Mental HealthSomething Different
#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी….
#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी….
©Nandini Nitesh Rajapurkar
नुकताच झिमझीम पाऊस बरसून गेलेला…
मस्त आलं घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे कप घेऊन ती बेडरूम कडे निघाली…
पाऊस गेला होता पण वारं मात्र भरपूर होतं.. त्यांच्या ओपन टेरेसच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये वारा अगदी चाहुबाजुंनी उधळत होता…
अगदी अंगावर शिरशिरी येईल इतका…
वाऱ्याने तिच्या केसांच्या अवखळ बटा तिच्या चेहऱ्यावर मजेत रुळत होत्या…
त्यांना दुसऱ्या हाताने हलकेच एका बाजूने घेत
ती रूम मध्ये पोहोचली…
तिकडे तो झोपला होता,
तिचा तो…
तीच सर्वस्व…
सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं झालं तर…
तिची गुलाबी लाईफलाईन…
नुकताच त्याला डोळा लागला असावा,
झोपण्यापूर्वी त्याने ओढलेल्या सिगरेटचा बेधुंद सुगंध त्या मोकळ्या हवेत ही मंद मंद दरवळत होता..
सगळे तिला वेडीच म्हणायचे, तिला सिगरेटचा वास
आवडायचा म्हणून… पण जस बाकीच्यांना ओल्या मातीचा सुगंध, कोणाला पेट्रोलचा सुगंध तसं तिला मातीच्या घराला रंग दिल्याचा आणि सिग्गीचा वास भयंकर आवडायचा…!
यावरून कोणीतरी तिला एकदा छेडलं होतं तेव्हा
ती म्हणाली,
“सिगरेटचा वास मला आवडतो हे खरंय पण ती कोण ओढतय हे त्यावर पण डिपेंड आहे !”
आणि स्वतःच्याच उत्तरावर खुश होत खळखळून हसलेली…
रूम मध्ये पोहोचताच तिने टीपॉयवर ट्रे ठेवला,
बेडभोवती असलेले फिक्कट निळ्या रंगाचे पडदे झिरझिरत वाऱ्यावर लहरत होते…
बेडवर तो पालथा झोपला होता..
बिना शर्टचा..
पडदे हातांनी बाजूला करत तिने त्याला हाक मारली…
पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही..
याला आता झोपेतून कसे उठवायचे याचे खोडकर विचार तिच्या मनात घोळू लागले…
दात ओठांवर हलकेच दाबत , नख खात ती विचार करायला लागली..
आणि 2 मिनिटांत खुदकन हसत ती बेडवर त्याच्या कडेने बसली..
आपला चेहरा हलकेच त्याच्या जवळ आणत तिने त्याच्या मानेला आपले नाक घासले..
तसं करताना तिला स्वतःला पण खुप हसायला येत होते
अचानक मानेवर गुदगुल्या झाल्या म्हणून त्याने अर्धवट डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिले..
आणि बिना हालचाल करता हळूच ओठांत हसला..
तिला तसं करून खुप गंमत वाटली..तिने अजून दोनदा तसे केले… तसं त्याला हसू आवरेना…
अचानक वळत तिचा हात घट्ट पकडत त्याने तिला जवळ ओढले आणि म्हणाला,
.
..
…
….
……
….
……
…..
“सोना तुझी दाढी टोचतीये ग मला”
तशी रूम मध्ये भयाण शांतता पसरली…
ती शॉक बसल्यासारखी त्याच्याकडे पाहायला लागली.. आणि तिचा तो तसा झालेला चेहरा पाहून तो वेड्या सारखा हसायला लागला…!!!
समाप्त !!