Showroom & Dummy Model – A real Incident in Marathi
August 11, 2021 | by Varunraj kalse

©प्रथम वाडकर
सदर घटना नेमकी कोठे घडली होती आठवत नाहीये… बहुदा टेक्सास मधला हा Showroom & Dummy Model चा Incident होता.
घराच इंटेरियर डेकोरेशन करणाऱ्या कंपनीच Showroom होत, त्यात त्यांनी असंख्य छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची Dummy Models बनवली होती.
ज्यांना ज्या प्रकारे घराच इंटेरियर करायच असेल त्यांनी एक Dummy Models सिलेक्ट करायच आणि कंपनी त्या प्रकारे घराच इंटेरियर डिजाइन करून देत असे.
नव्याने उघड़लेल ते Showroom होत, काही तुरळक लोकांनी तिथून आपल्या घराच इंटेरियर करून घेतल होत.
इंटेरियर पूर्ण झाल की ते शोरूम मैनेजमेंट क्लाएंट नी सिलेक्ट केलेल Dummy Model रूपी छोटुल घर मुलांना खेळण म्हणून गिफ्ट देत असे…!
असच एका फॅमिली ने त्या Showroom मधून आपल्या घराच इंटेरियर डिजाइन करून घेतल होत.
आणि नियमानुसार ते पूर्ण झल्यावर Showroom कडून त्यांना Dummy Model गिफ्ट करण्यात आल.
एक दिवस त्या फॅमिलीतील लहान मुले सुट्टीच्या दिवशी त्या Dummy Model सोबत खेळत होती तर त्यांची आई बाजूला डायनिंग टेबल वर बसून ब्रेकफास्ट करत होती.
पण अचानक तिची चेअर पुढे मागे होऊ लागली हळू हळू ती गोल गोल फिरू लागली अचानक घड़लेला प्रकार तीला कळत नव्हता;
चेअर अशी पुढे मागे गोल गोल परत पुढे मागे का फिरत आहे…? तिही त्या चेअर सोबत फिरली जात होती.
मूलं खेळण्यात दंग होती आणि ति बाई घाबरून ओरडत होती अचानक तीच लक्ष आपल्या मुला कड़े गेल जो त्या Dummy Model मधल्या चेअर सोबत खेळत होता.
तिने त्या मुलाला ती चेअर फिरवण थाम्बव म्हणून संगीतल असता तीची चेअर फिरायची एकदम थाम्बली…!
ति चेअर वरुन उतरुन त्या Dummy Model जवळ गेली आणि त्या Model मधे असणाऱ्या किचन मधील काही भांडी खाली पाडली असता तीच्या घरातील किचन मधील भांडी आपसुक खाली पडली.
नंतर तिने त्या Dummy Model मधील अजून काही गोष्टी म्हणजे सोफासेट वगैरे हलवला आणि समोरील बाजूस सरकवला असता तीच्या घरातील ही सोफासेट आपोआप समोरच्या ठिकाणी सरकला.
नंतर तिने त्या Model मधे असलेल्या मेन डोर व सर्व खिड़क्या ओपन केल्या आणि इथे तीच्या घरात ही त्यांच क्रमाने मेन डोअर व खिडक्या उघडल्या गेल्या…!
ज्या प्रमाणे ति बाई त्या Dummy Model मधे चेंजेस करत होती तसेच चेंजेस तीच्या प्रत्यक्ष घरात होत होते आणि तेही आपोआप…
तीने तत्काळ घडत असलेला प्रकार त्या Showroom च्या मैनेजमेंट ला कळवला त्यांना आधी यावर विश्वास बसत नव्हता.
पण त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष येऊन पहाणी केली असता Dummy Model मध्ये केलेले चेंजेस प्रत्यक्ष घरात होत असलेले पाहून त्यांचा ही विश्वास बसला पण आता पुढे क़ाय आणि हे कशामुळे घडत आहे त्यांना कळत नव्हतं…
जे घडत होत ते विचित्र होत नक्की आणि पुढे कोणाच्या जीवावर बेतु नये म्हणून त्यांनी पैरानॉर्मल एक्सपर्ट्स चा सहारा घेतला.
परंतु त्यांना त्यात कोणत्याही अमानवीय किवा पारलौकिक शक्तिचा आभास जाणवत नव्हता कुठल्याही स्पीरिट रीडिंग मिळत नव्हती पण तो अजीब प्रकार मात्र घडत होता…
शेवटी त्यांनी सर्व Dummy Models एकत्र केली ज्या ज्या लोकांनी त्यांच्या कडून इंटेरियर करून घेतल होत त्यांच्या कडून ती गिफ्ट्स दिलेली Models मागवून घेतली.
सर्व डिस्ट्रॉय केली पण डिस्ट्रॉय केल्या नंतर त्यात ज्या घरांच त्यांनी इंटेरियर करून दिल होत त्याची ही Dummy घर होती.
डिस्ट्रॉय केल्या मुळे त्या त्या क्लाएंट च्या प्रत्यक्ष घरातील इंटेरियरचही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होत.
त्या इंटेरियर डिजाइनर कंपनीला जबरदस्त फ़टका बसला होता. कारण त्यांनी पुन्हा सर्व क्लाएंट च्या घराच नव्याने इंटेरियर करून दिल होत एकही पैसा न घेता.
त्यांनी पुन्हा अशी Models ठेवण व गिफ्ट देण मात्र कायमच बंद केल. त्यानंतर त्यांच्या कंपनीत असा विचित्र प्रकार थांबला.
पण ह्या घटनेच गूढ़ मात्र आज ही कायम आहे.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©प्रथम वाडकर
टीप: सदरील फोटो गुगल हून घेतला आहे, तसेच प्रतिकात्मक आहे.
RELATED POSTS
View all
