My title My title
Something Different

The Unsolved Mystery of Zanetti Train

The Unsolved Mystery of Zanetti Train



©प्रथम वाडकर



जगातील रहस्यमयी गूढ़ घटानां पैकी एक दुर्मिळ व तितकीच रोमांचकारी गूढ़ रहस्यमयी घटना

Zanetti Train / घोस्ट ट्रेन

या रहस्यमयी घटने कड़े पैरेलल यूनिवर्स शी सम्भन्धित घटना म्हणून ही पाहील जात.



आपल्या जगात अनेकोनेक गूढ़ रहस्यमय घटना घडत असतात फक्त त्या कळून येण्यास एक वेगळी नजर लागते कधी कधी त्या कळून येतात.


तर कधी डोळ्या समोर घडल्या तरी कळत नाहीत आणि मग एकच विचार मनात येतो तो म्हणजे आता समोर घडल ते नेमक क़ाय होत…?


अशीच एक विचित्र घटना घडली होती रोम मधे.

 14 जून 1911 साली रोमच्या एका रेल्वे स्टेशन वरुन Zanetti नावाची ट्रेन निघाली पण ति ट्रेन तीच्या डेस्टिनेशन वर कधी पोहोचलीच नाही…



एका ट्रेन बनवीणाऱ्या कंपनी ने Zanetti नावाची एक ट्रेन बनवून तयार केली आणि फर्स्ट राइड फ्री ठेवली होती.

एकूण 106 पैसेंजर त्या नव्याकोऱ्या Zanetti ट्रेन मधून फ्री राइड चा अनुभव घेणार होते.

ट्रेन रोम च्या रेल्वे स्टेशन मधून निघणाऱ होती जवळच्याच एका हिल स्टेशन वर जाण्यास….



14 जून 1911 साली ही 106 पैसेंजर्स ना घेऊन निघालेल्या त्या ट्रेन मधील यात्रेकरुना स्वप्नात ही वाटल नसेल की Zanetti ट्रेन तीच्या डेस्टिनेशन वर कधी पोहोचणार नाही याची…



ते प्रवासी एका कधीही न सम्पणार्या प्रवासाला निघाले होते.

Zanetti रोमच्या स्टेशन वरुन निघाली पण हिलस्टेशन ला जाण्यासाठी लागणाऱ्या एका 1 किलोमीटर च्या लोम्बार्दे बोगद्यात रहस्यमयी रित्या गायब झाली कायमची…


Zanetti ला लोम्बार्दे बोगदयात एंटर करताना लोकांनी पाहील पण दूसर्य्या साइड ने ट्रेन त्या बोगद्यातून बाहेर आली नाही.


रेल्वे प्रशासन व रोम पोलिसांना वाटल की ट्रेन नवीन असल्याने बिघाड झाला असावा त्यामुळे ति बोगद्यात अड़कुन फसली असावी.


जस जसे पोलिस व रेल्वे अधिकारी त्या बोगद्यात गेले असता एक भीतिदायक वातावरण तयार झाल कारण त्यांनी तो बोगदा पूर्ण पास केला.


पण ति तीन कंपार्टमेंटची 106 पैसेंजर्स ना घेऊन निघालेली Zanetti ट्रेन कुठेच दिसली नाही. पुढे जाऊन त्यांनी रेल्वे track हिलस्टेशन च्या डेस्टिनेशन पर्यंत पिंजून काढला पण ति ट्रेन कुठेच दिसली नाही…


ही घटना पोलिस व रेलवे प्रशासना साठी एक डोकेदुखी होऊन बसली असता… अचानक दोन घाबरलेल्या व मानसिकता बिघड़लेल्या दोन व्यक्ति आल्या ज्या त्याच ट्रेन मधून प्रवास करत होत्या.


आधी काही सांगायला तयार नसलेले ते दोघे धीर देताच सांगू लागले कि… जशी ट्रेन लोम्बार्डे बोगदयात एंटर झाली तसा एक black & white धुर त्या ट्रेन समोर तयार झाला.


एक अमानवीय विचित्र वातावरण निर्मित झाल आजुबाजुच दृश्य साफ बदलत गेल एक गम्भीर आवाज येऊ लागला आणि ट्रेन त्या रहस्यमयी धुक्यात दिसेनाशी होत होती.


ते पाहून आम्ही दोघांनी पटापट ट्रेन मधून ख़ाली उडया मरल्या.. तो धुर जस क़ाय त्या ट्रेन ला गिळंकृत करत होता.. पण त्यानंतर क़ाय घडल् आठवत नाही आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो.


ट्रेन ची मिस्ट्री सॉल्व होते न होते तोच एक मोठा ट्विस्ट आला ही ट्रेन तब्बल 70 वर्षे मागे म्हणजे भुतकाळात पोहोचली ति कशी??


ते पुढे:-

त्याच ट्रेन मधे प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या नातेवाईकास 1926 च्या आर्काइव रेकॉर्ड मधे विचित्र घटना वाचनात आली ति म्हणजे:-

1845 साली मेक्सिको मधे एका वेड्यांच्या ईस्पितळात एकाच दिवशी, मानसिक स्वास्थ्य बिघड़लेल्या व घाबरलेल्या अवस्थेतील 104 लोकांना एडमिट केल्याच वृत्त होत.



त्या 104 जणांच अस म्हणन होत की ते सर्व रोम चे रहिवासी असून ट्रेन मधून ते इथवर आलेत, बाकी काही सांगण्याच्या मनःस्थितित ते नव्हते त्यातील एका कड़े Tabaco Box होता ज्यावर 1907 अशी कंपनिची मैन्युफैक्चरिंग डेट होती..


तो जप्त केलेला Tabaco Box आज ही मैक्सिको प्रशासना कड़े आहे.

पण रोम ते मैक्सिको अंतर 10,000 किलोमीटर पेक्षा ही जास्त असून व मधे ocean असून ही ट्रेन त्या काळात कुठलाही रेल्वे मार्ग उपलब्ध नसताना समुद्री मार्गे पोहोचलि कशी हे एक कोडच आहे…


त्या 1911 च्या घटने नंतर बऱ्याच देशात इंडिया,जर्मनी,रोमेनिया मधे Zaneti ला पाहिला गेल्याच सांगितले जाते. 1955, 1970, 1991 साली काही देशात ही ट्रेन पटरी वर थोड्या वेळाकरता दिसून आली…


1991 साली Poltava मधे ही ट्रेन दिसून आली असता एक पेरानॉर्मल इंवेस्टिगेटर या ट्रेन मधे चढला आणि त्याच्या सकट ती ट्रेन पुन्हा गायब झाली.


आज ही त्या इंवेस्टिगेटर चा व ट्रेन च्या मिस्ट्री चा तपास चालू आहे..


या घटने नंतर त्या ट्रेन ला Ghost Train या नावे ओळखल जाऊ लागल….


ज्या लोम्बार्डे बोगदयात ही ट्रेन गायब झाली होती तो बोगदा रोम ने कायमचा बंद करून टाकला.



Zanetti ट्रेन घटना दुनियेतील सगळ्यात Unsolved मिस्ट्री पैकी एक मिस्टीरियस घटना म्हणून प्रसिद्ध आहे.



©प्रथम वाडकर

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button