Science Behind Sculpture of Turtle in Temple
©Anna®2021
मित्रांनो! आपल्या आसपास अनेक हजारो वर्षापुर्वीची पुरातन मंदिरे आपण पाहीलेले असतील.
कोणत्याही पुरातन मंदिरात गेल्यावर तेथील दैवी ऊर्जा ही कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अगदी सहजरित्या अनुभवायला मिळते. अशा पुरातन मंदिरात खूप काही गुढ दडलेले असते.
सनातन हिंदु ऋषी मुनी हे फक्त मंत्रसाधना करणारे आणि यज्ञ करणारे सिद्ध साधुच नव्हते तर ते एक संशोधक सुद्धा होते.
पुरातन हिंदु मंदिराची रचना, नक्षीकाम, तेथील पद्धती ही आजदेखील आधुनिक संशोधकांना थक्क करते.
कारण हजारो वर्षापुर्वी आजच्यापेक्षाही कितीतरी प्रगत तंत्रज्ञान सनातन हिंदु धर्मामध्ये होते हे पुरातन मंदिरे पाहील्यावर लक्षात येते.
आपले पुर्वज आजच्या विज्ञानापेक्षा किती प्रगत होते ह्याचे एक उदाहरण मी देत आहे.
*मंदिरातील कासव*
ज्या मंदिराची आयुमर्यादा ५०० वर्षापुर्वीची आहे अशा कोणत्याही मंदिरात तुम्ही गेल्यावर एक गोष्ट निरिक्षण करण्यायोग्य आहे ती म्हणजे मंदिरातील कासव.
ज्या लोकांनी अशी पुरातन मंदिरे बघितलेले असतील त्यांच्या लक्षात येईल की, पुरातन मंदिरातील कासव बनविण्यासाठी वापरलेला दगड हा बेसाॅल्ट पद्धतीचा दगड आहे.
तसेच अशा कासवाच्या पाठीवर एखादे गुढ यंत्र कोरलेले असते.
अगदी बारकाईने कासवाच्या मुर्तीचे निरिक्षण केल्यावर तुम्हाला जाणवेल की, पुरातन मंदिरातील गर्भगृहाच्या बाहेर असणार्या कासवाच्या पाठीवर एक गुढ यंत्र कोरलेले असते.
शिवाय त्या कासवाच्या मुर्तीला स्पर्श केले असता एक प्रकारची दैवी ऊर्जा शरीरात प्रवाहीत झाल्याचा अनुभव येतो. ह्यामागचे कारण काय आहे?
मित्रांनो! आपले पुर्वज हे फक्त साधु संन्यासी नव्हते. आपले पुर्वज प्रगत संशोधकसुद्धा होते. त्याकाळी त्यांनी एक असे संशोधन केले होते की, हे ऐकल्यावर तुम्हालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल.
पुरातन मंदिरातील गर्भगृहाच्या बाहेर असणार्या कासवाच्या पाठीवरच्या भागामध्ये आत एक पोकळी असते.
बेसाॅल्ट दगडापासून तयार केलेल्या कासवाच्या मुर्तीमध्ये पोटाचा आणि पाठीचा भाग आतून पोकळ बनविलेला आहे.
ह्या पोकळ भागात ओल्या सिलिका जेलसारखा एक पदार्थ ओतला जात असे. त्या पदार्थासोबतच क्रिस्टल काॅर्ड्सचे पाॅलिश केलेले लहान लहान दगड ठेवले जात होते.
तसेच त्यासोबत कासवाच्या मुर्तीच्या आतून पाठीवर कोरलेल्या गुढ यंत्राला आतून स्पर्श होईल अशा कास्याच्या अगदी पातळ तारा जोडल्या जात होत्या. तांबा आणि टिनपासून बनलेला कास्य हा मिश्रधातु आहे.
ह्यावरून हे लक्षात येते की, कासवाची मुर्ती बनविताना त्यामध्ये सिलिका जेलसारखा पातळ पदार्थ, क्रिस्टल काॅर्ड्सचे पाॅलिश केलेले लहान- लहान दगड आणि मिश्रधातु कास्यापासून बनविलेल्या तारांचा वापर करून त्या तारा कासवाच्या पाठीवर कोरलेल्या गुढ यंत्राशी आतून जोडून प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनींनी कासवाच्या माध्यमातुन रेडीओ संचार उपकरणाचा हजारो वर्षापूर्वीच शोध लावलेला होता.
ज्यावेळी आधुनिक जगामध्ये पहीला ट्रान्झीस्टर बनवला गेला त्यावेळीसुद्धा वर सांगीतल्याप्रमाणे ह्याच सेमी कंडक्टरचा उपयोग केला गेला होता.
आधुनिक विज्ञानाव्दारे बनविलेल्या पहील्या रेडीओ उपरकरणामध्येसुद्धा क्रिस्टल काॅड्सचाच उपयोग केला गेला होता.
ह्यावरून हे स्पष्ट होते की, प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनी पुरातन मंदिरातील गर्भगृहाबाहेर बनविलेल्या कासवाच्या मुर्तीचा वापर रेडीओ संचार उपकरण म्हणून करत होते.
जसे आजच्या काळात आपण आपल्या आवडत्या चॅनलला शोधण्यासाठी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला ट्युन करत असतो.
अगदी तशाच पद्धतीने अशा पुरातन मंदीरामध्ये गर्भगृहाबाहेर कासवाच्या मुर्तीच्या आसपास बसून आपण एखादा मंत्र ध्यान लावून पठण केले असता आपल्याला अव्दितीय ऊर्जेचा स्त्रोत शरिरामध्ये निर्माण होत असल्याचा अनुभव येवू शकतो.
जसे एखादा रेडीओ चॅनल शोधण्यासाठी ॲन्टेनाचा वापर केला जातो तशाच पद्धतीने आपल्या मंदीराच्या कळसाची रचना आहे.
पिरॅमिडच्या पद्धतीने मंदीराचे बांधकाम आहे. ज्यावेळी तुम्ही गर्भगृहाबाहेर एखादा मंत्र पठण करता त्यावेळी कासवाच्या मुर्तीच्या माध्यमातून परलोक ग्रहाशी इथून फ्रिक्वेन्सी जोडली जाते.
आणि परलोक ग्रहावरून तुम्ही ज्या देवतेचा मंत्र पठण करत आहात त्या देवतेकडून तुम्ही जिथे असाल तिथे ती देवता सिग्नलव्दारे जोडली जावू शकते.
प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनी परलोक ग्रहावरून सुचना आणि संदेश प्राप्त करण्यासाठी ह्या दिव्य कासवमुर्तीचा रेडीओ उपकरण म्हणून वापर करत होते.
कासवाच्या पाठीवर जे गुढ यंत्र कोरले जात होते हे यंत्र म्हणजेच परलोक शक्तीशी जोडण्याची फ्रिक्वेंन्सी आहे.
हा आहे आपला प्राचीन सनातन हिंदु धर्म आणि हे आहेत आपले प्रगत हिंदु ऋषीमुनी. आजच्या विज्ञानाच्या कितीतरी वर्षापूर्वीच आपल्या पुर्वजांनी अनेक शोध लावून ठेवले आहेत.
मात्र आपण आधुनिकतेचा खोटा पगडा बाळगणारे लोक ह्याकडे दुर्लक्ष करत आलो आहोत.
अनेक परकिय आक्रमणांमुळे आपली जुनी मंदिरे नष्ट झाली आहेत किंवा नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत कृपया आपल्या पुरातन हिंदु मंदिराचे रक्षण करा.
आपल्या पुर्वजांनी खूप काही आपल्यासाठी अमुल्य ठेवा दिलेला आहे त्याचा सांभाळ करावा.
टिप- वरील लेख ५०० वर्षापुर्वीच्या मंदिरासंबंधी अध्ययन आणि पुरातन ग्रंथाच्या आधारे लिहला आहे.
हल्लीच्या मंदिराच्या बांधकामाशी ह्याचा काहीही संबंध नाही. तसेच हा लेख माहीतीसाठी लिहला आहे.
©Anna®2021