Itworkss

jevnachi bhartiy paddhat

December 8, 2021 | by Varunraj kalse

जेवणाची भारतीय पद्धत



©आण्णा-7249157379



घरामध्ये भोजन करत असताना भारतीय पद्धत अशी आहे की, सर्वप्रथम ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा उच्चार करावा.

आपल्यासमोर पाण्याने चौकोनी मंडळ करावे. त्यावर जेवणाचे ताट ठेवावे. उजव्या हाताला पाण्याचे भांडे ठेवावे.

नंतर भगवंताला आठवून, जे अन्न आहे त्याला नमस्कार करावा व जेवण सुरू करावे. यापूर्वी गाईसाठी गोग्रास काढावा.

भोजन करताना तोंड पूर्व दिशेस असावे. दोन्ही हात, पाय धुवून भोजन करावे. ज्याचे आई- वडील जिवंत असतील त्याने दक्षिणेला तोंड करून जेवू नये.

जेवताना डाव्या हाताचा अन्नाला स्पर्श करू नये. रात्री जेवताना जर लाईट गेली, दिवा विझला तर भोजन थांबवावे.

उजव्या हाताने अन्नाला स्पर्श करावा. गायत्री मंत्राचे मनात स्मरण करावे. पुन्हा लाईट आल्यावर दिवा लागल्यावर जेवण सुरू करावे.

जेवण झाल्यावर हात धुवून ते डोळ्यावरून फिरवावेत. फिरवताना हळूहळू पोटावर गोल हात फिरवणेही चांगले असते.

जर कोणी दुर्बल व्यक्ती किंवा मूल जेवण झाल्यावर हात धुवून ते हात आपल्या शरीरावर हळूहळू फिरवेल तर त्याला आरोग्य लाभेल. रोग दूर होईल.

भोजनासाठी पितळी भांडी सर्वोत्तम आहेत. चांदीच्या भांड्यात जेवल्याने आरोग्य व लक्ष्मी मिळते. स्टीलची भांडी प्रशंसनीय नाहीत.

कांस्याची कल्हई केलेली भांडीही शुभ आहेत.

बैठक खोली-

फ्लॅटच्या नैऋत्य, आग्नेय किंवा दक्षिण दिशा सोडून बैठक खोली शक्यतो ईशान्य, पूर्व, उत्तर अथवा वायव्य दिशेस बनवणे हितकर असते.

सोफासेट, दिवाण, पलंग इ. दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लागून ठेवावेत. बैठक खोलीतील ईशान्य कोपरा रिकामा ठेवावा.

त्याच्या बाजूला मातीच्या फुलझाडांच्या कुंड्या ठेवाव्यात. त्यात पाणी टाकून ठेवाव्यात. या फुलझाडात ‘मणी प्लांट’ ठेवणे शुभ असते.

सुंदर फुलदाणी खोलीत वायव्य, उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू शकतो.

फ्लॅटमध्ये घरात, खोल्यात किंवा बाहेर कुंडीत, खाली अंगणात कधीही वॅ कटस लावू नयेत. त्यामुळे असंतोष निर्माण होतो.

त्याऐवजी गुलाब, क्रोटॅन, पाम, मनी प्लांट, फर्न इ. मोठी किंवा छोटी झाडे सुंदर कुंड्यांमध्ये लावू शकतो.

बैठक खोलीत ईशान्य, उत्तर, पूर्व दिशेला लटकणार्‍या कुंड्या लावू नयेत. त्या पश्चिम दिशेला लावाव्यात.

टिव्ही जर वायव्य कोपर्‍यात ठेवला तर सतत कटकटी चालू राहील.

शोकेस, धातूच्या सजावटीच्या वस्तू, जनावरांचे माॅडेल (आकृत्या), दक्षिण वा पश्चिम दिशेला ठेवाव्यात. टीपाॅय चौकोनी किंवा आयताकार असावा.

गोल वा कोपरे कापलेला नसावा. जर बैठकीत बिछाना, पलंग ठेवायचा असेल तर तो पश्चिमेला ठेवावा. झोपताना पाय दक्षिणेला कधीही नसावे.

गॅरेज किंवा आऊट हाऊस-

घराच्या चारही बाजूंनी मोकळा असलेल्या जागेत गॅरेज किंवा आऊट हाऊस (उपगृह) बनवताना काळजी घ्यावी.

खुल्या असलेल्या स्थानात प्रत्येक कोपर्‍यात किंवा कोणत्याही कोपर्‍यात आऊट हाऊस किंवा गॅरेज बनवू नये. गॅरेज किंवा उपगृह बनवताना कंपाऊंडच्या भितींचा आधार घेवू नये.

त्यात कमीत कमी २ ते ५ फूट अंतर असावे. नाहीतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

आग्नेय कोपर्‍यात हाऊस कंपाऊंडच्या भिंतीला लागून केल्यास आर्थिक हानी, नुकसान, दिवाळखोरी, मोठे आजारपण, मुलींचे उशिरा विवाह इ. समस्यांना तोंड द्यावे लागेल.

आग्नेय कोनात कंपाऊंडच्या भिंतीचा आश्रय न घेता उपगृह बनवू शकता. ईशान्य कोपर्‍यात कंपाऊंट भिंतीचा आश्रय न घेता किंवा घेऊन आऊट हाऊस बनवू नये.

त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काहीच बांधकाम करू नये. या दिशेला बांधकाम केल्यास संतती विनाश, दिवाळखोरी, व्यापार बंद होणे इ. विपत्ती येतात.

या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनाचा काहीही उपयोग होत नाही. जर या ठिकाणी तुम्ही गॅरेज किंवा उपगृह बनवलेले असेल तर ते पाडण्याशिवाय दुसरा उपाय नाही.

वायव्य कोपर्‍यात कंपाऊंड भिंतीच्या आधाराने तयार केलेले आऊट हाऊस विनाकारण वैमनस्य, प्रगतीत अडथळा निर्माण करते.

म्हणून कंपाऊंडच्या उत्तर व पश्चिम दिशेला २ फूट अंतरावर आऊट हाऊस बांधावे. नैऋत्य कोपर्‍यातही कंपाऊंड भिंतीला लागून किंवा दूर गॅरेज, आऊट हाऊस बनवू नये. असा सल्ला दिला जातो.

अशा आऊट हाऊसमध्ये राहाणार्‍या लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे. लागते. गॅरेज असेल तर वाहन अपघात किंवा त्यावर अनावश्यक खर्च वाढतो.

अशावेळी ते गॅरेज, आऊट हाऊस अडगळीची खोलीसारखे वापरावे.

भूखंडात संपूर्ण पूर्व भागात गॅरेज किंवा उपगृह बनवल्यास मालकाची प्रगती पूर्व थांबते. म्हणून संपूर्ण पूर्व भागात बांधकाम न करता आग्नेय भागात करावे. कंपाऊंट वाॅलपासून दूर करावे.

प्लाॅटमध्ये संपूर्ण उत्तर भागात गॅरेज किंवा उपगृह बनवल्यास मालकाची आर्थिक हानी होते. त्याचा खर्च वाढतो. त्याला जीवन व्यर्थ बोजा वाटू लागतो.

भूखंडात संपूर्ण पश्चिम भागात गॅरेज, आऊट हाऊस बनवल्यास मालकाला असफलता, विनाकारण वैमनस्य येते. संपूर्ण हानी कमी करण्यासाठी वायव्य कोपरा सोडून देऊन कंपाऊंडच्या भिंतीचा आश्रय न घेता उपगृह बांधावे.

दक्षिण- पश्चिम कोपर्‍यात केवळ अडगळीचे सामान ठेवावे. ते कोणास राहण्यास देऊ नये.

भूखंडात संपूर्ण दक्षिण भागात गॅरेज, आऊट हाऊस बनवल्यास त्यामुळे घरात राहणार्‍यांना विशेष करून माहिलांना मानसिक चिंता होते.

त्यामुळे आर्थिक हानीदेखील होते. या अशुभ परिणामांच्या प्रतिकारासाठी भूखंडात आग्नेय कोपरा सोडून कंपाऊंडच्या दक्षिण भिंतींचा आधार न घेता उपगृह बांधावे.



©आण्णा-7249157379



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all