My title My title
HealthMental Health

छंद एक गरज – Hobby is a Necessity

छंद एक गरज – Hobby is a Necessity


©सौ. वैष्णवी व कळसे.


धावपळीच्या या जगण्यात आपल्याकडून काही सुटत आहे का? असं काही आहे का जे आपल्याला हवं आहे पण सध्या आपण करू शकत नाहीये….? हा प्रश्न तर सगळ्यांना असतोच….


अगदी दिवसभरात जेव्हा वेळ मिळतो तेव्हा एक प्रश्न नक्कीच येतो कि स्वतःसाठी थोडासा वेळ मिळाला असता तर असं केलं असतं, तसं केलं असतं…..


पण actually जेव्हा वेळ मिळाला तर खरंच आपण utilized केला का? हा प्रश्न देखील स्वतःला विचारून बघायला हवा…..


जर उत्तर हो आले तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे… पण जर का उत्तर नाही असेल आणि सोबत अशी कारणं असतील कि अमुक गोष्टी मुळे शक्य झालं नाही तमुक गोष्टीमुळे करू शकलो नाही तर लक्षात घ्यायला हवं कि आपण फक्त स्वतःच्या Failure   चे बहाणे शोधतोय….


तेव्हा आपण फक्त एक गोष्ट proper करतोय म्हणायचं… ती म्हणजे situation ला, एखाद्या व्यक्तीला किंवा वेळेला दोष देणे…….

आपल्या अपयशाच खापर दुसऱ्यांवर किंवा परिस्तिथी वर फोडून काय उपयोग….? “प्रत्येक वेळेस दिवा विझायला हवा कारणीभूत नसते, कधी दिव्यातही तेल कमी असू शकतं”….


वेळेचा उपयोग आपल्याला करून घेता आला नाही तर त्याला कोणीच काही करू शकत नाही…. आपली दिनचर्या, आपली कामं करताना आपले छंद देखील आपण जोपासले पाहिजे….. छंद, आवड नसेल तर कशात तरी आवड निर्माण करायला हवी ….


आपले छंद म्हणजेच आपलं charger असतं…. कधी कामाचा ताण वाटला कि miss mood  होऊन ते काम करण्यापेक्षा थोडा break घेऊन आपल्याला जे आवडत त्यामध्ये थोडया वेळ रमून relax होऊ शकतो….


कारण कुठलही काम मन नसेल तर परफेक्ट होऊच शकत नाही… तेव्हा बाकीची कामं पण जसं तसं संपवायचा प्रयत्न करतो… त्यामुळे आपल्या skill ची आपणच धजीया उडवतो…


त्या कामात मन नसल्यामुळे त्यात extra ordinary करून दाखवायचा विचारच येत नाही… स्वतःहून कुठले वेगळे efforts घ्यावे वाटतच नाही… ज्या कामात कुठलीच उत्सुकता नसेल ते अगदी पांचट वाटतं… व कामाचा कंटाळा यायला लागतो…


तेच जर का थोडा ब्रेक घेऊन मनासारखा वेळ घालवला तर कामातही मन लागेल आणि तेच काम आणखी मजेशीर होईल…. काहीतरी करून दाखवायची इच्छा सुद्धा होईल….


जे काम असं वा तसं करणंच आहे ते रडत पडत करण्यापेक्षा आनंदाने कसं करता येईल हे शोधले पाहिजे… result always मनाने केलेल्या कामाचाच उत्तम असेल याची तर खात्री आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठे असतेच….


सगळ्यात आधी जी situation आहे ती as it is स्वीकारायाला हवी, स्वीकारलीच नाही तर ती बदलवणार कशी? जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल सतत तक्रार करण्यापेक्षा जे बदल आपल्यात होण्यासारखे आहेत ते घडवण्यात लक्ष दिले पाहिजे…..


कुणास ठाऊक… होऊ शकतं कि ती situation येईल U-turn मारून आपल्याकडे आणि म्हणेल तुझीच पद्धत योग्य आहे बाबा, तू म्हणतोय तसंच करूया…. एकच लक्षात घ्यायला हवं जेव्हा आपल्याला हवंय तेच सारखं होत नाहीये तर जे नकोय ते पण सारखं होणार नाही…


थोडासा धीर आणि चेहऱ्यावर एक मोठी smile.

आवडल्यास like आणि share करा.

©सौ. वैष्णवी व कळसे.

Photo Credit: Google Images

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button