Unemployment and Frustration
November 16, 2021 | by Varunraj kalse
Unemployment and Frustration
बेरोजगारी आणि येणारी निराशा
©भुषण कौशल्या लक्ष्मण मडके
अलीकडच्या काही वर्षांमध्ये unemployment हा शब्द सर्वांच्याच तोंडपाठ झालेला आहे. शिक्षण आहे पण नोकरी नाही अशी स्थिती बऱ्याच तरुण तरुणींची झालेली आहे.
प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरीची आस लागलेली आहे आणि तेही काही चुकीचे नाही. आताच्या समाजात जगत असताना त्या व्यक्तीचे स्टेटस काय आहे यावरून त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढत आहे.
त्यामुळे काहीही झाले तरी आपल्याला सरकारी नोकरी भेटलीच पाहिजे या मानसिकतेतून सध्याची पिढी जात आहे. त्यामुळे समोर आलेल्या संधीचा फायदा न घेता सरसकट मुले या जात्यात भरडली जातात.
आणि मग लेखाचा मुळ उद्देश येतो या unemploymentतून येणारी निराशा. आपण काही उदाहरणे पाहू,
मी एवढं शिक्षण घेतलं आणि तरीही मला अजुन जॉब नाही.
माझी वयाची तिशी आली आणि नोकरीचा पत्ता नाही.
नोकरी नाही म्हणून लग्नाचा विषय घेतला जात नाही.
नोकरी भेटली तरी त्यातून होणारे कमी अर्थार्जन.
माझ्या सोबतचा माझ्या पुढे गेला आणि मी इथेच आहे.
अशा अनेक कारणांनी सध्या तरुणांना ग्रासलेले आहे. आणि यातूनच निराशा जन्माला येते. जगण्याविषयी निराशा.
अशा वेळी काय करावे? कोणाशी व्यक्त व्हावे? कोण आपले ऐकून घेणार? अशा अनेक कारणांनी तारुण्य शिड नसलेल्या तारू सारखे निराशेच्या गर्तेत भरकटत चालले आहे. याला वेळीच आवर नाही घालावा लागेल.
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन यासाठी महत्वाचे आहे. आता आपण काही मुद्दे पाहू.
१) करीयरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन तेही योग्य वेळी भेटणे गरजेचे आहे.
२) कधी कधी निर्णय चुकतो तेंव्हा हात पाय गाळण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधणे.
३) सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणे. परंतु स्पर्धेच्या जंजाळात अडकाण्यापेक्षा वेळीच आपली कुवत ओळखून दुसरा मार्ग निवडून त्यात प्राविण्य मिळविणे.
कारण मग त्यातच अनेक वर्षे निघून गेल्यावर याची जाणीव होते.
४) शिक्षण हे नोकरीसाठी नाही हे लक्षात ठेवूनच आपली वाटचाल ठेवावी आणि आलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा.
५) जेंव्हा काहीच पर्याय दिसणे बंद होईल तेंव्हा आपल्या आंतरमनाला विचारायचं
“मी जगण्यासाठी काय करू शकतो?”
“माझ्यात अशी कोणती शक्ती/कला आहे जी मला माझ्या पुढच्या आयुष्यात वापरता येईल?”
६) तुम्ही जर हात पाय हलवले तरच तुम्हाला यश भेटेल
दे रे हरी पलंगावरी असे होणार नाही.
कारण लोक बोलायला येतील पण पोसायला नाही. त्यामुळे आपल्या जगण्याचा मार्ग आपणच शोधायला हवा.
RELATED POSTS
View all
