब्रेट होणारा ग्रामोफोन ही बन्द झाला.
दोघे सुन्न पणे बसले होते सोफयावर रात्रि जो प्रकार घडला तो खरा होता कि स्वप्न असे ते एकमेकांना बघत होते.
एक भयंकर प्रकार जो फक्त दोघानी अनुभवला होता आता पूर्ण सकाळ झाली होती mom dad ही जागे झाले होते.
त्याना काहीच कल्पना नव्हती हळू हळू ती भावण्ड ताळ्यावर आली.
तसा थॉमस आणि कैथरिन ने तो ग्रामोफोन उचलून गाडीत टाकला आणि तड़क शोरूम गाठल आणि त्या दुकानात तो परत केला.
परन्तु त्यांना तो शोरूम मालक तेव्हा देण्यास का तयार नव्हता याचा प्रत्यय आला.
पण का??काय कारण होत आणि तो घेताना का सांगितले नाही विचारल तेव्हा तो म्हणाला….
हा ग्रामोफोन एका संगीत प्रेमी प्रेयसिने आपल्या प्रियकराला जो एक म्यूजिशियन होता त्याला गिफ्ट दिला होता.
तो म्यूजिशियन खुप ड्रिंक करत त्याच्या प्रेयसिने बरयाचदा त्याला समज देऊन पण त्याने तीच ऐकल नाही.
आणि एकदा एका कॉन्सर्ट वरुन येताना त्याने खुप ड्रिंक केल होत नशेत राश ड्राइविंग करत असता अपघात होऊन मृत्यु झाला.
त्याच्या दारुमुळे एक प्रेम काहाणीचा करुण अन्त झाला जाणून त्याच्या प्रेयसिने सुद्धा आत्महत्या केली.
त्यांनतर त्यांच्या प्रेमाची ही आठवण ज्या ज्या ड्रंकर व्यक्ति कड़े गेली त्यांना अश्या विचित्र अनुभवाना सामोर जाव लागल.
म्हणून हा हॉन्टेड पीस आम्ही विक्रीसाठी बन्द केला.
पण त्यादिवशी तुम्ही कुठलीच गोष्टि ऐकायच्या मनःस्थितित नव्हता शेवटी याची अनुभूति तुम्हाला यावी म्हणून मि रागातच तो तुम्हाला विकला.
शेवटी तो ग्रामोफोन आमच्या कडेच आला म्हणत त्याची रक्कम थॉमस ला परत देउ केली.
टीप :
१) घरात असल्या कुठल्याही वस्तुचा संग्रह करण्या आधी तिचा पूर्ण आढावा माहीती घ्या.
२) जर ती कोणाच्या प्रेमाच प्रतीक असेल.
म्हणजे एका व्यक्तिने ती दुसऱ्या व्यक्तिस देऊ केली असेल तर ती विकत घेण्यापासून चार हाथ लांबच रहा.
सदर चा किस्सा ही त्याच वास्तुविशारद व्यक्तिने सांगितला होता.
©प्रथम वाडकर
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
