My title My title
BlogSomething Different

Cemetery- A mysterious place

Cemetery- A mysterious place

स्मशान- एक गुढ रहस्यमयी ठिकाण



©Anna®2020

7249157379



आपल्या आसपास काही गुढ, रहस्यमयी ठिकाणे असतात. काही रहस्यमयी इमारती आहेत, मंदीरे आहेत, एखादी जागासुद्धा रहस्यमयी असते.

आज आपण एका वेगळ्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत. ते ठिकाण आहे स्मशान!
प्रत्येक गावाबाहेर, शहराबाहेर हे रहस्यमयी गुढ शक्तिंनी सामावलेले ठिकाण प्रत्येकानेच बघितलेले असेलच.

माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मी अनुभवलेल्या प्रचंड गुढ शक्तीचे ठिकाण एकमेव स्मशानभूमी आहे.

गुरूदिक्षेआधीपासूनच मला स्मशानाबद्दल प्रचंड आकर्षण होते. माझ्या आयुष्यात जेवढ्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये मला ह्या स्मशानसाधनेने आणि तेथील स्मशान शांततेने खूप मोठी साथ दिली आहे.

गुरूदिक्षेनंतर ज्यावेळी माझ्या गुरूंनी स्मशानाचा खरा अर्थ सांगीतला त्यावेळी ह्या ठिकाणाबद्दलचे आकर्षण प्रचंड वाढले.

स्मशान! तामसिक आणि विध्वंसक शक्ति जिथे वास करतात ते मुख्य ठिकाण म्हणजे स्मशानभूमी.

स्मशानभूमी एक पवित्र ठिकाण आहे, जिथे माणसाच्या मृत्युनंतर शवावर अंत्यसंस्कार केले जातात असे ठिकाण, स्मशान एक पवित्र यज्ञशाळा आहे- जिथे पंच तत्वाची आहूती दिली जाते.

परंतु अध्यात्मिक दृष्टीकोनातून स्मशानाचा अर्थ लोकांनी वेगवेगळे काढले आहेत. स्मशानभूमीमध्ये मानवी शरीरातील पंच महाभूते- ब्रम्हलीन होतात असे हे गुढ रहस्यमयी ठिकाण आहे.

आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि अग्नि ह्या पंचमहाभूतांपासून विश्वातील सर्व जीवांचा देह निर्माण झालेला आहे.

शरीर किंवा देह ह्या पंचमहाभूतांच्या मिश्रणातून निर्मित तत्वांना पुन्हा ह्याच ठिकाणी देहसंस्कार करून ब्रम्हांडामध्ये विलीन केले जाते.

तामसिक आणि विध्वंसक शक्ति असलेल्या सर्व देवी- देवता ह्याच कारणामुळे स्मशानभूमीमध्ये निवास करतात.

महाकाली, माता तारादेवी, काळभैरव, भैरव, भैरवी, लाकीनी, शाकीनी, हाकीनी, डाकीनी, महापिशाच्चिनी, वेताळ अशा अनेक तामसिक शक्ती स्मशानभूमीमध्ये निवास करतात.

ह्याचे मुख्य कारण हे आहे की, अध्यात्मिक दृष्टीने स्मशान विकार रहीत मानवी ह्रदयाचे प्रतिनिधीत्व करतात.

म्हणून प्रत्येक प्राणीमात्राच्या ह्रदयाची अधिष्ठात्री महापिशाच्चिनी देवी आहे. मानवी शरीर अनेक विकारांनी भरलेले ठिकाण आहे.

काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ इत्यादी विकारांचे सर्वात मोठे निवासस्थान म्हणजे मानवी देह आहे.

त्यामुळे महाकाली, देवी तारा माता, महापिशाच्चिनी ह्याच स्थानावर विराजमान असतात.

ज्यावेळी माणसाच्या ह्रदयातून ह्या सर्व विकारांचा संस्कार होवून साधक काम, क्रोध, मोह, मत्सर ह्यातून बाहेर पडतो त्याचवेळी अशा पवित्र साधकाच्या ह्रदयावर महाकाली किंवा अन्य देवता विराजमान होते.

जसे मृत शरीरावर देहसंस्कार करण्यासाठी लाकडांच्या ढिगार्‍यावर ठेवून मृत शरीराला अग्नि दिला जातो.

अगदी तशाच प्रकारे साधकाने आपल्या स्मशानरूपी ह्रदयामध्ये ज्ञानरूपी अग्नि सतत प्रज्वलित ठेवला पाहीजे.

कारण अज्ञानरूपी अंध:कार किंवा शरीरातील वाईट विकार ज्ञानरूपी अग्निमध्ये जळून राख झाल्याशिवाय अंध:कार मिटून आत्मज्ञानाचा प्रकाश निर्माण होणार नाही.

स्मशानवासिनी महाकाली शवरूपी शिवावर विराजमान आहे. शव हेच देवीचे प्रिय आसन आहे.

जिवंत असूनही जो साधक सर्व मोहमाये पासून मुक्त झालेला असतो अशा साधकाच्या ह्रदयालाच देवी आपले प्रिय आसन बनवते म्हणजे अशाच साधकाच्या ह्रदयावर देवी चैतन्य निर्माण करून विराजमान होते.

स्मशानवासिनी महाकालीचे रूप उग्र आहे. देवीचा वर्ण घनघोर म्हणजे अत्यंत काळा आणि भयंकर भितीदायक स्वरूप आहे.

परंतु देवीचे साधक किंवा भक्तांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. स्वत: काळ किंवा यम महाकालीला घाबरतात तर देवीचा भक्तसुद्धा मृत्युला, संकटांना कधीही घाबरत नाही.

महाकाली आपल्या भक्तांची स्वत: काळजी घेत असते.

देवी स्वरूपामध्ये देवी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये तिन्ही लोकांचे पालन करते.

आपल्या अमृतमय दुधाला आहाररूपामध्ये रूपांतरीत करून साधकाला आणि समस्त सृष्टीला कृतार्थ करते.

देवी महाकालीचे विकराळ दात बाहेर सुळांच्या रूपामध्ये आलेले दिसतात तसेच त्या विकराळ दातांमध्ये देवीने आपली जिव्हा (जीभ) दाबून ठेवली आहे.

ह्याचा अर्थ असा आहे की, देवी महाकालीने रजो आणि तमोगुणी जिव्हाला (जीभेला) सत्वगुणांचे प्रतिक असलेल्या उज्वल दातांमध्ये दाबून ठेवले आहे.

देवी महाकालीचे केस घनघोर काळ्या ढगांसारखे विखूरलेले आहेत ह्याचा अर्थ असा आहे की, देवी सृष्टी संहारकर्ती आहे.

ज्यावेळी सृष्टीमध्ये अहंकार, लोभ, मत्सर, स्वार्थ ह्या सर्वांची प्राण्यांकडून परीसीमा गाठली जाईल त्यावेळी देवी ह्या सृष्टीचा तिच्या मुळ स्वरूपात म्हणजे अक्राळ विक्राळ स्वरूपात अशा प्रवृत्तींचा नाश करेल.

स्मशानवासिनी कालीमाता आणि तारा एकाच शक्तीचे दोन स्वरूप आहेत. एकच अंश आहेत. दोन्ही स्वरूपांची शक्ती अतिउग्र आहे.

स्मशान साधनेमध्ये लीन असलेला साधकसुद्धा देवी महाकालीसारखेच शक्तीशाली व भयानक असतात. महाकालीची उपासना स्मशान साधक अत्यंत शांत स्वभावाचे असतात.

मात्र ज्यावेळी अशा साधकाला कोणी विनाकारण त्रास दिला तर देवीचे साधक शीघ्रकोपी होतात व त्रास देणार्‍या व्यक्तीला भयानक शासन द्यायला मागेपूढे पहात नाहीत.

अशा गुढ रहस्यमयी शक्तींनी भारलेल्या स्मशानभूमीचा नेहमी आदर करावा. स्मशान एक पवित्र ठिकाण आहे त्याची पवित्रता भंग करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.



©Anna®2020

7249157379





आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button