Brain StormingMental Health
शब्द – Words
“शब्द” – “Words”
©सौ. वैष्णवी व कळसे
शब्द – Words : “ये अलफाज क्या है?, दिल कि बातें जुबां से बयान करने का जरिया…
“काय फरक पडतो कोणाच्या शब्दाचा…?
जेव्हा कुठलं काम आपल्याकडून चांगल्या प्रकारे होतं, तेव्हा कोणी केलेल्या कौतुकाचे “शब्द”…
एखादी काम नाही जमलं तेव्हा कोणाच्या नाराजीचे “शब्द”…
कधी दुःखी असताना कोणी पाठीवर हाथ फिरवून म्हणतं “होईल सगळं नीट, नको काळजी करू” तेव्हा ते दिलासा देणारे शब्द…
कधी काही काम चुकल्यास “अरे जमेल तुला कर परत एकदा”, असे प्रोत्साहन देणारे शब्द….
लहान मुलं जेव्हा पहिल्यांदा बोलायला शिकतात तेव्हा त्यांचे शिकलेले ते तोडके मोडके शब्द….
त्यांचे ते लस्सी ला लोशी आणि साखर ला शाकल असे गोड शब्द….
काय बिघडतं एखाद्याला चांगलं म्हणणं.. आपल्याला न आवडत्या रंगाचा कोणी ड्रेस घालून आनंदी असेल, तर गरजेचं असतं का त्याला काही खास दिसत नाही म्हणून सांगणं?
आपल्याला न आवडत असलेली भाजी कोणी हौसेनी आपल्यासाठी करून आणली असेल, तर गरजेचं असतं का नाही आवडत मला ही, चांगली नाही लागत खायला असं मत मांडण? स्पष्ट मत मांडणे वेगळे आणि गरज नसेल तिथे कोणाला दुखावणे वेगळे…
स्पष्टपणा म्हणजे काय:- काही चुकीचं दिसेल आणि त्याचा आपल्याला त्रास होत असेल तर तिथे खंबीरपणे मत मांडणं, त्यासाठी एखादया माणसाच्या विरोधात जावे लागलेतरी तयार असणं म्हणजे स्पष्टपणा….!
उगीच नको तिथे आपल्या शब्दाने कोणाला सतत irritate करने म्हणजे स्पष्ट नव्हे…
आपल्या मनाचं कसं असतं, आपण निवडलेली नाती, निवडलेली माणसं, त्यांच्याकडून कुठलेही शब्द वाईट वाटून घेत घेत नाही…
पण तेच कोणी दुसरं बोललं कि आपल्याला आवडत नाही, कारण आपल्याला बरं,वाईट,चूक,बरोबर सांगण्याचा अधिकार आपण निवडलेल्या लोकांनाच दिला असतो….
आपली माणसं जेव्हा चूक दाखवतात तर त्यासोबतच त्याचा उपाय पण सांगतात, कारण त्यांना आपलं हित बघायचं असतं…
पण बाकी लोक जेव्हा चूक दाखवतात तेव्हा त्यांना आपल्याला कमीपणा दाखवायचा असतो, अपमान करायचा असतो….
त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणाला आपल्यावर किती अधिकार दिला पाहिजे हे आपल्याला लक्षात घेता आले पाहिजे…..
कोणी आपल्या भावनांशी खेळून जाईल, आपल्याला दुखावून जाईल एवढं पण कोणाला महत्व देणं बरोबर नाही….
काळजीपोटी विचारलेले प्रश्न आणि रिकामी चौकशी ह्यातला फरक लक्षात घेता आला पाहिजे….
जे आपले जवळचे आहेत त्यांच्यापासून काही लपवू नये आणि नको त्या लोकांना सांगू सुद्धा नये….
माणसाला शब्दाचा आधार असतो आणि शब्दानेच तो निराधार होतो….
काही चुकले असल्यास माफी असावी…
आवडल्यास Like आणि Share करा.