Itworkss

The Honey trap of Coding Classes For Kids

July 28, 2021 | by Varunraj kalse

The Honey trap of Coding Classes For Kids

The Honey trap of Coding Classes For Kids

कोडींग क्लासचे मायाजाल




©Rahul Ghalwadkar




आजकाल एक नवीन फॅड आले आहे. बरेच पालक ७०-८० हजार फी भरून Coding चा क्लास मुलांच्या करिता लावतात.

(हा एक प्रकारचा Coding Classes चा Honey trap च आहे.)



सर्व मुलं सुद्धा फक्त ११-१२ वर्षाच्या पुढील असतात. हे तर खर म्हणजे ५-६ वी मधल्या मुलाला पदवीचा अभ्यासक्रम दिल्या सारखे आहे.


पण पालकांना मात्र त्यानं कसा एक Game तयार केला आहे किंवा एक Coding Program तयार केला आहे ह्याचच कौतुक असतं.


एक तर त्या विद्यार्थ्याला पुढे काय करायचे आहे याचा विचार यामध्ये केलेला नसतो. सगळेच जण काही सॉफ्टवेअर डेव्हलमेंट मध्ये जात नाहीत.


अनेकदा पालकांची अपेक्षा असते की जे आम्ही करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करावं.

परंतु त्या क्षेत्रातील ज्ञान नसल्यामुळे पालक वाट्टेल तेवढी फी भरून Coding Classes ला  प्रवेश घेतात.


दुसरी गोष्ट एवढ्या लहान वयात सॉफ्टवेअर Coding शिकून काय उपयोग आहे.


जोपर्यंत शिक्षण पूर्ण करून तो नोकरी शोधायला लागेल तेव्हा आताची टेक्नॉलॉजी त्याला काय उपयोगी येणार आहे याचा विचार कोणी करत नाही.


त्याने नोकरी शोधायच्या वेळेपर्यंत म्हणजे साधारण २०३० साल मध्ये जे करिअर उपलब्ध असेल;


त्यातील सुमारे ७५-८० टक्के करिअर आता खूप प्रायमरी स्टेज मध्ये आहेत किंवा अजुन अस्तित्वातच आलेली नाहीत.


उदाहरण द्यायचे झाले तर २०१५ मध्ये उंचावरून शूटिंग करत असताना हेलिकॉप्टर मधून एक माणूस शूटिंग करत असे, पण आता तेच काम एक Drone camera करतो.


पण यामुळे तो हेलिकॉप्टर वाला आणि शूटिंग करणारा दोघंही बेकार झाले.


४-५ वर्षापूर्वी लोक थिएटर मध्ये सिनेमा बघायला जायचे पण आता सगळे OTT वर दाखवले जातात.


पण हे त्यांना त्यावेळी सांगितले असते की Drone ची टेक्नॉलॉजी येणार आहे किंवा OTT वर सिनेमा रिलिज होणार आहेत, तर त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नसता.


तिसरी गोष्ट Software Development ही अशी गोष्ट आहे की त्याला सारखी त्याची प्रॅक्टिस पाहिजे नाहीतर ते विसरून जाते, हे तुम्हाला कोणीही Software Development मधला माणूस सांगू शकेल.


आता ६-७ वी मध्ये सुरुवात करून सलग ९-१० वर्ष बाकीचा अभ्यास सांभाळून तो विद्यार्थी ते करू शकणार आहे का याचा कोणी विचार करत नाही.


आता तर Artificial Intelligence पण सिलॅबस मध्ये include केले आहे म्हणे, जो विषय एवढा मोठा आणि कॉम्प्लेक्स आहे तो या मुलांना समजेल अशी अपेक्षा कशी ठेवता येईल.


कारण ते समजण्यासाठी जी maturity लागले ती त्यांना या वयात असेल असे कसे म्हणता येईल.


एका Advertisement मध्ये लोक मुलाने केलेल्या सॉफ्टवेअर करिता मारामारी करताना दाखवले होते.


त्यांच्या कडे एडमिशन घेतलेल्या ५% मुलांना तरी अश्या opportunity मिळालेल्या दाखवतील काय?


मग यापुढे जाऊन एकदा एडमिशन घेतल्यावर ते justify करण्याशिवाय पालकांकडे पर्याय रहात नाही.


आधीच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा Screen Time वाढलेला आहे, आणि ह्या Coding Classes मध्ये तो आणखीन वाढतो.


त्यापेक्षा तो Screen Time कमी करण्यासाठी मुलांना खेळणे आणि इतर छंद लावणे गरजेचे आहे.


म्हणून पालकांना एवढेच सांगणे आहे की ह्या मायाजालात अडकू नका.


Advertisement करणारे काहीही सांगतील पण त्यावर किती विश्वास ठेवायचा.


सगळ्यात महत्वाचे मुलांवर किती बर्डन टाकायचं हा निर्णय तुमच्या हातात आहे.




लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा




©Rahul Ghalwadkar

RELATED POSTS

View all

view all