HealthMental Health
सपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…
सपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…
©सौ. वैष्णवी व कळसे
इमॅजिनेशन आणि रिऍलिटी
या दोन्ही गोष्टींचा जेवढा आधार तेवढाच मानसिक त्रास….
जगात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो…. आपली वास्तविकता आणि आपलं स्वप्नाचं जग अशा दोन गोष्टींची सांगड घालताना तर आपले दिवस जात असतात…
कधी कधी परिस्थिती तेवढीही वाईट नसते जेवढे आपल्या डोक्यात आपण बनवून घेतो…. एखादी गोष्ट मनासारखी घडत नसेल तर लगेच आपल्या “imaginary world” मध्ये काही गोष्टी यायला लागतात….
भविष्याची अचानक जास्त काळजी वाटायला लागते… वाटायला लागतं की हे असच सुरु राहिलं तर काय होईल पुढे? छोटीशी गोष्ट जरी बिघडली की आपलं सुरु होतं त्याचं “extreme” रूप बघायला….
कारण आपल्या डोक्याला आराम द्यावा वाटतच नाही आपल्याला…. कधी कुठलंच टेन्शन नसलं तर त्याचं टेन्शन येत… की एकही टेन्शन कसं काय नाही मला? कुठलीही परिस्थिती जेव्हा आपण extreme करून बघतो इमॅजिनेशन मध्ये, त्यावेळेस ते आपल्यासाठी घातकच ठरतं….
अगदी एखाद्या movie सारखं आपल्या डोक्यात ती काय situation असू शकते हे pictured करून बघतो… एखाद्या डायरेक्टर सारखं…dialogue सकट
खरंतर एवढं काही झालेलं नस्त, पण सवयी प्रमाणे आपण अशे picture बनवायचं काही सोडत नाही… त्यामुळेच आपण ज्या प्रकारे परिस्तिथी हाताळायची आहे त्यात आधीच नकारात्मक भावना तयार करतो…
त्यामुळे result तर obvious असतो……
बनलेली गोष्ट बिघडवायला अशाच चुका कारणीभूत असतात…..
कधी इमॅजिनेशन मध्ये मी या पदावर, या ठिकाणी, या प्रकारच काम करतोय, असा यशस्वी आहे असं बघतो, आणि रिऍलिटी मध्ये तसं काही नसतं तर जास्त दुखावतो व जे आहे आपल्याकडे त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही, सतत असमाधानी बनतो….
कारण डोक्यात तर कार मध्ये फिरत होतो आणि वास्तविकते मध्ये दुचाकी आहे मग त्या दुचाकीची सुद्धा किंमत नाहीशी होते…
मी म्हणत नाही की स्वप्न बघणे चुकीचे आहे, किंवा असं इमॅजिनेशन चुकीचं आहे…
कुठलेही प्रयत्न न करता फक्त नशिबावर नाराज होने चुकीचे आहे…. माझ्या मते जे स्वप्नात बघतो ते पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवा…..
कुठे चुकतोय का बघायला हवं….
पण उगीच नशिबाला दोष देत, आहे त्याचा रागराग करू नये….
त्यावेळेस जे आहे ते ही नसतं, तर आयुष्य कसं असतं ते करा ना imagine….
मग कदाचित आहे त्याच्याशी प्रेम होईल….
आहे ते आवडायला लागेल आहे त्यात जर समाधान मानता आलं नाही तर आपल्याला कितींही मिळू दे आपलं मन असमाधानीच असेल….
आपल्या अवती भवती खूप आनंद आहे जो आपण बघत नाही…
आनंदाची व्याख्या म्हणजे नेमकी काय हे बघायला पाहिजे…. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आलं पाहिजे….
समोर काय होईल याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपला आज कसा आणखी चांगला होईल ते बघितलं पाहिजे….
जे जीवन आपण जगतोय ते ही अनेकांचे स्वप्न असू शकतात…
त्यामुळे आपल्याला जे काही मिळालं आहे त्यात देवाचे आभार मानायला हवे….