Unsolved Mystery of Titanic – a Coincidence In Marathi
July 29, 2021 | by Varunraj kalse

Unsolved Mystery of Titanic
©प्रथम वाडकर
Titanic एक जगप्रसिद्ध पण तितकच दुर्दैवी ठरलेल जहाज. त्यावेळच जगातील सर्वात मोठ जहाज अशी ख्याति असलेल.
हे प्रचंड व अजस्त्र जहाज ज्याला 4 वर्षात 3000 लोकांच्या टीम बनवल होत.
सर्व सोई सुविधानी युक्त अस हे जहाज कधीच बुड़णार नाही ऐसा दावा केला होता हे बनवणार्या कंपनी ने…
पण 15 एप्रिल 1912 रोजी एका हिमनगा ला आदळून हे जहाज बुडाल पण हे जहाज बुडण्या पूर्वी 14 वर्षा अगोदर याच्या बद्दल इंडिरेक्टली भाकित केल गेल होत…
Titanic जहाज जलसमाधिस्त होण्याच्या 14 वर्ष अगोदर एक नॉवेल प्रसिद्ध झाल होत.
मॉर्गन रॉबर्टसन नावाच्या लेखकाने द रेक ऑफ द टाइटन or फटिलिटी नावाची एक कादम्बरी लिहिली होती.
ज्यात टाइटन नावाच्या कधीही न बुड़णाऱ्या जहाजाची कथा होती आणि त्या कथेतल्या बऱ्याच गोष्टीत व खऱ्या
Titanic जहाजाच्या बाबतीत घड़लेल्या घटनांमधे साधर्म्य होत.
सुरवात नावानेच झाली नॉवेल मधील जहाजाच नाव टाइटन
तर वास्तवातील जहाजाच नाव Titanic.
कथेत टाइटन जहाज कधीच बुड़णार नव्हतं असा दावा केला होता आणि हाच Titanic बाबत ही केला होता.
पण कथेतल व ख़र जहाज त्यांच्या पहिल्याच सफर च्या दरम्यान बुडाल.
14 वर्ष अगोदर लिहिलेल्या नॉवेल प्रमाणे टाइटन जहाज प्रवास एप्रिल महिन्यात सुरु झाला होता व खऱ्या Titanic चा प्रवास ही एप्रिल महिन्यातच सुरु झाला होता.
कथेतील टाइटन जहाज ही हिमनगाला आधळून बुडण्यास कारणीभूत झाल आणि वास्तवात ही Titanic एका हिमनगाला आधळून बुडाल होत.
अस म्हणतात की हा हिमनग 29000 वर्षापासून समुद्री पाण्यावर तरंगत होता.
नॉवेल मधील जहाजात लगभग 2200 लोक होती आणि Titanic मधेहि जवळपास तेवढीच लोक सफर करत होती.
नॉवेल मधील जहाजात ही मागणीपेक्षा कमी लाईफ बोट्स होत्या व खऱ्या Titanic जहाजात ही मागणीपेक्षा कमी लाईफ बोट्स होत्या.
असे बरेच सिमिलर पॉइंट्स होते.
मग टाइटैनिक च्या 14 वर्ष आधीच पब्लिश झालेल्या या नॉवेल ची व खऱ्या Titanic कहाणी समांतर होण्या मागे क़ाय रहस्य होत की हा निव्वळ योगायोग होता???
असच एक भाकित माइकल जैक्सन च्या मृत्युबाबत करण्यात आल होत.
माइकल जैक्सन च्या मृत्युच्या फक्त 5 तासा पूर्वी विकिपीडियावर त्याच्या मृत्यु बद्दल प्रेडिक्शन करण्यात आल होत.
ज्यात म्हंटल होत की पाच तासा नंतर माइकल जैक्सन चा मृत्यु होईल.
इंटरनेटवर हे खूप वायरल झाल होत पण कोणीतरी मुद्दाम ही फेक न्यूज़ देऊन प्रैंक केला असावा. असा सर्वांनी समज करून घेतला पण…
जेव्हा खरच माइकल जैक्सन च्या मृत्युची बातमी आली तेव्हा सर्वानी ते प्रेडिक्शन देणार्याचा इंटरनेट मार्फ़त शोध घेतला.
पण इतक परफेक्ट प्रेडिक्शन देणाऱ्या व्यक्तिचा आजतागायत शोध लागला नाही, विकिपीडिया वर मायकलच्या मृत्युच प्रेडिक्शन एक रहस्य बनून राहील…
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©प्रथम वाडकर
RELATED POSTS
View all
